Link copied!
Sign in / Sign up
136
Shares

पाचक पित्तशामक सोलकढी रेसिपी (व्हिडीओ)


सोलकढी हे एक पाचक पेय आहे जे मूलतः महाराष्ट्रातील कोकण भागातील आहे. विशेषतः मांसाहारी जेवणानंतर सोलकढी पिण्याची पद्धत आहे. तसेच भाता बरोबर देखील किंवा नुसतीच देखील सोलकढी पिण्यात येते. सोलकढी पाचक आणि पित्तशमक असते.

साहित्य .

ताज्या नारळाचं दुध २ कप

४-५ सोलं (आमसुलं/ कोकम )

१ हिरवी मिरची

१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून

१-२ लसूण पाकळ्या (Optional )

१ १/२ टीस्पून साखर

मीठ चवीप्रमाणे

 

व्हिडीओ स्रोत -बिंग मराठी 

कृती

१. १ कप ताज्या खोब-याचे तुकडे आणि १ कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्याची प्युरी करा. सुती कपड्यातून हि प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दुध निघतं. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पात्तळ करून घ्या.

२. पाण्यात सोलं ३०-३५ मिनिटे भिजत घाला म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा.

३. नंतर साखर मीठ घालून ढवळून घ्या. हिरवी मिरची तुकडे करून घाला.लसूण ठेचून घाला. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार serve करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon