Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

स्मुदीच्या काही रेसिपी

घडाळ्याच्या काट्याबरोबर फिरणाऱ्या हल्लीची सर्वच लोक आता अधुनिक जीवनशैलीच्या दुष्परिणामांविषयी जागरुक झाले आहेत. आपण जे काही खाऊ पिऊ ते किमान आरोग्यदायी अर्थात आजच्या भाषेत हेल्थी असावे याकडे कटाक्ष असतो. त्यामुळे विविध प्रकारच्या डाएटपासून ते हेल्थी फूड पर्यंत प्रयोग करण्याचे धाडस प्रत्येकजण करत असतो.

डाएट व्यतिरिक्त खाण्यापिण्यावरील प्रयोगात सलाड, फळे खाण्याबरोबर एक नवा हटके फंडा आहे तो म्हणजे स्मुदीजचा. हा प्रकार पारंपरिक दही,दुधाचा वापर करून केलेला फळांच्या रससारखा असेल, भाज्यांचा रस असेल. घरी जे काही पदार्थ उपलब्ध आहे त्यापासून करण्याचा हा प्रकार आहे. भाज्या, फळांचा वापर- 

स्मुदीजच्या काही पाककृती 

उन्हाळ्यात आंब्यांचा मोसम असतो. घराघरात आंब्याचा सुवास दरवळतो. मुले तर खूष असतात. मग आंब्याच्या स्मुदीपासूनच सुरुवात करूया.

आंब्याची स्मुदी

साहित्य-

आंब्याच्या फोडी, दही, थोडंसं क्रीम किंवा साय, आणि साखर चवीनुसार

कृती-

आंब्यांच्या फोडींसह सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवा. हे मिश्रण घट्टसर होईल. आता काचेच्या ग्लासमध्ये हे मिश्रण काढून त्यावर आंब्यांच्या फोडी घाला आणि मध, फेटलेले क्रीम किंवा साय घाला. वा क्या बात है आंब्याची स्मूदी तयार आहे. मस्तानी, मिल्कशेक पिऊन कंटाळलेल्या मुलांना काय मोठ्यांच्याही जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.

केळ आणि अननस

साहित्य- केळी, अननस हवे असल्यास संत्र्याचा रस, दही, पीठीसाखर

कृती- फळांचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये गार करण्यास ठेवा. मग सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून काढा घट्टसर स्मूदी तयार आहे.

ओटस्, स्ट्रॉबेरी स्मुदी

२ चमचे रोल्ड ओटस, ५-६ अक्रोड, आल्याचा तुकडा, ४-५ स्ट्रॉबेरी किंवा अननस किंवा तुती

कृती सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्या. स्मूदी तयार. ही स्मुदी न्याहारीच्या ऐवजी पिऊ शकता. कारण ओटस मुळे ती पोटभरीची होणार आहे. फक्त ही स्मूदी लगेचच प्यावी अन्यथा ओटसमुळे ती खूप जास्त घट्ट होते.

केळे आणि पीच स्मूदी

पिकलेले केळे आणि पीच यांचे तुकडे आणि दही तसेच साखर एकत्र फिरवून घ्या. स्मूदी तयार

सेलेरी, पालक स्मूदी

स्मूदीमध्ये सेलेरीचा वापर करु शकतो. त्यामुळे पोषणमूल्य वाढतात. शिवाय हिरव्या रंगाची स्मूदी आकर्षकही दिसते.

थोडी पालकाची पाने, थोडी सेलेरीची पाने, व्हॅनिला योगर्ट किंवा साधे दही वापरू शकता किंवा त्याऐवजी पाणी वापरू शकता.

हे सर्व मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यावे. घट्टसर स्मूदी तयार होते.

जसे आंबे, केळं यांची स्मूदी तयार केली तशीच स्मूदी इतर फळांची स्मूदी करता येते. काही स्मूदी या खास वजन कमी करण्यासाठीही असतात. अशाच प्रकारे फळांमध्ये भाज्या घालूनही स्मुदी करता येतात. स्ट्रॉबेरी, केळ आणि फ्लॉवर, पीच, गाजर आणि आंबा, ब्लुबेरी आणि कोबी, पालक आणि किवी असेही कॉम्बिनेशन करता येऊ शकते.

थोडक्यात काय तर भाज्या आणि फळे यांचे योग्य प्रकारे मिश्रण करून विविध प्रकारच्या स्मूदी बनवून आपल्या आरोग्य राखण्यासाठी चविष्ट प्रकार खाऊ शकतो.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon