Link copied!
Sign in / Sign up
196
Shares

स्मार्टफोनचा तुमच्या बाळाच्या मेंदूवर हे घातक परिणाम होऊ शकतात

बदलत्या काळाबरोबर मनोरंजनाची साधनेदेखील बदलली आहेत. पूर्वी मुले रंगीबेरंगी खेळणी खेळायची आणि त्याच्या मित्रांसोबत उद्यानांमध्ये हुंदडायची. तथापि, आजची परिस्थिती बदलली आहे. आजच्या मुलांना स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, टीव्ही आणि गेमिंग कन्सोलचे वेड लागले आहे.

आपल्यातले पुष्कळजण वेळ घालवायला व्हिडिओज पाहतात आणि त्याच प्रकारे मुले त्यांच्या स्मार्ट पॅडवर त्यांचे आवडते कार्टून्स आणि चित्रपट पाहत बसतात. तुम्ही बहुतेक मातांना हे बोलताना ऐकले असेल की, "ओह, माझे बाळ फोन बरोबरच खेळत बसते!" किंवा "मी त्याला/ तिला फोन नाही दिला की ते रडत बसते!" किंवा त्यापेक्षाही भयंकर म्हणजे "माझ्या बाळाला रडण्यापासून थांबवण्याचा एकच मार्ग आहे- तो म्हणजे त्याला मोबाईल देणे!"

जसजसे वय सरते; तसतसे या यंत्रांवरचे अवलंबित्व वाढत जाते. याचा वाईट परिणाम नंतर मेंदूवर आणि डोळ्यांच्या क्षमतेवर होतो. म्हणून पालकांनी या 'स्क्रीन टाईम' वर लगाम घालणे गरजेचे आहे. 'अमेरिकन ॲकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स' च्या मते दोन ते पाच वर्षे वयाच्या मुलांना जास्तीत जास्त स्क्रीन टाईम 'साठ मिनिटे' दिला पाहिजे; तर त्या वयाखालील मुलांना तर स्मार्टफोन हाताळायला देखील न दिलेला बरा!

या यंत्रांचा मुलांवर कोणता हानिकारक परिणाम होतो?

एका अभ्यासानुसार जितका जास्त वेळ मुले अशा यंत्रांसोबत घालवतात; तितकी त्यांची झोप कमी होते आणि तसेच त्यांची लक्ष देण्याची कुवतदेखील कमी होते! या वर्तनामुळे ते रात्रीऐवजी दिवसा झोपण्यास चालू करतात आणि हे नक्कीच चांगले लक्षण नाहीये.

तसेच यानुसार एक धक्कादायक वास्तवही समोर आलेय; ते म्हणजे तुमच्या बाळाच्या स्मार्टफोनसोबत व्यतीत करणाऱ्या प्रत्येक पंधरा मिनिटांमागे ते एक तासाची झोप गमावून बसते! म्हणून तुमचे स्मार्टफोन्स हे तितके स्मार्ट आणि फायदेशीर नाहीयेत.

आणखी एका अभ्यासानुसार जितका वेळ मुले स्मार्टफोन्ससोबत घालवतात तितके त्यांची संभाषणशक्ती मंदावते. याचे कारण म्हणजे मुले बोलणे शिकण्याऐवजी, आपला वेळ स्क्रीनकडे बघण्यात घालवतात. या यंत्रांबाबतचे हे व्यसन 'स्क्रीन डिपेंडन्सी डिसऑर्डर' म्हणून ओळखले जाते आणि हे 'इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर'शी बरेच मिळतेजुळते आहे.

तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की, बाळे फोनचे लोक उघडण्यात आणि टीव्ही चालू करण्यात लगेचच तरबेज होतात.

या डिसऑर्डरची लक्षणे कोणती आहेत?

- वजन वाढणे किंवा कमी होणे

- डोकेदुखी

- डोळ्यांची समस्या

- अयोग्य पोषण

- झोप न लागणे

- एकाकीपणा

- चिंतीत असणे

- अप्रामाणिकपणा

- स्वतःला कोंडून घेणे

- मूड स्विंग

- लगेचच चिडणे

ही समस्या कशी हाताळावी?

बाळे रडणे थांबवण्याकरता बहुतेक पालक लगेचच त्यांना स्मार्टफोन देतात. तथापि, असे वर्तन लगेचच बालरोगतज्ज्ञांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे; कारण तुम्हाला यावेळी मार्गदर्शन करण्यास तेच सक्षम असतात.

असे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे आणि ज्याप्रमाणे मद्य वा अंमली पदार्थ मानसिक संतुलन बिघडवतात; त्याचप्रमाणे ही समस्या मेंदूवर परिणाम करते. यामुळे मुलांना भावना न आवरता येणे, काय करावे हेच ठरवता न येणे या समस्या येऊ लागतात! संवेदना आणि दया यांसंबंधित मेंदूचा भागही याने प्रभावित होतो.

जरी ही समस्या तुलनेने नवी असली; तरी याबाबत जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. हे खरे आहे की, अशी यंत्रे वापरताना भरपूर खबरदारी घ्यायची असते; पण हेही खरेच की या शतकाची साक्षरता म्हणजे तंत्रज्ञान वापरता येणे आणि फक्त लिहिता-वाचता येणे नव्हे!

म्हणून तुमच्या मुलांना मोबाईलवरून बोलण्याऐवजी समोरासमोर बोलण्यास, स्मार्टपेन वापरण्याऐवजी सामान्य पेन्सिल वापरण्यास प्रोत्साहन द्या. तंत्रज्ञानाच्या क्लाऊड ने त्यांना प्रभावित न करता, बालपणाचे गोडपण त्यांना अनुभवण्यास मदत करा!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon