Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

चेहऱ्याची त्वचा इतर त्वचेपेक्षा जास्त काळवंडली असल्यास त्यासाठी उपाय

 असमान स्किनटोन ही बऱ्याच स्त्रियांमध्ये सामान्य समस्या झाली आहे. कोणतीही व्यक्ती आपला चेहरा सर्वप्रथम बघते त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंगच आपल्या त्वचेचा रंग आहे असा समज होतो. पण हे दरवेळी असेच असते असे नाही. बऱ्याच लोकांच्या हाताचा, पायाचा, आणि शरीरावरील इतर भागांचा रंग चेहऱ्याच्या तुलनेत उजळ असतो. तर तुम्ही कसा सुधाराल आणि सगळीकडे समान स्किनटोन होईल याची काळजी कशी घ्याल?

हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला असमान स्किनटोनची कारणे लक्षात घेणे आवश्यक आहे.

शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत चेहऱ्यावरील त्वचा गडद होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे चेहऱ्याला सर्वात जास्त सूर्यप्रकाशाला सामोरे जावे लागते.

सूर्यप्रकाशातील हानिकारक किरण हे त्वचेतील पेशींचे नुकसान करते आणि त्यांना गडद करते.

तुमच्या चेहऱ्यावरची त्वचा अतिसंवेदनशील असू शकते. त्यामुळे तुम्ही दरवेळी रासायनिक उत्पादने वापरता ते त्वचेला गडद करते.  जर का तुम्हाला चेहऱ्यावर कधी पुरळ, मुरुमे (पिंपल्स) आणि चट्टे उठले असतील तर त्याने देखील त्वचा गडद होते.

हे अगदी नैसर्गिक सुद्धा असू शकते. तुम्ही असे काही केले नाही तरी देखील चेहऱ्यावरील त्वचेचा रंग गडद होत जातो.

तुम्ही काय करू शकता?

१. सनस्क्रिनचा वापर अनिवार्य आहे 

Skin care routine to prevent darkening.

त्वचेचे खूप नुकसान आणि रंग गडद होण्यामागे सूर्यप्रकाश हे अगदी सामान्य कारण आहे, त्यामुळे ते टाळणे हे सोयीचे असते आणि जर का तुम्हाला उन्हाळ्यातला दिवसांचा छान आनंद घ्यायचा असेल तर मात्र भरपूर प्रमाणात सनस्क्रिन लावूनच बाहेर पडा. सनस्क्रिन हे कायम सगळ्या ऋतूंमध्ये अगदी पावसाळ्यात आणि थंडीत देखील वापरणे गरजेचे आहे.

२. तुमच्या त्वचेची काळजी घ्या

तुम्ही चेहऱ्यासाठी जी उत्पादने वापरता त्यामुळे तुम्हाला अशा समस्यांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक उत्पादने वापरा तुम्हाला लगेच फरक जाणवेल. सुरुवातीला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा आणि मऊ टॉवेलने पुसा. गुलाबपाणी लावा. चेहरा योग्य प्रमाणात ओलसर ठेवून त्यावर सनस्क्रिन लावा. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मेकअप करत असाल तर तो सनस्क्रीमच्यावर करा.

३. मेकअपचे महत्त्व 

तुम्ही जर फाऊंडेशन आणि डोळ्याखालची गडद वर्तुळे लपवण्यासाठी मेकअप करत असाल आणि तो तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता नसेल तर तुमची त्वचा खूप गडद दिसू शकते.

४. नैसर्गिक उपाय करा आणि चमत्कार पाहा 

त्वचेचा पोत आणि रंग उजळवण्यासाठी बरेच नैसर्गिक घटक आहेत जसे की लिंबाचा रस, गुलाबपाणी, कोरफड, पपई आणि असे बरेच तुम्ही वापरू शकता. यांचा परिणाम दिसायला वेळ लागतो त्यामुळे ते सातत्याने किमान महिनाभर तरी वापरायला हवे.

हे कायम लक्षात ठेवा की त्वचेच्या रंगावरून माणसाची ओळख सिद्ध होत नाही. तुम्ही जसे  आहात तसे सुंदरच आहात आणि त्यापुढे बाकी सगळे फिक्के आहे. अंतिम सत्य हेच आहे की तुम्ही तुमच्या त्वचेच्या रंगाचा न्यूनगंड बाळगू नका.



Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon