Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

जाणून घ्या सिझेरियन डिलिव्हरी का करावी लागते


      गरोदरपणात कोण-कोणत्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्याबाबत जाणून घेणे गरोदर स्त्री साठी महत्वाचे आहे म्हणजे डॉक्टरांनाही माहिती राहील की, ह्या स्त्रीला सर्व काही माहिती आहे म्हणून उपचार व्यवस्थित करावे लागतील. आणि खरं म्हणजे तुम्ही ह्याबाबत सर्व गोष्टी वाचून घ्यायला पाहिजेत. त्यासाठीच हा ब्लॉग. 

१) डिलिव्हरीच्या वेळी डॉक्टर गरोदर स्त्रीची शारीरिक आणि मानसिक स्थिती बघतात. त्यानुसार ठरवतात की, सिझेरियन करायचे आहे का नॉर्मल. पण बहुतेककरून त्यावेळी २ ते ३ छोट्या किंवा मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागत असतात.

      डिलिव्हरीच्या तीन पद्धती आहेत

व्हॅक्युम Extraction, फोर्सेप्स ( चिमटा लावणे) आणि तिसरी महत्वाची सिझेरियन.

२) ज्या स्त्रियांची प्रकृती खूप कमकुवत असेल तर त्या स्त्रियांची डिलिव्हरी ही हाय रिस्क मध्ये चालली जाते. आणि अशी कोणती लक्षणे आहेत की, त्यामुळे सिझेरियन आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागतो.

३) लक्षणे

* अगोदर गरोदर असताना वारंवार गर्भपात झाले असतील, किंवा अपुऱ्या दिवसातच बाळंतपण झाले असेल,

* गरोदर असताना अंगावरून रक्त गेले असेल तर

* काही कारणांमुळे पोटातच गर्भ दगावला असेल तर

* गर्भारपणात खूप रक्तदाब वाढला असेल

* गर्भातले मूल आडवे किंवा पायाळू असेल तर

* बाळाची अपुरी वाढ झाली असल्यास

* स्त्रीला हृदयरोग, मधुमेह असेल आणि डिलिव्हरीत धोकादायक होऊ शकते तर

* डिलिव्हरीची तारीख उलटून गेली असेल आणि खूप पोट दुखत असेल

ह्या कारणामुळे स्त्रीला सिझेरियन डिलिव्हरीची गरज भासते. पण काही डॉक्टर ही कारणे नसताना सिझेरियन प्रसूतीच्या निर्णय घेतात तो प्रश्न वेगळा. ज्यावेळी तुमचे खूप पोट दुखत असेल आणि खूप कळा येत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा. आणि त्यावेळी काही खाऊन जाऊ नका. नाहीतर काही स्त्रिया ह्या व त्यांना घरचे व्यक्ती काहीतरी खायला सांगतात ते घातक होऊ शकते कारण बऱ्याचदा डॉक्टर भूल देऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात आणि त्याचवेळी ते अन्न अन्ननलिकेत अडकून डॉक्टरांना खूप प्रयास पडतात म्हणून उपाशीपोटीच डॉक्टरांकडे जावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon