Link copied!
Sign in / Sign up
45
Shares

सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर या पाच लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका


बाळाला जन्म देणे म्हणजे केवळ एका बाळाच्या जन्माचे चित्रण नसते तर आईच्या पुर्नजन्माचे प्रतीक आहे. नव्याने माता-पिता झालेले आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात एक आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण तयार होते. स्त्रियांच्या आयुष्यातील हा खरंच एक अविस्मरणीय अनुभव आहे की, कसे फक्त त्याच एका जीवाला नऊ महिने आपल्या गर्भात वाढवतात आणि नंतर त्याचे संगोपन करून त्याला एक जबाबदार व्यक्ती म्हणून घडवतात.

जसे प्रत्येक स्त्री जी आई होणार असते ती गर्भवती असताना स्वतःची काळजी घेते, बाळंतपणा नंतर त्यांना स्वतःची दुप्पट काळजी घ्यायला लागते. त्या नऊ महिन्यांमध्ये त्यांच्या शरीरात जे काही बदल झालेले असतात ते परत पूर्ववत होण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. प्रसूती नंतर त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे याची त्यांना पूर्व कल्पना असणे गरजेचे आहे, विशेषतः जर का त्यांचे सिझेरियन झाले असेल तर.....

जरी ही बाळाला जन्म देण्याची सुरक्षित पद्धत असली तरी देखील थोडी कठीण शस्त्रक्रिया आहे. बाकी कोणत्या शास्त्रक्रिये सारखेच यात देखील संसर्ग होण्याची भीती आहे. आता तुम्ही तुमच्या या नवीन जीवन शैली आणि बाळा बरोबर जुळवून घेताना, तुमच्या शरीराने दिलेल्या काही धोक्याच्या इशाऱ्यांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता खूप असते.

जर का तुमचे सिझेरियन झाले असेल तर खाली दिलेले सहा महत्त्वाचे मुद्यांकडे लक्ष द्या

१) उच्च ताप

जर का तुमच्या अंगात तापमान १००.४ अंश फॅरेनाईट (३८ अंश सेल्सियस) पेक्षा जास्ती असेल, तर ते संक्रमणाचे लक्षण असू शकते. जर का तापासोबत तुमच्या ओटीपोटात तीव्र वेदना जाणवत असेल तर आपल्याला त्वरित डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्या.

जर सुरवातीलाच आपण या आजाराकडे दुर्लक्ष केले तर ते पुढे जाऊन ते गंभीर होऊ शकतात. जर का सिझेरियन झाल्या नंतर पहिल्या दहा दिवसात तुम्हाला ताप आला तर लगेच डॉक्टरांकडे जा. हे मूत्राशयाचा किंवा स्तनाचा संसर्ग असू शकतो ज्यामुळे आपल्याला उच्च ताप येतो.

२) सततच्या वेदना 

शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला वेदना जाणवतील. शस्त्रक्रियेनंतर, तुम्हाला टाके घातलेल्या भागावर वेदना होतील पण जर का त्या वेदना खूप जास्ती आणि सतत होत असतील तर हे चांगले लक्षण नाही. आपल्या पोटात आणि ओटीपोटात दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

३) योनी मार्गातून होणारा अती रक्तस्त्राव 

शस्त्रक्रियेनंतर पहिल्या काही दिवसात आपल्या योनी मार्गातून जास्ती रक्त येणे सामान्य आहे. हा रक्तस्त्राव काही आठवड्यात थांबतो. पण जर का हे असेच चालू राहिले तर मात्र हे काळजीचे लक्षण आहे. जर का त्या रक्तस्रावातून दुर्गंध येत असेल तर ही गोष्ट लगेच डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्या. जर का तुमच्या लघवी मध्ये रक्त आढळले तर तातडीने दवाखान्यात जावे.

४) जखमेतून रक्तस्त्राव 

जर का तुम्हाला त्या जखमेवर संसर्ग झाला तर प्रसुती पश्चात तुमचे काही दिवस खूप त्रासदायक जाणार हे नक्की. जखम आपल्या त्वचेच्या बाह्य पृष्ठभागावर असते त्यामुळे तिथे घर्षण होते व ती वातावरणाच्या संपर्कात देखील असते. जखमेतून थोड्या प्रमाणात रक्त येणे हे अपेक्षित असते, पण जर का खूप जास्ती रक्तस्त्राव होत असेल तर ते काळजीचे लक्षण आहे. जर का जखमेपाशी यीस्ट संसर्ग झाला असेल तर त्यातून दुर्गंध येतो. अशा वेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

५) सूज 

जर का जखम लाल रंगाची दिसत असेल आणि त्या भागात सूज असेल तर त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. जर का जखमेवर सूज असेल, तर कशाचा तरी खूप जास्ती संसर्ग झाला आहे हे नक्की आणि या परिस्थितीत तातडीने डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे. या परिस्थितीत तुमच्या टाचेला आणि पायाला देखील सूज येऊ शकते. सिझेरियन नंतरचे धोक्याचे इशारे माहीत झाले आहेत, तर आता कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून दूर राहा आणि काळजी घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon