Link copied!
Sign in / Sign up
42
Shares

सीताफळ आणि गाजर खाताय ना तुम्ही ?


सीताफळ आणि गाजर ही दोन्ही फळे आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि कोणती फळ खाल्याने कोणता फायदा होतो शरीराला ह्या गोष्टी तुम्हाला सर्वाना माहिती असायला पाहिजेच. तेव्हा ह्या दोन्ही फळाविषयी जाणून घ्या.

कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व आणि ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व यांचं उत्तम स्त्रोत असलेलं हे फळ आहे. त्याचप्रमाणे सीताफळात प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते म्हणूच सीताफळ खाणं फायदेशीर आहे.

पण सीताफळ हे थंड आहे म्हणून रात्री खाण्यापेक्षा सहसा दुपारी या फळाचे सेवन करावे. सीताफळ हे नेहमी जेवणानंतर एक दोन तासांनी खावे. त्यातून ज्यांना वरचेवर सर्दी-खोकल्याचा त्रास असेल त्यांनी सीताफळ खाऊ नये. सीताफळात मेदही असतं. म्हणूनच हे फळ अतिप्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बैठेकाम करणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे.

सीताफळ खाण्याचे फायदे 

१) शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.

२) अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.

३) छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो.

४) लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे.

गाजर खाण्याचे फायदे

* गाजरामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय गाजरात असणारे बिटा कॅरोटिन कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.

* थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.

* साधारणपणे आपल्याकडे बाजारात गाजर सहज उपलब्ध होते. गाजराची पाने आपण खात नाही. पण गाजरापेक्षा त्याच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात लोह असते. त्यामुळे अॅनिमिया दूर होतो.

* गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचे ज्यूस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

* गाजरात ए व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गाजर नियमित खाल्ल्यास चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.

* गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, बी इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांच्या आहारात गाजर असायलाच हवे. तसेच ज्यांना नाही त्यांनीही नियमित गाजर खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.

* अनेकदा बाहेरही गाजराचा ज्यूस मिळतो. तो पिण्यासही हरकत नाही. फक्त त्याठिकाणी स्वच्छता आणि वापरण्यात येणाऱ्या गाजरांची गुणवत्ता तपासून पहायला हवी. त्यामुळे आरोग्यास फायदा होतो हे निश्चित.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

साभार - लोकसत्ता 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon