Link copied!
Sign in / Sign up
77
Shares

श्वेतप्रदर(अंगावरून पांढरे जाणे)

श्वेतप्रदर म्हणजे काय 

श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून जाणे. श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे. रक्तव्यतिरिक्त योनीमार्गातून होणार  इतर स्त्रावांना  श्वेतप्रदर किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणेअसे म्हणतात.आणि ही लपवण्यासारखी आणि लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही. कधी कधी या स्त्रावाचा रंग पाण्यासारखा पांढरट किंवा पिवळसर असू शकतो. मासिकपाळीच्या काही दिवस आधी हा स्त्राव होऊ शकतो. तसेच  गर्भधारणा झाली असताना आणि संभोगा नंतर स्त्रवण्याची शक्यता असते. तसेच वयात येताना देखील असते होऊ शकते. सामान्य श्वेतप्रदरचे स्त्रावणे सामान्यतः जाणवत नाही. परंतु जाणवण्या इतपत पांढरे सतत अंगावरून जात असले  तर ते काळजीचे कारण आहे काही आजार नसतानाही हा पांढरा स्त्राव स्त्रवू शकतो. ही तक्रार ब-याच स्त्रियांना असते

श्वेतप्रदर काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१) योनी आणि गर्भाशयातील इन्फेक्शन ही  श्वेतप्रदराची प्रमुख कारणे  आहेत.

२) गर्भाशयाच्या मुखाला झालेली जखम,गर्भाशयाला आलेली सूज हे देखील श्वेतप्रदराचे कारण असू शकते.

३) सततचा गर्भपात आणि गर्भाशयाचा कर्करोग हे देखील सततच्या श्वेतप्रदराचे कारण असू शकते

४) सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण  होणारे ताण-तणाव हे देखील आजकाल स्त्रियांमधील श्वेतप्रदरचे कारण आहे.

 

पुढील परिस्थितीतील श्वेतप्रदराचे स्त्रावणे हे धोकादायक ठरू शकते

 

१) जाणवण्या इतपत अंगावरून पांढरे जाणे. योनीतुन काहीतरी बाहेर आल्याचे जाणवल्यास आणि असते वारंवार घडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

२) जर हा स्त्राव स्त्रवत असताना योनी मार्गात खूप खाज येत असले, खूप जळजळ किंवा दाह  होत असले तर हि गोष्ट डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.

३) श्वेतप्रदराला वाईट वास येणे तसेच पांढऱ्या किंवा पिवळसर रंग ऐवजी लाल किंवा हिरवा  रंग येणे हे योनीमार्गाच्या किंवा गर्भाशयाचे आजाराचे इन्फेक्शन चे लक्षण असू  शकते.

४) सतत श्वेतप्रदर स्त्रवत असताना अंग दुखणे, ताप ,कणकण  येणे

वरील लक्षणे दिसून आल्यावर  डॉक्ट्रांनाच सल्ला घेणे गरजेचे ठरते.

काही श्वेतप्रदर हे सामान्य असतात परंतु काही आणि सततचे श्वेतप्रदर हे काही गर्भाशय आणि योनी संबधी आजारचे लक्ष दर्शवतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon