Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

शिशूंमधील एच. पायलरी संसर्गाबाबत महत्वचे असे काही


कोणत्याही पालकांसाठी त्यांच्या बाळाच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. शिशुंना सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य तेवढे कितीही प्रतिबंधात्मक उपाय योजले, तरी त्यांना कोणता ना कोणता रोग वा संसर्ग होणे अटळ असते. या संदर्भात 'हेलिकोबॅक्टर पायलरी' या संसर्गाचा उल्लेख करणे अनिवार्य ठरते. हा संसर्ग प्रामुख्याने शिशू (१ ते ५ वर्षे वय) तसेच प्रौढ व्यक्तीं मध्ये देखील आढळतो.

एच. पायलरी हा एक ग्रॅम-नकारात्मक (जो ग्रॅम च्या चाचणी मध्ये नकारात्मक परिणाम देतो) आणि चक्राकार आकाराचा मायक्रोएयरोफिलिक जिवाणू आहे. त्याची वाढ आपल्या पोटामध्ये होते. जर याकडे दुर्लक्ष झाले आणि या संसर्गाचे निदान होऊ शकले नाही; तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि लहान आतड्यांमधील उतींची जळजळ, अल्सरची निर्मिती तसेच पोटांमधील (पाचक) व्रण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. विविध संशोधने आणि आरोग्याच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की शिशू आणि अर्भकांमधील एच पायलरीचा प्रादुर्भाव हा विकसनशील देशांमध्ये लक्षणीय आहे.

याच्या बहुतांशी रुग्णांमध्ये प्रारंभीच्या टप्प्यात एच पायलरी ची लक्षणे आढळून येत नाहीत. खरे पाहता, एच पायलरी जिवाणू हा मानवी शरीरात प्रवेश कसा करतो हे अजूनही अज्ञात आहे! तरीसुद्धा हा आजार सांसर्गिक असल्याकारणाने असे मानतात की, या जीवाणूंचा फैलाव हा संसर्ग झालेल्या व्यक्तीबरोबरच्या शारीरिक संपर्कामुळे होतो. निरोगी व्यक्तींमध्ये सुद्धा याचा प्रसार 'ऑरोफेकल' मार्गामधून (संसर्ग झालेल्या व्यक्तिच्या विष्ठेमधील जीवाणू निरोगी व्यक्तीच्या मौखिक पोकळीत प्रवेश करतात) होतो.

बालपणात किंवा शैशवावस्थेत प्रादुर्भाव झालेला एच पायलरी हा कालानुरूप भयंकर होत जातो आणि तो आरोग्याचे गंभीर नुकसान करु शकतो.

1) विविध आरोग्य अहवालांनुसार; जठराची सूज, जळजळ आणि अल्सर यांबरोबरच एच पायलरी संसर्ग आणि लोहाची कमतरता याचा संबंध संभवनीय आहे आणि त्यामुळे ऍनिमिया (रक्तक्षय) चा प्रादुर्भाव होऊ शकतो (अजूनपर्यंत ठोस पुरावा हाती लागलेला नाही).

2) बहुतांशी रूग्णांमध्ये जिवाणूंचे संक्रमण हे उत्प्रेरकाचे कार्य करते आणि त्यामुळे जठराचा क्षोभ आणि कर्करोग यांचा उदय होतो.

3) काही बालके आणि अर्भकांमध्ये या संसर्गामुळे 'गॅस्ट्रीक म्युकोसा- असोसिएटेड लिंफॉइड टिशू निंफोमास (MALTomas)' ची उत्पत्ती होऊ शकते. हा एक दुर्मिळ प्रकारचा व कमी दर्जाचा 'नॉन-होगकीन लिंफोमा' असून, याचा 'म्युकोसा- असोसिएटेड लिंफॉइड' (MALT) उतींच्या सीमांत क्षेत्रातील बी-सेल्समध्ये उदय होतो.

4) हा रोग संसर्ग झालेल्या बाळाच्या निरोगी वाढीवरही परिणाम करु शकतो (त्याची वाढ खुंटू शकते) तरीदेखील या मुद्द्याची विश्वासार्हता तपासण्यासाठी अद्याप संशोधन चालू आहे.

5) एच पायलरी मुळे शिशुंमध्ये उद्भवणारी आणखी एक समस्या म्हणजे 'गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स डिसीज' (GERD).GERD हा पंचनसंस्थेचा एक तीव्र आजार असून, यामध्ये पोटामधील आम्ल खालच्या दिशेने वाहण्या ऐवजी अन्ननलिकेकडे परत वाहते व त्यामुळे क्षोभ आणि छातीत जळजळ होते.

संबंधित लक्षणे

जर तुमचे बाळ खालीलपैकी कोणतेही लक्षण दाखवत असेल, तर लवकरात लवकर वैद्यांना दाखवणे हिताचे ठरते.

- पोटदुखी(वारंवार होणारी आणि असह्य वेदना देणारी) आणि बेचैनी

- भूक न लागणे

- मळमळ आणि ओकारी होणे

- आकस्मिक व जलद स्वरूपात वजन कमी होणे

- पेप्टिक अल्सर

- रक्तवर्णीय किंवा काळी विष्ठा (याला 'मेलेना' असेही म्हणतात)

- काही वेळास रक्ताची उलटीही होऊ शकते (हेमाटेमेसीस)

निदान व उपचार

एच पायलरी च्या उपस्थितीचा शोध घेण्यासाठी विविध निदान चाचण्या उपलब्ध आहेत, त्या पुढील प्रमाणे :

1) विष्ठा चाचणी:

संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये विष्ठा चाचणी ही विष्ठेतील एच पायलरी प्रथिनांची उपस्थिती दर्शवते.

2) रक्त चाचणी :

ही सहसा एच पायलरी च्या प्रतिद्रव्यांची उपस्थिती शोधण्यासाठी केली जाते.

3) एन्डोस्कोपी :

ही चाचणी अन्ननलिका, पोट आणि लहान आतडे यांचा आंतरिक अभ्यास करण्यासाठी वापरली जाते. हे जळजळ, अल्सर व इतर संबंधित एच पायलरी च्या उपस्थिती दाखवणाऱ्या लक्षणांचा शोध घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.

4) श्वासोच्छ्वास चाचणी :

या चाचणीत संबंधित व्यक्तीला युरिया असलेले द्रव्य पाजले जाते. कार्बन ची उपस्थिती (एच पायलरी युरियाचे कार्बन मध्ये विभाजन करते) हे एच पायलरी चा संसर्ग निर्देश करते.

अर्भकांची चाचणी ही विविध घटकांवर अवलंबून असते, जसे की -

- अर्भकाचे वय

- अर्भकाची विशिष्ट औषध वा उपचारासंबंधी असलेली संवेदनशीलता

- एच पायलरी जिवाणू हे पोटातील जळजळ आणि पेप्टिक अल्सर्स निर्माण करणाऱ्या आम्लाचे उत्पादन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच, बहुतांशी प्रकरणांत ही औषधे आम्लांची उत्पादने मंद करण्यासाठी वा रोखण्यासाठी दिली जातात. ती पुढीलप्रमाणे

- हिस्टेमीन अवरोधके (H2- ब्लॉकर्स) - नावाप्रमाणेच ही अवरोधके हिस्टेमीनला अडथळा निर्माण करतात व त्यायोगे पोटातील आम्लाचे उत्पादन लक्षणीयपणे नियंत्रित करतात.

- विशिष्ट संरक्षक कवच - हे आम्लांच्या हानिकारक परिणामांपासून आणि एच पायलरी जिवाणूंपासून पोटाचे अस्तर संरक्षित करते.

- प्रोटॉन पंप अवरोधके - हे सुद्धा पोटांतील आम्लाचे उत्पादन रोखण्यास मोलाची कामगिरी बजावतात.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon