Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

शिंक किंवा खोकला आल्यावर थांबवू नका नाहीतर जखमी व्हाल, हो खरंच


कुठे कुणाजवळ बसले असणार आणि अचानक तुम्हाला खोकला आणि शिंक येऊन जाते. आणि ती आल्यावर आपल्याजवळ ही व्यक्ती बसलीय, तुम्ही कुठे प्रवासात असाल, अशा वेळी त्या खोकल्याला आणि शिंकेला थांबवण्याचा प्रयत्न करता. आणि तो प्रयत्न करणे म्हणजे तुमच्या शरीरावर परिणाम करणे आहे. कारण ही नैसर्गिक गोष्ट असल्याने त्याला थांबवल्यास काही प्रमाणात तोटे सुद्धा होत असतात. तेव्हा त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ.

१) जेव्हा आपण शिकंतो तेव्हा तोंडावाटे अंदाजे ८० किमी/तास वेगाने हवा बाहेर फेकली जाते. आणि ही हवा जर इतक्या वेगाने येत असेल आणि तुम्ही खोकण्याऐवजी आणि शिंकण्याऐवजी ती शिंक थांबवून ठेवल्यास हवा आणि त्या हवेतील दबाव शरीरामध्येच अडकून राहतात. आणि हा दबाव तुमच्या शरीरातील अवयवावर त्यात बिघाड होत असतो.

२) ही शिंक थांबवल्यास काहीवेळा कानाचे पडदे फटू शकतात कारण हे स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात. आणि ह्यात रक्तवाहिनीही फुटून अंतर्गत रक्तस्त्रावही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

३) शिंक आणि खोकला थांबवून ठेवल्याने शरीराबाहेर येणारी हवा बाहेर न पडू दिल्यास ही हवा बुडबुड्यांच्या माध्यमातून छातीत साठून राहते. आणि ह्या कारणाने संसर्ग सुद्धा होऊ शकतो.

४) बळजबरीने शिंक थांबवण्याचा प्रयत्न केलास तर काहीवेळा फुफ्फुसे पूर्णपणे निकामी होऊ शकतात. खरं म्हणजे शिंक ही शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. शरीरामधील एखादा जंतू किंवा बॅक्टेरिया बाहेर टाकण्याची गरज असते त्यावेळी शिंक येते. त्यामुळे अशावेळेस शिंक थांबवल्यास ती हवा त्या जंतूसहीत शरीरामध्ये साठून राहून तुमची तब्बेत बिघडवण्यास कारणीभूत ठरु शकते. आणि ह्यावेळी खूप जोराने शिंकण्याची गरज असते. 

५) आणि जर तुम्ही शिंक थांबवण्याचा प्रयत्न केल्यास : एका व्यक्तीने अशीच आलेली शिंक थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यात जखमी झाला कारण शिंकेवाटे बाहेर येणारी हवा नाक व तोंड बंद करून रोखल्याने त्या व्यक्तीचा गळा सुजून त्याला गिळायला त्रास होऊ लागला आणि त्याच्या तोंडावाटून आवाज येणे बंद झाला. आणि हॉस्पिटलला ऍडमिट केल्यावर असे समजले की, त्याने शिंक थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून असे झाले. म्हणून कृपया करून खोकला व शिंक थांबवू नका. ते नैसर्गिक आहे. आणि शिंक व खोकल्यावर sorry म्हणू नका. ते नैसर्गिक आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon