Link copied!
Sign in / Sign up
57
Shares

शरीराची योग्य ठेवण आरोग्याच्या दृष्टीने कशी महत्वाची असते ते जाणून घ्या.

शरीराचा समतोल राखण्यासाठी ठेवण योग्य असली पाहिजे. लहानपणापासून आणि शाळेत पीटीच्या तासालाही ताठ उभे रहा, ताठ बसा असे आईवडिल, सतत सांगत असायचे हे आपल्याला आठवत असलेच. शरीराची योग्य ठेवण व्यक्तीला थकवा येऊ देत नाही. योग्य वजन, योग्य ठेवण असणाèया व्यक्ती अधिक काळ कार्यशील राहू शकतात.

शरीराची ठेवण योग्य असल्यास केवळ उंच, सडपातळ दिसता असे नव्हे तर आत्मविश्वासही वाढतो. पण अधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून ठेवण योग्य राहात नाही. सतत कॉम्प्युटरसमोर बसून किंवा बैठी कामे करून मणका सरळ राहात नाही तर तो वाकलेल्या अवस्थेत राहतो. विविध मशीनचा वापर करत असल्याने मान खालच्या दिशेने वाकलेली तर पाठीला पोक आलेला असतो.

योग्य ठेवण 

शरीराची ठेवण योग्य म्हणजे सर्व स्नायू आणि हाडे एका सरळ रेषेत असणे. त्यामुळे मज्जासंस्था चांगल्या प्रकारे काम करु शकते. व्यक्ती बसलेली किंवा उभी राहलेली असेल तर हाडे, स्नायू, लिगामेंट आणि अस्थिबंध हे सर्व योग्य क्षमतेने कार्य करु शकतात. प्रत्येक अवयव योग्य प्रकारे योग्य जागी असला पाहिजे.

शरीराची अयोग्य ठेवण

शरीराची ठेवण योग्य नसल्यास त्याचे शारिरीक परिणाम होताना दिसतात.

पोक येणे.

पाठीत शक्ती नसणे,

खांदे पुढे किंवा मागे ओढणे

श्वसनावर परिणाम

उंची कमी भासणे

शरीराची ठेवण योग्य नसल्यास माकडहाडाचा समतोल बिघडतो. तसेच सांधेदुखी, अपचन, श्वसनाचे आजार इत्यादी उद्भवू शकतात. काम करण्याची क्षमता कमी होते. वय जसे वाढते तशी ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

योग्य ठेवणीसाठी काही पथ्ये-

वजनावर नियंत्रण-

वजन खूप जास्त वाढल्यास पाठीच्या कण्यावर ताण येऊन ठेवण बदलू शकते.

गादी-

गादीवर झोपताना त्याने मणक्याला आधार, आराम मिळतो का नाही हे पाहणे महत्त्वाचे अन्यथा पाठदुखी होणार.

कार्यालयीन जागा-

दिवसातील बहुतांश वेळ ऑफिसमध्ये बसलो असताना पाठीलाच्या खालच्या बाजूला आधार देणारी खुर्ची असावी. पाय जमिनीवर टेकतील अशा प्रकारची असावी. तसेच डोळ्यांच्या सरळ रेषेत स्क्रीन असली पाहिजे. जेणेकरून पाठ आणि मानेवर ताण येणार नाही.

शरीराला ताण-

एकाच जागेवर एकाच स्थितीत बराच वेळ काम केल्याने शरीराची ठेवण बिघडू शकते. त्यामुळे शरीराला ताण देणे महत्त्वाचे

योग्य पादत्राणे-

उंच टाचेच्या चपला बराच काळ वापरल्यास शरीराला त्रास होतो पाय, गुडघे आणि पाठीच्या मणक्याला आधार देणारे पादत्राणे घालावीत.

काही व्यायाम प्रकार

 शरीराची ठेवण योग्य पद्धतीची ठेवण्यास मदत करतात. त्यात योगासनांचाही समावेश आहे.

प्लांक-

योग्य ठेवण म्हणजे मजबूत अंगकाठी महत्त्वाची त्यासाठी प्लांक हा उत्तम व्यायाम आहे. एकाच वेळी अनेक स्नायूंना मजबुती देतो. योग्य प्रकारे केल्यास पोटाच्या स्नायूंना बळकटी देतो. तसेच खांदे आणि पाठ हे देखील मजबूत होतात. प्लांकमध्ये काही वेगळे प्रकारही आहेत. प्लांक करताना पोटावर झोपावे. हाताचे तळवे जमिनीकडे आणि कोपरापर्यंत हात टेकवावे. पायाची बोटे टेकवावी मग कोपरा पर्यंत टेकवलेल्या हातावर संपूर्ण शरीराचा भार तोलावा. सुरुवातील ३० सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करावा. जसी ताकद वाढेल तसे कालावधी वाढवावा.

क्रंचेस-

यामुळे ही पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो आणि पोटावरची चरबी कमी होते. पाठीवर झोपावे. पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्यावेत. हात डोक्यामागे ठेवावे. वर येताना श्वास सोडावा डावा खांदा उजव्या पायाला आणि उजवा खांदा डाव्या पायाला लावण्याचा प्रयत्न करावा. श्वास घेत पुन्हा मागे पूर्वस्थितीला यावे. दुसèया बाजूनेही अशाच प्रकारे व्यायाम करावा.

डंबेल साईड बेंड-

यासाठी कमी वजनाचे डंबेल वापरायचे असतात. हातात डंबेल धरावेत. ताठ उभे रहावे. घरी डंबेल नसतील एक लीटरची पाण्याची भरलेली बाटलीचा वापर करु शकतो. पायात एक फुट अंतर घेऊन उभे रहावे. हात सरळ खाली असावेत. आता एका बाजूला वाकावे. पायाच्या पोटरीपर्यंत हात सरळ खाली न्यावा. मग दुसèया बाजूनेही तसेच करावे. सुरुवातीला दोन्ही बाजूला दहा वेळा रिपीट करावे.

 

या बरोबरच इतरही काही व्यायाम आहे जसे पायलट स्विमिंग, संतुलन, रोईंग, रिव्हर्स डंबेल फ्लाय. पण हे घरी करण्यापेक्षा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे अधिक योग्य ठरते.

योगासने-

ताडासन-

योग्य पद्धतीने उभे राहाण्यासाठी हे उत्तम. सरळ उभे रहावे. पायाची बोटे आणि पंजे समांतर ठेवून हात कमरेला लावून उभे रहावे. हळूहळू हात खांद्यापर्यंत आणून डोक्याच्या वर सरळ नेत तळपायावर उभे रहावे. पुन्हा हळू हळू पूर्वस्थितीत यावे. या आसनामुळे सर्वांगाला ताण बसतो आणि पायांचे स्नायू आणि पंजे मजबूत होतात.

भुजंगासन -

यामुळे छाती आणि खांदे पसरतात आणि खांदे मजबूत होतात. पोटावर झोपावे. हात खांद्यापाशी आणावेत. हनुवटी फरशीला लावावी. दोन्ही पाय जोडावेत आणि कंबरेपासून शरीर मागे न्यावे. जसा साप मागे वळून पाहतो तसेच हे दिसते म्हणून त्याला भुजंगासन म्हणतात.

मार्जरासन -

कणा लवचिक होण्यासाठी हे आसन उत्तम. मांजरीप्रमाणे चार पायांवर गुडघ्याच्या आणि हाताच्या सहाय्याने उभे रहा. जसे मांजर उभे राहते. पाठ सरळ असली पाहिजे. खांद्याच्या रेषेत हात ठेवा. दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर असावे. सरळ पहावे. श्वास आत घेत हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या बाजूला न्यावे. हळु हळु श्वास सोडत पुर्वीच्या स्थितीत यावे.

 

या व्यायामाबरोबर नेहमीच्या उठण्या बसण्याच्या सवयींवर लक्ष द्यावे. ताठ बसणे, चालणे तसेच वजन नियंत्रित ठेवा तसेच कोणतेही वजन उचलताना त्यांचा भार दोन्ही खांद्यावर समान असेल याकडे लक्ष द्या.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon