Link copied!
Sign in / Sign up
94
Shares

आयुष्यात शाररिक आणि मानसिक सकरात्मकता (पॉझिटिव्हिटी) यावी यासाठी काही मार्गदर्शक उपाय

शारीरिक सकारात्मकता म्हणजे काय? सोपे आहे! प्रश्नामध्येच उत्तर दडलेले आहे. शारीरिक सकारात्मकता म्हणजे स्वतःच्या शरीराबाबत सकारात्मक असणे आणि सकारात्मक भावना ठेवणे. एक आदर्श किंवा योग्य शरीर कसे असावे; याबाबतचे समज आणि सामाजिक बंधने असतानादेखील स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्यास शिकणे. शारीरिक सकारात्मकता म्हणजे तुमच्या शरीराचा त्याच्या सर्व वैशिष्ट्यांसह (जरी त्यातील काही वैशिष्ट्ये बाकीच्यांना दोष वाटत असले तरी) स्वीकार करणे आणि त्यावर प्रेम करणे. याचा अर्थ म्हणजे तुमच्या शरीरासाठी जे चांगले वाटते, तसेच आरोग्यदायीही आहे; अशा गोष्टी सामाजिक अपेक्षांची चिंताही न करता करणे.

प्रत्येक मनुष्य परिपूर्ण होण्यासाठी धडपडत असतो. हे परिपूर्णत्व जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये असू शकते. त्यातीलच एक म्हणजे आपले शरीर आणि त्यांचे बाह्यरूप! आपल्याकडे पुष्कळजण मीडियामध्ये दिसणारी मॉडेल्स आणि प्रसिद्ध व्यक्तीसारखी शरीरयष्टी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. परंतु पुष्कळ लोकांना हे समजत नाही की, परिपूर्ण बनण्याची कल्पना हे फक्त समाजाने लादलेले ओझे आहे. ते फक्त आपण मनुष्यांनी कोणत्यातरी गोष्टीला परिपूर्ण म्हणून ठरवलेले आहे. खरेतर परिपूर्ण म्हणून कोणतीही गोष्ट नसते. म्हणून ते प्राप्त करणे हे असाध्य आहे.

आपण सर्वच अपरिपूर्ण असतो; पण तेच आपणाला व्यक्ती म्हणून विशेष बनवते. जर आपण सर्वच सारखे परिपूर्ण असतो; तर मग आपल्या व्यक्तिमत्वाला काहीच अर्थ राहणार नाही. स्त्री, पुरुष, पिता आणि माता म्हणून आपणा सर्वांना हे कळणे महत्त्वाचे आहे. जे खरोखर महत्त्वाचे आहे; त्यावर आपण आपले लक्ष रिकेंद्रित केले पाहिजे: ते म्हणजे आपण कोण आहोत याचा स्वीकार करणे, आपणासाठी काय आरोग्यदायी आहे ते करणे.

शारीरिक सकारात्मकता प्राप्त करण्यासाठी आपण या सात पद्धती आजमावू शकतो:

१) स्वीकार

जगातील अनेक लोकांमध्ये (मग ते पुरुष असो वा स्त्री) आढळणारी एक वाईट सवय म्हणजे त्यांच्यामध्ये स्वतःवर चिडण्याची वा आपण जसे दिसतो, त्यावर दुःखी असण्याची प्रवृत्ती असते. मग ती उंची असो वा त्वचेचा रंग वा काही विशेष बाबी (तीळ, डाग, इत्यादी).

शारीरिक सकारात्मक बनण्याची पहिली पायरी म्हणजे या राग आणि दुःखाचा त्याग करा. तुम्ही त्या नवीन टीव्ही शोमधल्या अभिनेत्रीसारखे दिसत नाही; म्हणून नाराज होऊ नका. तसे तुम्ही दिसत नाही आणि तुम्ही त्या अभिनेत्री नाही, याचा स्वीकार करा. तुम्ही तुम्ही आहात. तुम्ही बाळाला जन्म दिलेला असेल वा ज्या कुणी दिलाय, त्यांना आधार देण्यासाठी उपलब्ध असालच. ती एक खूप तणावग्रस्त वेळ असते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणे साहजिकच आहे. स्ट्रेच मार्क्सबद्दल किंवा अतिरिक्त वजनाबद्दल चिडू नका. ते तेथेच आहेत याचा स्वीकार करा.

२) आहार

तुम्हाला आवश्‍यक ते पोषण देणारे पथ्य पाळा. ज्यामुळे तुम्हाला आरोग्यदायी वाटेल असाच आहार घ्या. संतुलित आहारामुळे तुमचे शरीर निरोगीपणे आणि सुरळीतपणे कार्य करेल. जर तुम्हाला तुम्ही थोडे लठ्ठ आहात असे वाटत असेल तर स्वतःचे हाल करू नका. तसेच जर तुम्ही खूपच सडपातळ आहात असे वाटत असेल तर जास्त खात सुटू नका. योग्य प्रतीचे आणि योग्य प्रमाणात आहार घ्या, ज्यामुळे तुमच्या शरीराला आरोग्यदायी वाटेल आणि अयोग्य पदार्थ खाणे टाळा. कधीकधी बाहेरचे खाण्यात गैर नाही; पण ते प्रमाणात असेल याची काळजी घ्या.

३) व्यायाम

व्यायामाचा अर्थ असा नव्हे की, काही कॅलरीज खर्च करण्यासाठी दररोज तुमच्या शरीराचे हाल केले पाहिजेत! त्याचा अर्थ म्हणजे तुमच्या शरीराला कार्यरत ठेवणे, तुम्हाला निरोगी ठेवतील अशा शारीरिक क्रियांमध्ये गुंतवून ठेवणे. तुमची जीवनशैली ही निरोगी आणि आरोग्यपूरक आहे ना, याची खात्री करून घ्या. शरीराबाबत दक्ष राहा; म्हणजे तुम्हाला अधिक बरे वाटे.ल तुम्ही जे करता त्याचा आनंद लुटा; म्हणजे तुम्हाला सुखी आणि तंदुरुस्त वाटेल. व्यायामाचे ध्येय हे समाधान प्राप्त करणे आहे; वजन घटवणे (वा वाढवणे) नव्हे!

४) संवाद

जर तुम्ही तुमच्या शरीराबाबत बोलणार असाल; तर त्याबाबत सकारात्मकतेने बोला. तुम्ही निरोगी राहण्यासाठी जे उपाय योजले आणि त्यांचा परिणाम काय झाला, याबाबत बोला. तुमचे आरोग्य जपण्यासाठी आता काय करत आहात, त्याबाबत बोला. त्याच वेळी हे संवाद कमीत कमी वेळात होतील, त्याचा प्रयत्न करा. कारण याबाबत जितके तुम्ही बोलाल; तितक्या प्रमाणात तुमचे मन नकारात्मक विचारांकडे ओढले जाईल. तुमच्या शरीराबाबत नकारात्मकपणे बोलू नका. तुमच्या शरीराची विशिष्ट बाजू का आवडत नाही; याबाबत बोलू नका आणि असे संवाद शक्यतो टाळा.

५) तुलना

चुकीच्या प्रेरणेच्या भरात पुष्कळ वेळा लोक त्यांच्या शरीराची बाकी लोकांच्या शरीराबरोबर तुलना करतात. जे अधिक चांगले दिसतात असे तुम्हाला वाटते; त्यांच्याबरोबर तुमच्या शरीराची तुलना करण्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. हे तुम्हाला अधिक आरोग्यकारक सवयी अंगीकारण्यास उद्युक्त करेलही; पण तुमचे शरीर अजून तितके चांगले नाही ही नकारात्मक भावना तुमच्या मनात राहीलच! तथापि तुम्ही तुमच्या मानाने जे कमी तंदुरुस्त आणि निरोगी आहेत, त्यांच्याशी स्वतःची तुलना करू शकता.

याचे दुष्परिणाम म्हणजे हे तुम्हाला अधिक तुलनात्मक बनवते आणि तुमच्यात नकारात्मक भावना उद्दीपित करू शकते. तसेच हे तुम्हाला आत्मसंतुष्ट बनवू शकते. कारण यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहात; जरी तुम्ही प्रत्यक्षात तितके तंदुरुस्त नसला तरीही! जर तुम्हाला तुलना करायचीच असेल; तर आपल्या भूतकाळातल्या व्यक्तिमत्त्वाशी करा. तुमच्यात किती सुधारणा झाली आहे; हे पहा आणि त्यात संतोष माना (त्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका).

६) कौतुक करा

जर तुमच्या शरीराबाबत तुम्हाला निराश वाटत असेल; तर स्वतःला एकदा आरशात पहा. ज्या गोष्टी तुम्हाला नकारात्मक वाटत आहेत; तिथे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या शरीराच्या चांगल्या बाबींकडे आपले लक्ष केंद्रित करा. तुमच्या सुंदर डोळ्यांचे, आकारात आलेल्या पायांच्या स्नायूंचे किंवा अगोदरपेक्षा अधिक सुडौल असलेल्या बाहूंचे कौतुक करा.

 

 

ज्यांना तुम्ही दोष मानता; त्याबाबत विचार करताना अधिक सकारात्मकतेने विचार करा. जेव्हा तुम्ही तुमचे स्ट्रेच मार्क्स बघता; तेव्हा त्याबरोबरच आलेल्या सुंदर बाळाचाही विचार करा. जेव्हा तुम्ही बाळंतपणामुळे आलेले व्रण (ब्लेमिश) बघता; तेव्हा बाळंतपणात दाखवलेल्या धैर्याचे आणि शक्तीचे ते प्रतीक माना. जेव्हा तुमच्या पोटाभोवतालची अतिरिक्त चरबी बघता; तेव्हा तुम्ही तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घेत व्यतीत केलेल्या रात्री आठवा.

७) वजन

सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या विशिष्ट भागांना आणि बाह्यरूपाला देत असलेले महत्त्व कमी करा. त्यांना तुम्हाला स्वतःविषयी वाईट वाटून देण्याची शक्ती प्रदान करू नका. जेव्हा कोणी तुमचे कौतुक करेल; तेव्हा खुल्या दिलाने त्याचा स्वीकार करा. एक आदर्श किंवा चांगले शरीर कसे दिसते, याबाबतच्या समाजाच्या आणि प्रसार माध्यमांच्या कल्पनांना महत्त्व देऊ नका. स्वतःला स्वतःची तंदुरुस्तीची भावना आणि महत्त्व प्रदान करा.

शारीरिक सकारात्मकतेचे महत्त्व हे तुमची स्वतःची पत आणि आत्मविश्वासापेक्षाही भरपूर जास्त आहे. तुमच्या बाळाबद्दल विचार करा. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराबाबत नाराजी व्यक्त करता; तेव्हा त्यांचे कान हे सर्व ऐकत असतात; जरी तुम्हाला याची जाणीव नसते तरी! या भावनेचा तुमच्यावर जसा प्रभाव पडतो; तसाच त्यांच्यावरही पडतो. स्वतःची किंमत आणि स्वतःविषयीचे मत याबाबतच्या कल्पना त्या त्यांच्या पालकांकडूनच उचलतात. त्यांना नेहमीच आणखी काय पाहिजे, यापेक्षा आपल्या स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिकवा!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon