Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

शांत झोप येत नाहीये ? तेव्हा हे जालिम उपाय करा... मग कशी झोप लागत नाही

तंदुरुत राहाण्यासाठी आहार,विहार, व्यायाम यांच्याबरोबरच महत्त्वाची असते ती झोप. अपुरी झोप ही अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे शांत आणि पुरेशी झोप मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हल्लीच्या आयुष्यात धावपळ, तणाव हे शब्द अगदी परवलीचे झाले आहेत. अपुरी झोप ही समस्या प्रत्येकाची आहे. झोप पुरी करण्यासाठी गोळ्यांचा आधार घेतला जातो. त्याचे नकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतात.

काही लोक अगदी गादीवर पडल्या पडल्या गाढ झोपून जातात. तर काही लोकांना मात्र झोप न लागल्याने बैचेनी येते. या लोकांना धड शांत झोप लागत नाही आणि ते रात्रभर अस्वस्थ असतात.

शांत आणि पूर्ण झोप झाल्यास अनेक आजारांपासून दूर राहाता येते. त्यामुळे उत्साह वाढतो शिवाय उर्जाही टिकून राहते. झोप अपुरी झाल्यास दिवसभर सुस्तपणा जाणवतो.

शांत झोपेसाठी काही गोष्टी करून पाहता येतील. त्याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत पण झोप मात्र व्यवस्थित पूर्ण होण्यास मदत होते.

काय करावे -

योग्य उशी-

बहुतेकांना झोपताना उशी घेऊन झोपायची सवय असते. गळा आणि डोक्याला आधार देण्यासाठी उशीची आवश्यकता असते. त्यामुळे पाठीचा मणका सरळ राहू शकतो. उशीची निवड हा देखील झोप नीट लागण्यासाठीचा निकष आहे. खूप कडक उशी न घेता नरम उशीची निवड करावी.

योग्य आहार-

झोपण्यापुर्वी अतिजेवण केल्यास झोप न लागण्याची शक्यता असते. जास्त जेवण केल्याने शरीराचे तापमान वाढते त्यामुळे झोप येत नाही. कमी जेवावे असे नाही तर थोडी भूक राखून जेवावे. जेवणात सूप, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. रात्री जेवल्यानंतर चहा कॉफी सारखे उत्तेजक पेय घेणे नक्कीच टाळले पाहिजे.

पूरक आहार-

झोपेसाठी मॅग्नेशिअम हे नैसर्गिक खनिज मदत करते. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. स्नायू आणि मेंदू यांच्यावरील ताण कमी होतो. कॅल्शिअमची कमतरता असेल तर झोप येत नाही. दूध, ओटस आणि अंजीर यांचे सेवन करावे.

प्रकाश नसावा-

झोपण्याच्या खोलीत तीव्र प्रकाश असेल तर झोप येत नाही. कमी प्रकाशात शरीरात मेलोटोनिन नावाचे हार्मोन स्रवते. त्यामुळेच झोप येते.

दूध

झोपण्याआधी गरम दूध प्यावे. उत्तम कॅल्शिअमचा स्रोत असलेल्या दुधा ट्रिप्टोफेन आणि सेरोटोनिन हे घटक झोप येण्यास मदत करतात. दुधात बदाम घालूनही प्यायल्यास अधिक फायदा होता.

मसाज-

झोपण्याआधी १०-१५ मिनिटे पायाच्या तळव्यांना हळुवार मालिश करावी. मालिश करण्यासाठी तिळाचे, बदामाचे किंवा खोबरेल तेल वापरावे. पुर्वी काशाच्या वाटीने पाय चोळले जात असे.

हर्बल चहा-

वास्तविक कॅफिन किंवा अल्कोहोल हे झोप न लागण्यासाठी कारणीभूत असतात. पण रात्री झोपण्यापुर्वी हर्बल चहा प्यायल्यास मात्र चांगली झोप लागते.

आयुर्वेदिक उपाय-

सर्पगंधा, अश्वगंधा आणि भांगेच्या काड्या समप्रमाणात घ्याव्यात. त्यांचे चूर्ण तयार करावे. रात्री झोपताना ३-५ ग्राम चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास झोप उत्तम लागते.

अश्वगंधा, ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी, मुलहटी, आवळा,जटामासी, कारळे, ओवा हे सर्व प्रत्येकी ५० ग्रॅम घ्यावे आणि त्याचे बारीक चूर्ण करावे. रात्री झोपण्यापुर्वी ५ ग्रॅम चूर्ण दुधासमवेत घ्यावे. एका आठवड्यात या चूर्णाचा फायदा दिसू लागतो.

त्या शिवाय जायफळ दुधात उगालून घेतल्यास फायदा होतो. कारण जायफलाने गूंगी येते. 

संगीत ऐकणे-

मनावर ताण आला असेल तर बैचेनीमुळे झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या आवडीचे गाणे ऐकावे किंवा पुस्तक वाचावे. त्यामुळे मन शांत होण्यास मदत होते.

दीर्घश्वसन-

गादीवर पडल्यावर शवासन करतो त्याप्रमाणे दीर्घश्वसन करावे, मन शांत करावे. सकारात्मक विचार आणावेत. त्यामुळे स्नायू हलके ताणरहित होतील.

अंघोळ-

जेवणानंतर लगेच अंघोळ करू नका. त्यामुळे अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो परिणाम झोपही लागत नाही.

गॅजेटस 

रात्रीचा थोडा निवांत वेळ असतो म्हणून अंथरूणात पडल्यावर दिवसभर मेसेज, गेम्स आणि सोशल नेटवर्क सर्फिंग करतो. मात्र झोपण्याच्या आधी २० मिनिटे टीव्ही, कॉम्प्युटर किंवा मोबाईल कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू नका.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon