Link copied!
Sign in / Sign up
179
Shares

लहानग्यांसाठी डब्यासाठी काही पौष्टिक रेसिपी

प्रत्येक आईला रोज एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांच्या डब्यात काय द्यायचे. मुले लहान असतात तोवर डब्यात थोडासा खाऊ दिला तरी चालतो मात्र जशी मुले शिशु वर्गात, मोठ्या वर्गात जातात तसे त्यांना पोटभरीचा मुख्य म्हणजे पौष्टिक डबा देणे आवश्यक असते. आईला वाटते की पौष्टिक चौरस पदार्थ जे घरी शिजवलेले असतील आणि शक्यतो पोळी भाजी सारखे असतील पण मुलांना मात्र काहीतरी चटकदार पदार्थ हवे असतात. क्वचित अधून मधून मुलांना आवडणारे पनीर, चीज, ब्रेड यांचेही विविध प्रकार करून देता येतील. अनेक पदार्थांचे घटक बदलून विविध प्रकार करता येतात.

आपण काही पारंपरिक आणि काही अधुनिक पदार्थ पाहू जे पौष्टिक असतील आणि चटकदारही.

उपमा -

रवा, मटार, कांदा, कॉर्न, गाजर, दाणे आदींचा समावेश करून उपमा करु शकतो. यात चरबीचे किंवा तेलाचे प्रमाण कमी असल्याने त्याचे पोषणमूल्य चांगले असते. शिवाय अधिक आकर्षक करण्यासाठी त्या काजू तळून घालता येतात. उपम्यावर बारीक शेव टाकून किंवा नारळाच्या चटणीबरोबरही उपमा देतो येतो.

गॅसवर एकीकडे पाणी गरम करायला ठेवावे. दुसèया गॅसवर कढईत तेल तापवून त्यात मीठ, qहग आणि उडीद डाळ टाकून फोडणी करावी. त्यात जाड रवा घालून चांगले परतून घ्यावे. त्यात आवडीची कोणतीही भाजी आणि मीठ व साखर घालून पुन्हा परतून घ्यावे. मग गरम पाणी म्हणजेच आधणाचे पाणी घालून सगळे एकत्र करून त्यावर झाकण ठेवून दणदणीत वाफ काढावी. झाकण काढून पुन्हा हलवून गॅस बंद करावा. डब्यात देताना त्यावर बारीक चिरलेली कोथिं बीर आणि खोवलेला नारळ घालून द्यावा. असल्यास तळलेले काजू देखील घालावेत.

असाच उपमा तयार शेवयांचाही करता येतो.

शिरा

शिरा गुळाचा आणि साखरेचा असा दोन पद्धतींनी करता येईल. उपम्याप्रमाणेच यालाही आधणाचे पाणी करावे. गॅसवर कढई ठेवून त्यात साजूक तुप घालावे. गरम झाले की त्यात रवा घालून तो छान खमंग सोनेरी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात मनुका, काजू, बदाम यांचे काप घालावेत. मग आधणाचे पाणी घालावे. एक वाटी रव्याला दोन वाटी पाणी अशा प्रमाणात पाणी घालून झाकण ठेवावे. चांगल्या वाफेवर ते शिजू द्यावे. आवडत असल्यास अर्धे पाणी आणि अर्धे गरम दूध घालावे. शिजल्यावर झाकण काढून त्या गोडाच्या आवडीनुसार गुळ किंवा साखर घालावी. पुन्हा सर्व एकत्र करून त्यावर झाकण ठेवावे. वाफ आली की झाकण काढून हलवून घ्यावे मग वेलदोड्याची पूड असल्यास केशर घालावे. यात आवडत असल्यास पिकलेल्या केळीचे तुकडेही घालता येतात.

रव्याचा वापर करून आणखीही काही रेसिपी करता येतील.

उत्तप्पा 

रवा दह्यात भिजवून ठेवावा. दोन तासाने त्यात कोथिं बीर, कांदा चिरून घालावा. हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकावे, मीठ, चवीपुरती साखर घालावी. चांगले एकजीव करून नॉनस्टिक तव्यावर त्याचे डोसे घालावेत. नारळाच्या चटणी बरोबर किंवा मुलांच्या आवडीच्या सॉस बरोबर डब्यात द्यावे. त्याव्यतिरिक्त तांदुळाचे डोशाचे पीठ असेल तर त्याचेही डोसे किंवा उत्तपा करून देता येईल.

ईडली फ्राय

रव्याची इडली पचण्यास हलकी असते. त्यामुळे रवा भिजवून त्याच्या इडल्या कराव्यात. इडल्या गार झाल्या की त्याचे तुकडे करा. कढईत तेल टाकून त्याला मोहरी, कढी पत्ता हिंग यांची फोडणी करून त्यात हे तुकडे परतावेत. मुलांना डब्यात हा पदार्थ नक्की आवडेल.

आता काही पराठ्यांचे प्रकार पाहूया.

साधा पराठा-

कणकेत मोहन आणि मीठ घालून भिजवा आणि हव्या त्या आकाराचे पराठे करा. मुलांना डब्यात देताना तूप किंवा लोणी लावून खमंग भाजून द्या. या पराठ्याबरोबर चटणी, भाजी किंवा तुपसाखर देऊ शकता.

पालक पराठा- पालक अर्धवट शिजवून घ्या. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करा आवडत असल्यास लसूण घाला त्यात मावेल तितकी कणीक, मीठ, तिखट किंवा मिरचीचे वाटण घाला. जाडसर पराठा लाटून खमंग भाजा.

आलू पराठा-

हा पराठा बहुतेक मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतो. बटाटे उकडून घ्यावेत. ते खिसणीवर खिसून घ्यावे त्यामुळ गुठळी राहात नाहीत. त्यात मीठ, जिरेपूड, आले लसणाचे बारीक वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सारण तयार करून घ्यावे. आता कणकेत मोहन, मीठ घालून घट्ट भिजवून घ्या. कणकेची पारी करून त्यात वरील सारणाचा गोळा भरावा आणि आवडीप्रमाणे तूप किंवा लोणी लावून भाजावे.

मेथी पराठा-

मेथी धुवुन बारीक चिरून घ्या. त्यात लसणाची पेस्ट घाला. आवडत असल्यास एक चमचा दही आणि उकडलेला बटाटा खिसून घाला. हळद, तिखट, मीठ, धणे जिरे पूड घाला. एकत्र करून घ्या. थोडावेळा मिश्रणाला पाणी सुटेल त्यात मावेल तेवढी कणीक घालून पीठ मळा. मग पराठे करा.

अशाच प्रकारे दुधी भोपळ्याचा, लाल भोपळ्याचा, बिट उकडून, मुळ्याचा, कोबीचा, कांदा पात, कोथिं बीर असे विविध चवींचे पराठे करता येतात.

मुलांची चटकदार आवड जपण्यासाठी पराठ्यांमध्येही थोडे वेगळे प्रयोग करता येतील.

कांदापात चीझ पराठा-

कांदापात बारीक चिरावी त्यात चीझ किसून घालावे. मुलांना तिखट झेपत असल्यास हिरवी मिरची बारीक करुन घाला. थोडे मीठ घाला. चीझमध्ये मीठ असते हे लक्षात ठेवून मीठ घाला. आता त्यात मावेल तेवढी कणीक घालून पराठे लाटा.

पनीर पराठा-

पनीर खिसणीने खिसून घ्यावे. त्यात बारीक चिरलेली कोथिं बीर, थोडीसे तिखट किंवा हिरवी मिरची, आमचूर पावडर आणि मीठ घालावे. कणीक मोहन घालून भिजवून घ्यावी. कणकेच्या पारीत हे मिश्रण भरून पराठे करावेत. यामध्येही सारण एकसारखे रहावे म्हणून लहानसा बटाटा खिसून घालू शकता. किंवा उकडलेले मक्याचे दाणे बारीक करुन घालू शकता.

विविध प्रकारचे पराठे करता येतात. शिवाय फक्त कणीक न वापरता मिश्र पिठांचेही पराठे करता येऊ शकतात.

अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मेथीच्या, पालकाच्या, बटाटाच्या पुèया करता येतात.

त्याव्यतिरिक्त काही चटपटीत प्रकार पाहूया

कणीस वडे-

मक्याचे कणीस खिसून घ्यावे. त्यात आल लसूणची पेस्ट, मिरची किंवा तिखट मीठ, हळद घाला. कोथिं बीर घालावी. त्यातच मावेल तेवढे डाळीचे पीठ म्हणजे बेसन घाला. एक चमचा तांदळाचे पीठ घाला. मध्यम आकाराचे वडे तळून घ्या. सॉसबरोबर मुले नक्कीच चट्टा मट्टा करतील.

बटाटे वडे-

बटाटे उकडून बारीक करुन घ्या. कढईत फोडणी करून त्यात आलं लसूण, मिरचीचे वाटण घाला. गरज असल्यास मीठ आणि हळद घाला. छान परतून गॅस बंद करा. गार होऊ द्या. एका भांड्यात बेसन पीठ, हळद, मीठ, तिखट टाकून ते सरबरीत भिजवा. खूप घट्टही नको अति पातळही नको. गार झालेल्या सारणाचे गोलाकार चपटे गोळे करा. बेसन पीठात भिजवून गरम तेलात तळून घ्या.

ब्रेड रोल्स-

बटाट्याचे वड्यांप्रमाणे सारण करु घ्या. आता ब्रेडच्या कडा काढून टाकून कडांना पाणी लावून घ्या. ब्रेड स्लाईस वर सारण घालून हाताने वळून रोलचा आकार द्या. ओल्या कडा चांगल्या बंद करा. मोठ्या आचेवर कडकडीत तेलात तळून घ्या.

 

चीज चटणी सँडवीच 

ब्रेडला एका बाजूला पुदीना चटणी लावा. त्यावर चीझ किसून किंवा स्लाईस घाला. त्यावर पुन्हा चटणी लावलेला ब्रेड ठेवा. तुकडे करून मुलांना द्या.

टोस्ट सँडवीज-

ब्रेड स्लाईसला पुदीना चटणी लावा त्यावर उकडलेल्या बटाट्याची चकती, टोमॅटोची चकती झाला. त्यावर चीज किसून घाला. मीठ थोडी मिरपूड भुरभुरवा. त्यावर दुसरा स्लाईस ठेवून त्यावर बटर लावून टोस्ट करा.

अशा प्रकारे भाज्या, अंडे, ऑम्लेट याचेही सँडवीज करता येते.

पोळीची फ्रॅकी

त्यासाठी विविध भाज्या, कॉर्न वापरू शकतो. एका पोळीवर चीझ किसून घाला. मायक्रोव्हेव मध्ये ती थोडी गरम करून घ्या जेणेकरून चीझ वितळेल. बाहेर काढून त्यावर भाज्या किंवा कॉर्नचे दाणे घाला. मीठ मिरपूड घाला. पोळीचा रोल करा फ्रॅकी तयार.

       या व्यतिरिक्त मोडाची कडधान्ये थोडी उकडून त्यावर चाट मसाला पेरूनही मुलांना डब्यात देऊ शकता. आवडत असेल तर ऑम्लेट, उकडलेले अंडे ही डब्यात देऊ शकता. तसेच फळेही मुलांना एखादवेळी देता येऊ शकते. यामुले आई ला मुलांना पौष्टिक खाऊ दिल्याचे समाधान आणि मुलाना चटकदार खाल्ल्याचे समाधान

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon