Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

शाकाहारी बनल्यानंतर तुम्हाला होणारे फायदे!


मागच्या काही

वर्षांमध्ये लोकप्रिय झालेली रीत म्हणजे मांसाहार कमी करणे आणि कालांतराने पूर्ण शाकाहारी बनत जाणे. बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध व्यक्ती- जसे की रेखा, शाहिद कपूर आणि करीना कपूर खान यांसारखेच पूर्ण जग शाकाहाराकडे वळू लागले आहे. शाकाहार करण्याचे अगणित फायदे असतात आणि सर्वात मोठी समाधानाची बाब ही की, तुमच्यामध्ये आपण भावना असलेल्या जिवंत प्राण्यांना खातोय; ही अपराधाची भावनाही नसते. शाकाहार अंगिकारण्याची आणि तुम्हाला अधिक निरोगी जगायची प्रेरणा देण्याची सर्वात मोठी कारणे येथे आम्ही देत आहोत:

शरीराचे आरोग्यदायी वजन

शाकाहारामुळे तुमच्या शरीरावरील अतिरिक्त वजन कमी होईलच, याची पूर्ण हमी तर नक्कीच देता येत नाही; तरी यामुळे तुम्ही प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून आणि संतृप्त फॅट्सपासून (ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते आणि तुम्हाला वजनविषयक आजार होऊ शकतात) दूर राहू शकता. ज्या लठ्ठ व्यक्ती कमी फॅट असलेल्या शाकाहारी पदार्थांचे सेवन करतात; त्यांचे वजन पहिल्याच वर्षामध्ये साधारण 24 पौंड्सने (11 किलो) कमी होऊ शकते. जर तुम्ही शाकाहाराचेच सेवन करत असाल; तर किती खाताय वा किती कॅलरीज जाळताय, याचे मापन न करताही सहज वजन घटवू शकता. आम्ही आशा करतो की, हे तुम्हाला शाकाहाराची निवड करण्यास नक्कीच उद्युक्त करेल!

तीव्र आजारांची शक्यता कमी करते

शाकाहारी बनण्याने तीव्र (क्रोनिक) आजार- जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर आणि कोरोनरी आर्टरी रोग होण्याची शक्यता भरपूर कमी होते. मांसाहारापेक्षा शाकाहार हा भरपूर आरोग्यदायी असतो आणि तो तुम्हाला भयंकर आणि असह्य अशा आजारांपासून दूर ठेवू शकतो. जर तुम्ही श्वासोच्छवासाच्या त्रासापासून आणि तुमच्या सांध्यांच्या दुखण्यापासून थकला असाल; तर त्वरित शाकाहाराचा अवलंब करा.

तुम्हाला जास्त नैतिक वाटू लागेल

जर तुम्ही शाकाहारी बनण्याकडे वळाले असाल; तर तुम्ही वासरांना त्यांच्या मातांपासून दूर करण्याच्या भावनेपासून आणि डुकरांना भिंतीवर आदळवून आणि तुमच्या आहारासाठी त्यांना मारण्याच्या अपराधीपणाच्या भावनेपासून दूर राहाल. प्राण्यांचे मांस खाणे सोडून दिल्याने यापुढे तुमचा मेंदू सतत तुमचा पिच्छा पुरवत राहणार नाही. शाकाहारी बनल्यानंतर तुम्हाला कधीच अपराधी वाटणार नाही आणि मेलेल्या प्राण्यांवर आपले पोट भरण्यापेक्षा शाकाहार करणे कधीही चांगले! शेवटी मांसाहारी असताना तुम्ही खाल्लेल्या प्रत्येक पदार्थासाठी- जसे की पॉर्क पाय, स्कॉच एग्ज आणि मिटबॉल्स यांना भरपूर पर्याय उपलब्ध आहेतच. प्रत्येकवेळी जेव्हाही तुम्हाला मांसाहाराची इच्छा झाली की, मांसाला रडणाऱ्या वासराशी आणि अंड्याला मरणाऱ्या पिल्लाशी जोडून पाहा!

पोषकद्रव्यांची मुबलकता

शाकाहारी बनण्यामुळे तुम्ही प्राण्यांना अन्नासाठी मारण्याच्या अपराधीपणाच्या भावनेपासून मुक्त होताच; शिवाय त्यापासून तुम्हाला अधिक ऊर्जाही प्राप्त होते. शाकाहारी जेवण हे मासे, पॉर्क किंवा मटण असलेल्या आहारापेक्षा पचण्यास हलके असते आणि त्यामुळे तुम्हाला सुस्ती येत नाही. ते स्थूलपणा टाळते; कारण शाकाहार तंतुमय पदार्थांनी भरपूर युक्‍त असल्याने ते बद्धकोष्ठता रोखते. अतिरिक्त वजन तुमची उर्जा भरपूर कमी करते. म्हणून जर तुम्हाला दिवसभर ऊर्जावान राहायचे असेल; तर त्वरित शाकाहाराचा अवलंब करा.

शाकाहार हा पोषकद्रव्यांनी युक्‍त असतो आणि तो तुमच्या शरीराला आवश्यक कॅलरीज पुरवून तुम्हाला निरोगी ठेवतो. आजच तुमच्या आहाराशी नवा संबंध जोडा आणि शाकाहारी बना!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon