Link copied!
Sign in / Sign up
56
Shares

आयुष्यात प्रणय पुन्हा आणण्यासाठी काही टिप्स

सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रेम आणि शरीरसंबंध दोन्ही तितकेच सशक्त असणे गरजेचे असते. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच मधुचंद्राच्या दिवसांत पती-पत्नीमध्ये समागम आणि प्रणय अगदी भरात असतो.केव्हाही आणि कितीही समागम केला तरीही पती-पत्नी कंटाळत नाहीत आणि दोघानांही एकमेकांचा सहवास आणि शरीरसंबंध हवेहवेसे वाटत असतात.पण हे नव्या नवलाईचे दिवस संपताच प्रणयाची जादू ओसरायला लागते.अर्थात,प्रेम कधीच संपत नाही,पण आधी आणि आता बरेच काही बदललेले असते. तुमच्या दोघांतली जवळीक कमी होऊ लागलेली असते-हे अगदी साहजिक आहे आणि प्रत्येक जोडप्यामधे असे होतेच.  

तरीही,त्या जुन्या दिवसांमधला प्रणय परत यावा असे सर्वांना वाटते ,हे कुणीही मान्यच करेल.सुरुवातीच्या दिवसांत समागम म्हणजे मुक्तपने प्रेमात बुडून जाणे आणि बिछान्यात अगदी बिनधास्त होऊन शरीरसंबंधांचा आनंद घेणे असते. वैवाहिक आयुष्यातील दृढ शारीरिक संबंध पती-पत्नीला भावनिक,आध्यात्मिक आणि बौद्धिक पातळीवर जवळ आणतात. चॉकलेट,स्ट्रॉबेरी आणि कलिंगड एकत्र खाल्याने थोडासा फायदा होऊ शकतो पण तुमच्यातील लैंगिक संबंध कसे आणखी सुधारता येतील पाहूया:

  १. काही दिवस संबंध न ठेवणे

वैवाहिक जीवनात समागम सुधारण्यासाठी आणि त्यात नवेपणा आणण्यासाठी काहीच प्रयत्न न केल्यास हे सर्व रोजच्या दिनक्रमाचा एक कंटाळवाणा भाग वाटू शकतो.दररोज समागम करण्याऱ्या जोडप्यांपैकी तुम्ही असाल तर तुमच्या लैंगिक जीवनात नवी ऊर्जा भरण्याची खरेच गरज आहे. यासाठी एक किंवा दोन दिवस संबंध ठेवू नका. या वाट बघण्याच्या दिवसात तुमच्या जोडीदारा सोबत खट्याळपणे वागा यामुळे तुमच्या जोडीदाराची ओढ आणखी वाढेल आणि तुमच्यात नवीन ऊर्जा आणि जोश असलेला समागम होईल.

२. तुमच्या गरजा बोलून दाखवणे.

आपल्या पैकी सर्वांचं स्वतःच्या अशा गरजा असतात आणि याबद्दल संकोच संकोच बाळगण्या सारखे काहीच नाही-विशेषतः अशा व्यक्तीसमोर जिच्या सोबत तुम्हाला पूर्ण आयुष्य घालवायचे आहे. लैंगिक संबंधात तुम्हाला काय आवडते आणि काय आवडत नाही हे जोडीदाराला सांगा आणि त्यांनाही असेच वागायला प्रोत्साहित करा. यामुळे तुमच्या जोडीदाराच्या गरजा आणि ईच्छा तुम्हाला कळतील आणि नक्कीच शरीरसंबंधात सुखद अनुभव तुम्हाला येईल.

३. बिनधास्त बनणे आणि स्वतःला व्यक्त करणे.

मैत्रिणींनो, तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुमचा जोडीदार आपोआपच तुमच्यावर प्रेम करेल. प्रेमाची सुरुवात स्वतःपासून करा.तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल तर इतर कुणालाही तुमच्यात रस वाटणार नाही. आरशात स्वतःला पाहतांना आपल्यातील केवळ उणिवा पाहण्याची समस्या सर्व स्त्रियांना असते पण असे करण्याऐवजी तुमच्या जोडीदाराला तुमच्या शरीरात काय आवडते हे विचारा आणि स्वतःला ही हेच रोज विचारा. स्वतःच्या शरीराबद्दल चांगली भावना येण्यासाठी रोज धावायला जाणे आणि योग्य आहार घेणे अशा गोष्टी आवर्जून करा.याने तुम्ही बिछान्यात बिनधास्तपणे स्वतःला हवे तसे व्यक्त करू शकाल,जशा तुम्ही नेहमी होता.

४. रोजच्या कामांना शृगांरचे स्वरूप देणे. 

पूर्ण दिवस घरातील कामे केल्यानंतर स्त्रियांना समागम न करावेसे वाटणे साहजिकच असते.बहुतेक घरांमध्ये पतीपेक्षा पत्नीच घरातील कामे जास्त प्रमाणात करत असते. किंवा ऑफिसच्या काममुले देखील थकवा आलेला असतो. यामुळेच दिवसाच्या शेवटी स्त्रियाची शरीरसंबंधाची इच्छा नसते आणि त्या थकलेल्या हीअसतात.यासाठी एक सोपी युक्ती म्हणजे ''रोजचे घरकाम म्हणजे शृंगार असतो" असे तुमच्या पतीला पटवून सांगा. अशा प्रकारे,तुमच्या पतीला तुमची जास्तीत जास्त मदत करावीशी वाटेल आणि रात्री  चांगल्या समागमासाठी तुमच्यात भरपूर ऊर्जा  असेल.

५. फोनचा उपयोग करणे.

जेव्हा तुम्ही सोबत नसाल तेव्हा जोडीदाराच्या फोनवर एखादा संदेश पाठवून स्वतःची आठवण करून देऊ शकता.एकमेकांच्या शरीराच्या भागांसाठी छोटेसे गोड टोपण नाव ठेवून घरी परत आल्यानंतर तुम्हां दोघांना काय करायचे आहे हे खट्याळपणे सांगा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon