Link copied!
Sign in / Sign up
128
Shares

सावधान : बाळाला कोणता खोकला येतोय ?

 

तुम्ही तुमच्या बाळाच्या खोकल्याने चिंताग्रस्त आहात काय? खोकला येणे ही खूप सामान्य समस्या आहे आणि ती सर्वच बाळांमध्ये बघायला मिळते. खोकला तसा खूप गंभीर आजार नाही. पण त्यामुळे बाळ अस्वस्थ होऊन खात नाही. खोकला ही बऱ्याचदा एक आरोग्यदायी क्रिया असते, कारण खोकल्याची उबळ ही श्वसन मार्गाद्वारवर असणारी घसा व छातीतील घातक स्त्राव किंवा बॅक्टरीया बाहेर काढत असते. हा खोकला नॉर्मल असतो आणि तो लगेच चालला जातो. त्यामुळे तुम्ही ओळखायला हवे की, बाळाला कोणता खोकला येत आहे.  

१) साधा खोकला

खोकल्याचा प्रकार - हा ओला खोकला असतो. ह्या प्रकारामध्ये दम लागत नाही आणि श्वास ही नॉर्मल असतो. हे साध्या सर्दीचे किंवा नाकाच्या व घशाच्या वायरल इन्फेक्शन ची लक्षणे असतात. जर सतत ७ ते ८ दिवसांपासून असा साधा खोकला असेल आणि तो बराही होत नसेल तर. त्याच्यासोबत बारीक ताप, नाकातून पाणी येणे, सतत पाण्याच्या शिंका येत असतील. तर पुढीलप्रमाणे उपचार करावा.

उपचार- Nasal saline चे ड्रॉप जे लहान बाळासाठी डॉक्टरांनी सांगितले असतील ते घ्या. आणि तो कसा घ्यायचा डॉक्टरांना विचारून घ्या.  

२) लहान मुलांना होणार घशाचा एक आजार

खोकल्याचा प्रकार- कोरडा खोकला, थोडा वेगळा, ओरडण्यासारखा खोकला आहे. हा सामान्यतः मध्यरात्रीच्या वेळेला होतो. आणि जर मध्यरात्री बाळाला असा खोकला आलाच तर बाळाला घशाची समस्या निर्माण झाली आहे असे समजावे. हा एक संसर्गिक व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार आहे. यामुळे श्वसनमार्ग सुजून लहान होतो. आणि हा आजार ६ महिना ते ३ वर्षाच्या आतल्या बाळांना होतो.

उपचार- बाळासोबत १० मिनिटे वाफेच्या बाथरूममध्ये बसून रहा. नसेल तशी सोय तर बाळाला वाफ द्या. त्यातील दमटपणा बाळाच्या खोकल्यावर उपाय ठरेल. जर रात्री हवा खूप थंड असेल तर बाळाला गरम ब्लॅंकेटमध्ये गुंडाळा. असे करण्याने ३ ते ४ दिवसात हा आजार निघून जाईल. आणि जर बाळाला आराम येतच नसेल तर डॉक्टरांना भेटा.

३) फ्लू

खोकल्याचा प्रकार - ह्या खोकल्याने आवाज कर्कश होतो, ओला खोकला आणि घसा खवखवतो, आणि तो सतत येत असतो. आणि त्याचासोबत खूप ताप येऊन बाळ बिलकुल खात नाही. समजून घ्यायचे की बाळाला फ्लू झालेला आहे. आणि हिवाळ्यात सामान्यपणे हा फ्लू बाळाला होत असतो.

उपचार - द्रव पदार्थ द्या आणि एखादी तापाची गोळी घ्या आणि ती बाळासाठी असेल तर उत्तम. त्या अर्ध्या गोळीला चमच्यात पाणी मिसळून द्या. काही शंका वाटल्यास डॉक्टरांची भेट घ्या.

४) न्यूमोनिया

 

पावसाळा व हिवाळा या ऋतूत श्वसननलिका व फुफ्फसांचा विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. बऱ्याचदा व्हायरल फ्लू ची पुढची स्टेप म्हणजे न्यूमोनिया हा जीवघेण्या आजार होय. कारण न्यूमोनियाच्या जंतूंना शरीरात शिरकाव करण्यास हा व्हायरस मदत करतो. न्यूमोनियात बालकांना सर्दी, खोकला, बाळाने दूध पिणे बंद करणे, नेहमी पेक्षा जलद श्वासोच्छवास होणे, खूप ताप येणे, काही वेळेस झटके येणे, अतिझोप ही प्रमुख लक्षणे आहेत. काहीवेळेस बालक दमल्यामुळे खूप झोपते. हे देखील प्रमुख लक्षण आहे.

उपचार- यासाठी घरगुती कोणातच उपचार करू नका. घरी औषधही देण्याचा प्रयत्न करू नका. लगेच डॉक्टरांना भेटा. न्यूमोनियामुळे भारतात खूप बालकं दगावतात. त्यामुळे रिस्क घेऊ नका.  

५) दमा

खोकल्याचा प्रकार - खूप मुलांमध्ये सर्दी खोकल्याने या दम्याची सुरुवात होते, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वसनाची गती वाढते, छातीत कफ दाटतो, पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि मुलं खूप अस्वस्थ होते. काही वेळा मुलाला उलटी होते आणि त्यात त्याचा कफ बाहेर पडतो. दमा हा घरात जर कुणाला असेल तर बाळालाही होतो पण त्या अगोदर डॉक्टरांशी अगोदरच प्रतिबंधात्मक उपाय करून घ्यावेत. काही वेळेस बाळांमध्ये व्हायरस असतो तो म्हणजे Respiratory syncytial virus (RSV ) हा व्हायरस दुर्मिळ आहे पण तो फुफ्फसांमध्ये घुसून जीव घेऊ शकतो.

उपचार- दम्यासाठी पाण्यासारखे औषध आहे. पण त्यापेक्षा तुम्ही बाळाच्या डाक्टरांना दाखवा. बाळाच्या प्रकृतीनुसार ते औषध देतील.  

६) काही वस्तू तोंडात घातली असेल

खोकल्याचा प्रकार - बाळ खेळण्यांसोबत खेळत आहे किंवा काही खात आहे आणि अचानक बाळ खोकलू  लागले तर त्याने काही गिळले असेल म्हणून त्याला असा खोकला येत असेल.

उपचार- पटकन बाळा जवळ जाऊन तोंडात बोट टाकून काही वस्तू त्याने गिळली असेल ती काढून घ्यावी. नाहीतर त्याच्या पाठीवर हलक्या चापट्या माराव्यात जेणेकरून ती वस्तू तोंडातून बाहेर पडेल. आणि खूप प्रयत्नांनी वस्तू बाळाच्या तोंडातून येत नसेल तर जवळच्या फॅमिली फिजिशयनला दाखवा. पालकांनी बाळ जेव्हा खेळते तेव्हा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवा. त्याला खोकला येतोय. किंवा काही वस्तू तोंडात घालतोय.Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon