Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

स्तनाची साईज कमी असल्याने दूध कमी येते का ?


एका आईसाठी बाळाला स्तनपान करणे हे तिच्या आयुष्यातले खूप सुंदर क्षण असतात. ती कधी ह्याविषयी खूप हळवी होऊन जाते जेव्हा तिचे बाळ दूध पीत नाही. आणि भूक लागल्यामुळे खूप रडते. ह्या क्षणी तीची अवस्था खूपच वाईट होते. म्हणून स्तनपानासंबंधी काही समस्या येत असतील त्या आपण सोडविण्याचा प्रयत्न करू. खूप मॉम्सना आईंना वाटते की, स्तनाच्या साईजवरुन दुध बाळाला कमी -जास्त मिळत असेल का ? किंवा त्यामुळे त्याचे पोट भरत नाही का ? असे कितीतरी प्रश्न तिच्या मनात येत असतात. तेव्हा ह्याविषयी ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ.

१) पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की, प्रत्येक स्त्रीचे स्तन वेगवेगळे असतात काहींची मोठी तर काहींची लहान असते. आणि मुखत्वे लहान साईजचे स्तन असणाऱ्या मॉम्सना जास्त हा प्रश्न छळत असतो. आणि काही इतर मॉम्सनाही हाच प्रश्न पडतो. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे काही नसते. ही चुकीची समजूत तुमच्या डोक्यातून काढून टाका.

२) गरोदरपणात स्तनात काही बदल होत असतात. आणि ही सामान्य गोष्ट आहे. ह्याविषयी सविस्तर माहिती :

स्तनामध्ये (ब्रेस्ट) दोन प्रकारचे टिश्यू असतात. स्टोर्मल टिश्यू (stromal tissue) आणि ग्लैंड्यूलर टिश्यू (Glandular tissue) त्यापैकी स्टोर्मल टिश्यू हे मदत करणारी जी फॅट टिश्यू आणि फायबर युक्त टिश्यू पासून मिळून बनत असतात. आणि त्याच वेळी ग्लैंड्यूलर टिश्यू स्तनात दूध बनविण्याचे काम करत असतात. त्यामुळे स्तनाची साईज स्टोर्मल टिश्यू वाढवण्याचे काम करत असतात. म्हणजे दोन्हींचे काम एकमेकांवर अवलंबून असल्याने. आणि दोन्ही सारखेच पण वेगवेगळे काम करत असल्याने स्तनाची साईज कमी आहे जास्त आहे ह्याचा काही स्तनपानावर परिणाम होत नसतो.

३) बाळ किती दूध पिते आणि किती प्रमाणात दूध पिण्याची त्याला सवय झाली आहे. कारण तुमचे बाळ जितके दूध पीते तितके दूध स्तनात तयार होत असते. त्याच्यात स्तनाच्या आकारावरून काही ठरत नसते. स्तनाची साईज त्याच्या फॅट असलेल्या टिश्यूवर जास्त अवलंबुन असते. आणि हे फॅट चे टिश्यू दूध तयार करत नसतात. म्हणून स्तनाची साईज आणि स्तनपान ह्याचा संबंध नाहीच.

४) पण तुम्हाला सांगतो की, फक्त ज्या स्त्रियांचे स्तन मोठे असतात त्याच्या स्तनात जास्त दूध साठते. व कमी साईजच्या असणाऱ्या स्तनात दूध कमी साठते. पण खरं म्हणजे बाळाच्या दूध पिण्यावर दूध तयार होत असल्याने साठवणूकची खूप गरज लागत नाही. आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पाण्याची टाकी नाही म्हणून ते आवश्यक असलेल्या वेळी बरोबर स्तनात दूध येते. म्हणून कमी साईजच्या स्तन असलेल्या स्त्रियांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये.

जर आणखी तुम्हाला स्तनपानाविषयी काही शंका असतील व प्रश्न असतील तर tinystep चे ऍप डाउनलोड करून त्या ठिकाणी मराठी मॉम्सचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊन इतर अनुभवी आईंना तुमचा प्रश्न मराठीतून विचारू शकता आणि तिथे मराठीतून उत्तर मिळेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon