Link copied!
Sign in / Sign up
32
Shares

जास्त प्रमाणातील सिझेरियनमुळे या समस्या निर्माण होऊ शकतात.

गर्भधारणा आणि बाळाचा जन्म हा सर्व स्त्रियांसाठी जीवन बदलणारा अनुभव आहे. एका स्त्रीला तिच्या छोट्याश्या पिल्लाचं स्वागत करताना अनेक अडचणीतून जावे लागते . बाळाचा जन्म सामान्यतः दोन प्रकारे होतो - एक म्हणजे नैसर्गिक म्हणजे योनीद्वारे होणार आणि दुसरा म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे म्हणजेच सी-सेक्शन किंवा सिझेरीयन. 

सी-सेक्शन ही अशी प्रक्रिया आहे जिथे बाळाला आईच्या पोट आणि गर्भाशयात शस्त्रक्रिया करून करून बाहेर काढण्यात येते. काही प्रकरणांमध्ये, सिझरियन आधीपासून नियोजित केले आहे, जे पालकांनी ठरविले आहे. काही प्रकरणांमध्ये, प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यास सिझेरीयन. केले जाते.

सामान्यत: स्त्री किती सी-सेक्शन करू शकते या संदर्भात वैज्ञानिक पुरावा नाही, परंतु, अधिक सिझेरेनियन, त्या स्त्रीसाठी अधिक धोकादायक असू शकते ते कसे ते आपण पाहणार आहोत.

१. गर्भाशयाला होणारे छेद

जितक्या वेळा तुमची-सी-सेक्शन शस्त्रक्रिया होते. तितक्या वेळा तुमच्या गर्भाशयाला छेद होत असतो. आणि जखम करत असतो. आणि हा घाव तुमच्या पुढील सी-सेक्शनमध्ये गुंता-गुंता निर्माण करण्याची शक्यता असते.

२. मूत्राशय आणि आतडयांबाबत समस्या

जास्त प्रमाणतील सी-सेक्शन शस्त्रक्रियमुळे मुत्राशयाबाबत तसेच आतड्याबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हे जरी सामान्य असले तरी जितक्या जास्त वेळा ही शस्त्रक्रिया होईल तितक्या वेळा या समस्या वाढण्याची शक्यता असते

३. अति रक्तस्त्राव

.सी-सेक्शन दरम्यान अति रक्तस्त्राव हा सामान्य असतो, परंतु, सिझेरीयनची संख्या वाढत असल्याने तीव्र रक्तस्रावचा धोका असतो. तसेच हिस्टेरेक्टोमीची शक्यता निर्माण होऊ शकते. हिस्टेरेक्टोमी एक शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे, ज्यामध्ये,गर्भाशय पूर्णतः किंवा त्याचा काही भाग काढून टाकण्यात येतो.

४. हर्निया होण्याची शक्यता

अनेक वेळा सी-सेक्शन झालेल्या महिलांना हर्नियाचा धोका असतो. गरोदरपणात आणि प्रसूतीनंतरचा कालावधीमध्ये एक नाभीसंबधीचा हर्निया होणे सामान्य असते

या मुख्य समस्या यतिरिक्त पोटाच्या मध्यभाग सुजणे, दुखणे, नाभी जवळील भागात वेदना होणे आदीचा समावेश आहे . प्रत्येक स्त्री वेगळी असते आणि तिला निर्माण होणाऱ्या समस्यानुसार त्यावरची उपचार प्रक्रियेत देखील बदलते. काही स्त्रियां सी-सेक्शननंतर लवकर पूर्ववत होतात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो

ज्या महिला पहिल्या गरोदरपणात सिझेरीयन केल्या आहेत ते दुस-या व त्यानंतरच्या गर्भधारणेदरम्यान सामान्य योनीमार्गाची निवड करू शकतात. आणखी एक पर्याय म्हणजे पुन्हा एकदा गरोदर होण्याआधी, सी-सेक्शन नंतर सहा महिने अंतर ठेवणे. आपल्या पूर्वीच्या शस्त्रक्रिया आणि निर्माण झालेल्या गुंतागुंतीबाबत आपल्या डॉक्टरांशी सल्ला घेणे नेहमीच उत्तम असते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon