Link copied!
Sign in / Sign up
25
Shares

सतत ढेकर येतायत ? हे वाचा

जेवताना किंवा जेवण झाल्यावर ढेकर येणे हे पोट भरल्याची पावती समजण्यात येते. जेवल्यानंतर ढेकर जेवल्यानंतर दोन-चार वेळा ढेकर येणं समान्य गोष्ट आहे. परंतु सतत बराच वेळ ढेकर येत असतील तर ही काळजी कारण्यासाखी बाब आहे. सतत ढेकर येणे हे आरोग्यस हानिकारक ठरू शकते. सतत ढेकर का येतात आणि त्यावर उपाय काय ते आपण पाहणार आहॊत.

१. अपचन

अ‍ॅसिडिटीसारखे पोटाचे विकार झाले असल्यासही सतत ढेकर येण्याची शक्यता आहे. अशा आजारांवेळी पोटात हवा साचून राहते आणि ती ढेकरच्या रुपात बाहेर पडते.एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्या पदार्थाचे योग्य पचन न झाल्यास सतत ढेकर येण्याची शक्यता असते.काही पदार्थ खाल्याने पोटात गॅस धरण्याची शक्यता असते आणि त्यामुळे देखील सतत ढेकर येण्याची शक्यता असते.

२. घाई-घाईने जेवणे.

अनेक जणांना घाई-घाईने जेवायची सवय असते. तसेच गप्पा मारत सावकाश जेवण्याची सवय असते. तर अनेक जण जेवण उरकण्याचा मागे असतात. असे घाईने जेवल्यने आणि गप्पा मारत जेवल्याने हवापोटात जाते आणि अन्नपचनात बाधा येऊन पचनमार्गात ती हवा अडकून राहते. मग ढेकराच्या माध्यमातून ती हवा बाहेर पडते.

३. पित्ताशयात खडे झाल्यामुळे

पित्ताशयाशी संबंधिक एखादा आजार झाल्यासही ढेकर येतात. आणि हे आजार नंतर गंभीर स्वरूपधारण करण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत ढेकर येत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

४.जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक सेवनाने

कोड्रिंक्समुळे पोटामध्ये हवा साचून राहते आणि त्यातून पोटात बबल्स तयार होतात. मगहा गॅस तोंडावाटे ढेकराच्या रुपात बाहेर पडतो. मात्र, अनेकदा फुफ्फुसाच्या पडद्याला याचा त्रास होण्याची शक्यता आहे.

उपाय

१. सावकाश जेवावे.

२. जेवणानंतर कमीत-कमी २ तास झोपू नये.

३. च्युइंगम,कोल्डड्रिंक्स पिणे टाळावे.

४. आहारात टोमॅटो, कांदा यांचे प्रमाण कमी करावे. मुळ्याचा समावेश करावा.

५. वजन वाढू देऊ नये.

६. जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा, चिमूटभर सैंधवाबरोबर चावून खाल्ल्यास व त्यावर गरम पाणी पिल्यास खाल्लेलं लवकर पचते.

७. जेवणामध्ये आल्याचा तुकडा हिंग व सैंधव घालून खावा.

८. दिवसभर गरम पाणि प्यावे.

९. जेवण वेळेवर करावे.

१०. दुपारच्या जेवणानंतर एक वाटी ताजे ताक, अर्धा चमचा जिरेपूड, चिमूटभर सुंठ, व किंचित सैंधव टाकून घ्यावे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon