Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

तुमच्या सासूसोबतचे नाते घट्ट कसे बनवाल !

        सासू आणि सुनेचे नाते काहीसे अनोखे असते.सासू सोबत राहताही येत नाही आणि त्यांच्याशिवायही राहता नाही.तुम्ही त्या काही मोजक्या भाग्यवान सुनांपैकी असाल ज्यांना चांगली सासू मिळाली आहे तर खूपच छान नाही तर सासूसोबत जुळवून घेणे सोपी गोष्ट नसते.असे असले तरीही,सासू हि कुटंबाचा अविभाज्य घटक असते आणि तिच्या सोबत चांगले संबंध तुम्ही एका खूप महत्वाच्या व्यक्तीसाठीच ठेवता तो म्हणजे तुमचा नवरा!तर मग सासू आणि तुमच्या नात्यात काही समस्या असतील तर त्या मुळापासून दूर करून तुमच्या नात्याची वीण घट्ट करा. कसे ते आम्ही येथे सांगत आहोत.

१] सासूबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

कोणत्याही परिस्थितीमध्ये नकारात्मक निष्कर्ष न पोहचण्याचा प्रयत्न करा.लक्षात घ्या,तुम्ही जशा नव्याने सून बनला आहात तशीच सासू हि या नात्यातील बारकावे पहिल्यांदाच शिकते आहे. सासूबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि तिने दिलेले सल्ले धुडकावण्याआधी थोडा विचार करा आणि त्यातील फायदे-तोटे दोन्ही तपासून बघा.

२] कमीत कमी अपेक्षा ठेवा

नवीन घरात,नव्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडून आपले स्वागत आपलेपणाने व्हावे अशी प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते.कुटुंबात आपल्याला मुलीप्रमाणे वागणूक मिळावी असेही नव्या सुनेला वाटत असते,पण असे होतेच असे नाही. असा अपेक्षाभंग होऊ नये यासाठी तुमच्या अपेक्षा कमीत कमी आणि वास्तविक असू द्या.नव्या कुटुंबा कडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागेल,हे लक्षात असू द्या.

३] सासूचा आदर करा

अगदी पहिल्या दिवसापासून तुमच्या सासूच्या वय आणि अनुभवाचा मान ठेवा.सासूने तुमचा आदर आणि विश्वास स्वतः कमवावा याची वाट पाहू नका. खरे तर तुमच्या कडून सन्मान मिळण्यास त्या खरोखर पात्र आहात हे समजून घ्या.याने तुमच्या दोघीतील नाते घट्ट बनेल तसेच तुमच्या हळूहळू लक्षात येईल की सासूसोबत चांगले नाते निर्माण करण्याचा फायदाच मिळतो!

३] संवाद

बरेचसे वाद आणि भांडणे अगदी क्षुल्लक विसंवादामुळे घडून येतात.तुम्हाला काही समस्या असेल तर सासूशी बोला.आजचा दिवस कसा गेला किंवा त्यांना काही हवे आहे का अशी साधीशी विचारपूस करा.सासूच्या भूतकाळातील सोनेरी आठवणी आणि काही अनुभव याबद्दल बोला आणि विश्वास ठेवा तुम्हाला यापूर्वी न दिसलेली त्यांची एक वेगळी आणि चांगली बाजू बघायला मिळेल.

४] बोलण्यापूर्वी विचार करा

काही वेळेला तुम्हाला सासूच्या वागण्याचा वैताग येऊ शकतो हे समजण्यासारखे आहे,तरीही तुमच्या जिभेला आवरा,कारण तुम्हाला बोलल्यानंतर तुम्हाला स्वतःला पश्चताप होईल असे काही शब्द तुमच्या तोंडून निघून जाऊ शकतात.तुमचा राग शांत होऊ द्या आणि परिस्थिती अगदीच हाताबाहेर जात आहे असे वाटल्यास शिष्टाचाराने बोला.तुमच्या अशा वागण्याने परिस्थिती निवळेल आणि वाद विकोपाला जाणार नाहीत.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon