Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

सासूबाईंशी चांगले नाते निर्माण करण्यासाठी या गोष्टी करा.

सासूबाई म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यतील अशी व्यक्ती असते की. तुझं माझं जमे ना, आणि तुझ्यावाचून करमेना .सासूबाईंशी वागणे, बोलणे हे दरवेळी खुप सोप्पे आणि सरळ नसते. पण जर तुम्ही त्या काही भाग्यवान सुनांपैकी असाल ज्याच्या सासूबाई एकदम समंजस आहेत तर तुमच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या दूर होणार आहेत हे लक्षात ठेवा. सासूबाई कोणी परग्रहावरील व्यक्ती नसतात. थोडं तुम्ही सांभाळून घेतलं थोडं त्यांनी सांभाळून घेतलं की दोघींमध्ये चांगले नाते निर्माण होते. जरी तुम्ही आणि सासू-सासरे वेगळे राहत असाल तरी तुमच्या मधला महत्वाचा दुवा ज्याच्यासाठी तुम्ही दोघी महत्वाच्या असता त्यासाठी तुमच्या दोघींमध्ये चांगले नाते असणे आवश्यक असते.

१. सकरात्मक दृष्टिकोन ठेवा. 

सासूबाईंच्या कोणत्याही वागण्याबाबत किंवा त्यांच्या कोणत्याही कृतीबाबत नकारात्म दृष्टिकोन ठेवून विचार करू. जिंव्हा कुना दुसऱ्याच्या अनुभवातून त्यांच्याशी वागू किंवा बोलू नका. जश्या तुमच्यासाठी त्या नवीन असतात तश्याच त्याच्यासाठी तुम्ही देखील नवीन असता. (जरी तुम्ही त्यांना आधीपासून ओळखत असाल तरीही)नेहमी वागताना बोलताना सकरात्मक दृष्टिकोन ठेवा. जर तुम्हांला एखादी गोष्ट पटली नसेल तर एकदम नाही म्हणण्या आधी ती गोष्ट का पटली नाही काय समस्या आहे यावर चर्चा करा.

२. अति अपेक्षा ठेऊ नका.

प्रत्येक मुलीला लग्न झाल्यावर आपल्या नव्या कुटूंबाने आपल्याला अगदी मोकळ्या मनाने आपले स्वागत करावे,स्वीकारावे आपल्याला मुलगी मानावे विशेषतः सासूबाईंनी मुलीसारखे वागवावे अश्या अपेक्षा असतात. पण प्रत्येकवेळी या गोष्टी होतात असे नाही,किंवा या गोष्टींसाठी त्यामुळे सुरवातीलाच कमी अपेक्षा ठेवा. त्यामुळे तुमचा हिरमोड होणार नाही. आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून सासूबाईबाबत मनात रोष राहणार नाही.

३. फक्त प्रसंगानुसार आदर दाखवू नका

सासूबाईंच्या वयाचा आणि त्यांच्या तुमच्याशी असल्याच्या नात्याचा आदर पहिल्या दिवसापासून करा. फक्त समोर आहेत किंवा काही प्रसंगानुसार आधार करू नका. तसेच त्या तुमचा आदर करतील नंतर बघू असा विचार करू नका. कारण कदाचित त्यांना देखील तुमच्याशी कसे वागावे, काय केले म्हणजे तुमचा त्यांच्यावर विश्वास बसेल या गोष्टी कळत नसतील. तुमचा आणि तुमच्या सासूबाईंचा मधील चांगले नाते कदाचित भविष्यात प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त ठरेल.

४. त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करा

बऱ्याचदा होणारे वाद-विवाद आणि भांडणे ही विसंवाद किंवा एमेकांमधील संवादाच्या कमतरतेमुळे होतात. जर काही त्यांच्या काही गोष्टींचा तुम्हांला त्रास जाणवत असेल तर त्याबाबत त्यांच्याशी बोला. बोलून समस्या सोडवण्याचा प्रयन्त करा. दिवसातून एकदा तरी त्याच्याशी बोला , त्यांचा दिवस कसा गेला. त्यांना काय हवं नको विचारा. तुमच्या कामाचा ठिकाणच्या गोष्टी त्यांना सांगा, त्यांचे अनुभव विचारा. त्यांच्याकडून काही टिप्स घ्या. अश्याप्रकारे त्यांच्याशी संवाद साधून तुमच्यात मोकळे पण आणा.

५. काही गोष्टी बोलण्याआधी विचार करा

कधी-कधी तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या वागण्याला प्रचंड कंटाळला,त्यांच्या काही गोष्टी तुम्हांला प्रचंड त्रास देतील त्यामुळे तुमची चीड-चीड होणे साहजिक आहे. परंतु तरीदेखील रागाच्या भरात बोलताना तुमचा तोल सुटू देऊ नका काही बोलण्याआधी विचार करा.

६. तुमच्यातील वादांचा प्रभाव कुटूंबातील इतर सदस्यांवर  होऊ देऊ नका 

तुमच्यात आणि सासूबाईंमध्ये झालेली भांडणे वादाचा तुमचे पती आणि इतर कुटूंबियांवर परिणाम होऊ देऊ नका अन्यथा त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुम्हांला  तुमच्या पतीला आणि स्व कुटूंबियांना होईल.  

या काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुमचे आणि तुमच्या सासूबाईंमध्ये चांगले नाते  निर्माण होईल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon