Link copied!
Sign in / Sign up
33
Shares

सासऱ्यांच्या या गोष्टी त्रासदायक वाटतात का ?

      सासरे हे साधारणतः घरात सगळ्यांना मदत करणारे,प्रत्येक परिस्थिती घरातल्या सगळ्यांना संभाळणारे व्यक्ती असते. घरातील वाद-विवाद दूर करण्यात नेहमी पुढाकार घेऊन घराचे वातावरण हसतं -खेळतं ठेवण्याचा प्रयन्त करतात. पण त्यांच्या काही गोष्टी यावैताग आणतात आणि त्रासदायक वाटतात.

१. घरचे नियंत्रण

सासू-सासऱ्याचं त्यांचा मुलावर जन्मपासून हक्क असतो आणि तो ते मुलाच्या लग्नानंतर देखील गाजवत असतात. तसेच ते त्यानुसार मुलाच्या आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयन्त करतात. म्हणजे सुनेने आणि मुलाने हे करावे,इकडे गेलेच पाहिजे, हे करू नये अश्या गोष्टीमध्ये ते कधी-कधी उगाच लक्ष घालतात. आणि हि गोष्ट वैताग आणणारी असते. इतक्या वर्षच्या सवयीमुळे हे असे होत असते. त्यामुळे या विषयवार चर्चा करून हा प्रश्न सोडवणे गरजेचे असते

२. सतत पैश्याच्या गोष्टी करणे.

या प्रकारातील सासरे सतत पैश्याच विषय काढून त्यावर चर्चा करत असतात. एवढा खर्च का केला इथेच खर्च का केला, हि गोष्ट इकडूनच का घेतली तिकडे स्वस्त मिळाली असती आमच्या वेळी आम्ही एवढा खर्च करत नव्हतो. तुम्हांला पैशाची किंमत नाही. याबाबत सततची चर्चा ही वैताग आणते. आपल्याला काही व्यावर येत नाही असे सतत कोणी बोलल्याने ती गोष्ट त्रास देत राहते. याबाबत ते आपल्या अनुभवांवर तुम्हांला सल्ला देत असतात किंवा त्यांना तुमच्याबाबत अति काळजी या गोष्टी बोलायला भाग पाडत असते. त्यामुळे याबाबत तुम्ही देखील त्यांना समजून घेण्याच प्रयत्न करा, किंवा तुमची बाजू तुम्ही व पती मिळून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयन्त करा. यामुळे या गोष्टी कमी होतील. आणि गैरसमज निर्माण होणार नाहीत. 

३. तुमच्या कामाबाबत /क्षेत्राबाबत टिप्पणी करणे.

आपले शिक्षण आपले काम हे सासऱ्यांच्या काळातील शिक्षण आणि कामपेक्षा नक्कीच वेगळं असते. प्रत्येक कामाच्या वेळा आणि कामाच्या स्वरूपानुसार कपडे घालण्याची पद्धत नक्कीच वेगळी असते. त्यामुळे आम्ही काही आम्ही पण नोकरी केली. आमच्यावेळी असं नव्हतं. या सततच्या टिपण्या त्रासदायक ठरतात.

४. खासगी आयुष्यातील ढवळा-ढवळ

सुट्टीच्या दिवशी देखील दार वाजवून लवकर उठवणे, सतत कुठे चाला आहेत. कधी येणार,लवकर या इकडे जाऊ नका. जेवायला घरी या अश्या सूचना सतत देणे. आणि सतत गोष्टीचे जाब विचारणे तुम्ही आणि पती बाहेर जात असताना काहीतरी काम सांगणे. या गोष्टी प्रचंड वैताग आणतात आणि यामुळे कुटूंब विभक्त होण्याची शक्यता असते.

५. पालकत्वबाबत स्वतःचे विचार लादणे.

सासऱ्यांची आणि तुमच्या दोघांची पालकत्वाची कल्पना आणि काही विचार नक्कीच वेगळे असणार आहेत परंतु त्यामध्ये ते स्वतःच्या मते तुमच्यावर लादायचा प्रयन्त करतात. त्यावेळी खरंच घुसमट झाल्यासारखं वाटतं आपल्याला आपली मुलांबद्दल निर्णय घेताना देखी सतत कोणी मध्ये-मध्ये करणे हे तापदायक असते आणि यामुळे घरात बऱ्याचदा वाद होत असतात. हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांनी तुमच्या पतीला वाढवलं आहे त्यांच्यावर संस्कार केले आहेत.आणि म्हणूनच तुम्ही त्यांना पसंत केलेलं आहे त्यामुळे त्याच्या गोष्टी जर आत्ताच्या काळात लागू होत नसतील तर ते त्यांना तुम्ही आणि तुमच्या पतीने समजवून सांगणे गरजेचे आहे. विरोधाला विरोध करू नये. काही त्याच्या अनुभवांचा तुम्हांला फायदा होण्याची शक्यता असते त्यामुळे समजुतीने हि गोष्ट हाताळा.

६. नातवंडांचे अति लाड करणे

पालक असल्यामुळे, मुलांचे संगोपन करण्याकरिता मुलाच्या भल्यासाठी काही सवयी लावणे गरजेचे असते आणि या गोष्टी मुलांनी पाळाव्या अशी तुमची अपेक्षा असते, पण प्रेमापोटी मुल रडत आहे म्हणून त्याला पाहिजे ते आणून देणं किंवा पाहिजे ते करणे. अश्या सवयी आजोबा लावतात. त्यामुळे आजी-आजोबा चांगले आणि आई-बाबा वाईट अशी भावना मुलाच्या मनात निर्माण होते.आणि आई-बाबाच्या बोलण्याकडे मुलं दुर्लक्ष करतात. हे सगळॆ आजी-आजोबा आणि नातवंडच्या बाबतीत खरं असलं तरी कोणतेही आजी-आजोबा आपल्या नातवंडांचे वाईट व्हावं असं वाटत नसते, त्यांना आपल्या नातवंडाचे लाड करावेस वाटणे साहजिक असते.पण मुलांना शिस्त लागणे गरजेचं असते म्हणून सासऱ्यांना ही गोष्ट तुम्ही आणि तुमच्या पतीने समजून सांगणे आवश्यक असते

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon