Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

सासरे : पडद्यामागचे हिरो

जसे सिनेमात पडद्यामागचे हिरो असतात तसेच घरातल्या मंचावर देखील पडद्यागे एक हिरो असतो ते म्हणजे सासरे.सासू-सासरे म्हणालं की उगाच अनाहूत सल्ले डोळ्यासमोर येतात पण सासरे हे आपल्या घरी आलेल्या सुनेकडे  मुलगी म्हणूनच पाहत असतात. आणि जर तुमच्या पतीला बहीण नसेल तर त्यांना तुमच्याविषयी जास्त आपुलकी वाटते . ते तुम्हांला नेहमी कोणताही गाजावाजा न करता आपल्या तसा मुलीला द्यावा तसा पाठिंबा असतात. तर हे सासरे तुमच्या आयुष्यात कश्याप्रकारे पडद्यामागचे हिरो ठरतात हे आपण पाहणार आहो

१.हसतमुखाने स्वागत करणारा घरातील सदस्य

नवीन लग्न झालेले असताना तुम्हांला तुमच्या वडिलांना आणि घरातल्याची आठवण येत असते त्यावेळी ते तुम्हांला वडिलांसारखा आधार देण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांना मुलगी असले तर ही गोष्ट त्यांचा शिवाय कोणीच समजून घेऊ शकत नाही. आणि जर त्यांना मुलगी नसेल तर ते तुम्हांला मुलगी मानून हसतमुखाने तुमचे स्वागत करतात .

२.परीक्षकांची भूमिका सांभाळतात

तुमच्या आणि तुमच्या सासूच्या वाद-विवादात परीक्षकांची भूमिका घेतात आणि दोघीचे म्हणणं ऐकून योग्य तो निर्णय देतात. बहुतांश घरात सासरे आणि सून यांचे विचार जुळत असल्यामुळे कधी-कधी याबाबतीत मुलगी मानलेल्या सुनेला झुकते माप मिळते. तसेच काही गोष्टी ज्या तुमच्या सासूबाईंना सांगायच्या असतात पण कसं सांगू कळत नसतं त्यावेळी सासरे तुमचं म्हणणं सासूबाई पर्यंत पोहचवतात. किंवा कोणत्या पद्धतीने गोष्ट सांगितली म्हणजे सासूबाईना पटेल ते सांगतात

३. मदतीसाठी आणि सल्ला द्यायला तत्पर

ऑफिसच्या कामात काही अडचण येत असले लॅपटॉप चालत नसेल इंटरनेटचा काही प्रॉब्लेम झाला असले तर ते लगेच तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात. तसेच घरगुती कामांमध्ये कुठे नळ खराब झाला एखादी वस्तू माळ्यावरून काढायची आहे, नवीन गॅस लावायचा आहे तर अश्या मदतीला तत्पर असतात. जरा तुम्हांला आणि तुमच्या पतीला दोघांना ऑफिसला जायचं आहे आणि तुम्ही इस्त्रीचे कपडे आणायचे विसरलात तर तुमची अडचण होऊ नये म्हणून ते लगेच आणून देतात. जर एखाद्या गोष्टी बाबत तुम्ही दोघं गोंधळत असाल तर तुम्हांला त्यात सल्ला देतात.

४. तुमच्या पाहुण्याच्या नेहमी हसतमुखाने स्वागत करतात

तुमचे नातेवाईक किंवा तुमचे पाहुणे आल्यावर त्यांचे हसतमुखाने स्वागत करतात आणि त्याची सरबराई करायला तत्पर असतात.

५. कौतुक

तुम्ही केलेल्या पदार्थाचे तुमच्या प्रगतीचे नेहमी कौतुक करतात. त्यांच्या मुलांचा संसार तुम्ही कसा योग्य रीतीने सांभाळत आहात. तसेच त्याची आणि सासूबाईची कशी काळजी घेत आहेत या व इतर नाती कशी नाजूकपणे हाताळत आहेत याचे ते नेहमी कौतुक करतात. याबाबतीत कधी कधी सासूबाई हात आखडता घेऊ शकतात पण सासरे नेहमी मनापासून कौतुक करतात

६. प्रोत्साहन देणे

सासरे शिकलेले असो किंवा अशिक्षित ते मुलांबरोबरच सुनेला देखील तिच्या क्षेत्रात किंवा आवडत्या छंदात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात . त्या करता ते तुम्हाला मदत देखील करतात.

बहुतेक घरात सासू आणि सुने मध्ये वाद-विवाद आणि विचारतील मतभेद असण्याची शक्यता जितकी जास्त असते तितकीच सुनेचे आणि सासऱ्यांचे विचार जुळण्याची शक्यता जास्त असते.. बरोबर ना?

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon