Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

सरोगसी बद्दल तुम्हाला माहित असाव्यात काही महत्वाच्या गोष्टी.

               ज्या जोडप्यांना बाळ होण्यात अडचणी आहेत त्यांच्यासाठी सरोगसी हा उत्तम पर्याय आहे. सरोगसीला घेऊन आजकाल खूप वाद-चर्चा होत असतात. यासाठी तरतूद असणाऱ्या कायद्यातील प्रक्रिया क्लिष्ट आहेत आणि प्रत्येक देशात त्या वेगवेगळ्या आहेत. भारत सरकारने सरोगसी संबंधित २०१५ साली पारित केलल्या कायद्यानुसार, आता सरोगसीसाठी बाहेरील देशातील पालकांना पर्याय उपलब्ध नाहीयेत. भारतातील असे जोडपे ज्यांच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत तेच व्यावसायिक तत्वावर सरोगसीचा पर्याय निवडू शकतात. २०१६ साली आलेल्या कायद्यानुसार लग्न वर्षाच्या अटीत बदल करून ५ वर्षे करण्यात आली आणि अजून अनेक तरतुदी करण्यात आल्या. हा कायदा अजूनही पुनरावलोकन प्रक्रीयेखाली आहे.

कायद्याच्या तरतुदींसोबत सरोगसी बद्दल काही महत्वाची माहिती आम्ही इथे दिली आहे.
१. योग्य विचार करून निर्णय घ्या.

अनेक पालक गर्भधारणा अयशस्वी होत असण्याच्या काही वर्षांनी सरोगासीचा पर्याय निवडतात. जर तुम्ही यापूर्वी अनेकदा प्रयत्न करूनही गर्भधारणा होण्यात अयशस्वी राहिले असाल किंवा तुमचा यापूर्वी गर्भपात झाला असेल तर नीट विचार करून निर्णय घ्या कारण आधीच तुमची अनेक वर्ष प्रयत्न करण्यात गेली आहेत. योग्य वेळ ओळखणे गरजेचे आहे.

२. आईव्हीएफ

सरोगसी प्रक्रियेतील पुढची पायरी म्हणजे इन-विट्रो-फर्टीलायझेशन , ज्याला सामान्यपणे आईव्हीएफ म्हटले जाते. आईव्हीएफ प्रक्रियेत शुक्राणू आणि अंडज यांचे फलनीकरण प्रयोगशाळेतील एका डिश मध्ये केले जाते ज्यातून गर्भ तयार केला जातो. या गर्भाचे नंतर रोपण गर्भाशयात केले जाते. ही प्रक्रिया जर तुम्हाला निवडायची असेल तर तुमच्या देशातील सरोगसी संबंधित कायदे जाणून घ्या. आईव्हीएफ करतांना एखाद्या नोंदणीकृत दवाखान्यातूनच करून घ्या.

३. सरोगसी एजंट.

हे सरोगसीच्या संबंधित वर्तुळात काम करणारे व्यकी असतात. गरज असलेल्या जोडप्यांना दवाखाना आणि दाता मिळवून देण्याचे काम हे एजंट करतात. तुम्ही परदेशी असणाऱ्या एखाद्या क्लिनिक द्वारे तुमच्या सरोगसी संबंधित गोष्टी हाताळत असाल, तरीही जर तुम्हाला एक विश्वासू मध्यस्ती हवा असेल जो तुमचे काम सहज होण्यास मदत करेल तर तुम्ही सरोगसी एजंट ची मदत घेऊ शकता.

 

४. वेळ आणि पैसा.

तुम्ही कोणत्या देशात आहात आणि तुम्ही कोणती सरोगसी पद्धत निवडत आहात यानुसार तुमचा वेळ ठरतो. या मात्रांवर तुमचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. सरोगासीची प्रोसेस प्रत्येक देशात वेगळी असते. तुमच्या एजंटशी याविषयी चर्चा करूनच निर्णय घ्या.

५. तारीख ठरवणे.

तुम्हाला सरोगासीला सुरवात करण्याची तारीख ठरवावी लागते. या तारखेवर तुमच्या पुढील संपूर्ण प्रक्रियेची वेळ अवलंबून असते. जसे की अंडजाच्या फलनीकरणाची तारीख, आईव्हीएफची तारीख, गर्भाशयात रोपण करण्याची तारीख इ.

६. सरोगासीतील पर्याय.

जर तुमच्या प्रयत्नांना यश येत नसेल तर तुम्हाला सरोगसीमध्ये निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या पर्यायात तुम्हा दोघांना क्लिनिक मध्ये जाऊन स्पर्म आणि एग्ग्स ( अंडज आणि शुक्राणू) दान करावे लागतील. यानंतर तो गर्भ स्थानिक सरोगेट मातेमध्ये रुजवला जातो. दुसरा पर्याय म्हणजे हाच गर्भ कमी तापमानावर गोठून ठेवता येतो. या गर्भास गोठवलेल्या अवस्थेत परदेशात पाठवता येते आणि तेथील स्थानिक सरोगेट मातेच्या गर्भाशयात रुजवता येतो. एजंटच्या मदतीने अजून देखील पर्याय तुम्हाला शोधता येतील.

 

७. दाता आणि सरोगेट माता.

तुम्ही इथपर्यंतची प्रक्रिया पूर्ण केल्यास यानंतर जरा जास्त काळजीने आणि कायद्यानुसार पाऊले उचलावी लागतात. यानंतर सरोगसी संबंधी तुमच्या देशातील आणि परदेशातील कायदे आणि नियम तुम्हाला काटेकोरपणे जाणून घ्यावे लागतात. ज्या देशातील एग्ग्स किंवा स्पर्म डोनर तुम्ही निवडला आहे त्या देशाचे सरोगसी संबंधी कायदे तुम्हाला माहित असावे लागतात आणि सोबतच त्या दात्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी एजंट व तुम्ही सेवा घेत असलेल्या क्लिनिक कडून तुम्हाला बरीच मदत होते.

८. अंडज दान, आईव्हीएफ आणि गर्भारोपण.

या प्रक्रिया एका नंतर एक अशा क्रमाने कमीत कमी कालावधीत केल्या जातात. यासाठी अंडे व शुक्राणूंचे यशस्वी दान व्हावे लागते.

 

९. गर्भधारणा आणि मातेची काळजी.

सरोगेट मातेच्या गर्भाशयात यशस्वी प्रत्यारोपण झाल्यास त्यापुढील मातेची व बाळाची काळजी क्लिनिक कडून घेतली जाते. सरोगेट मातेस गरजेच्या असणाऱ्या सर्व टेस्ट क्लिनिक कडून केल्या जातात.

१०. बाळाचा जन्म.

प्रसूतिशास्त्र तज्ञ व संबंधित डॉक्टर बाळाच्या वाढीवर देखरेख ठेवतात. यासाठी गरजेच्या चाचण्या घेतल्या जातात. प्रसुतीसाठीची योग्य वेळ याद्वारे ठरवता येते.

११. पासपोर्ट आणि नागरिकत्व.

तुम्ही निवडलेल्या कायद्याची तत्वे लक्षात घेऊन त्यानुसार परदेशातून परत येणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया असू शकते. पालकांना बाळाच्या पासपोर्ट आणि नागरिकत्वाची तरतूद करावी लागते. यातील मुलभूत कायदेशीरता दोन्ही देशातील नागरिकत्वाच्या नियमांवर अवलंबून असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon