Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

सर्दी झालीय ना तेव्हा गोळ्या घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय करा


आता जर थंडीच इतकी पडतेय म्हटल्यावर, सर्दी होणारच. पण सर्दी झाल्यावर खूपच डिस्टर्ब होते. कोणतेच काम व्यवस्थित होत नाही. नेहमी नेहमी नाकावरच लक्ष राहते. आणि स्तनपान करणाऱ्या मातांना ह्याचा त्रास जास्त होतो. कारण त्यामुळे त्यांच्या बाळांनाही सर्दी होऊन जाते. तेव्हा ह्या सर्दीवर कशाप्रकारे तुम्हाला उपाय करता येईल.

१) औषधी चहा कसा करायचा

चहा करताना त्याच चहा पावडरबरोबरच गवती चहा, आले, तुळशीची पाने घाला. याशिवाय पुदिना, काळीमिरी आणि लवंग घातल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. पण ह्यामध्ये दूध टाकू नका. नाहीतर रेगुलर चहा होऊन जाईल.

२) गरम पाण्याच्या गुळण्या करा

सर्दी झाल्यावर गरम पाणी पीत जा. यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते. याशिवाय गरम पाण्यात मीठ टाकून त्याने गुळण्या केल्यास घशाला झालेला संसर्ग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कोमट पाण्याच्या सकाळ-संध्याकाळ गुळण्या करा. ह्या गुळण्या करण्याने सर्दी ही होत नाही.


३) रात्री हळदीचे दूध

सर्व स्त्रियांनी माहिती आहे की, सर्दी आणि घशावर हळदीचे दूध खूप जालीम उपाय आहे. त्यासाठी सर्दी झालेली असताना रात्री झोपण्यापुर्वी गरम दुधात हळद प्यायल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. आणि हे प्यायल्यानंतर पाणी पिऊ नये.

४) थंडीच्या दिवसात सूप पिण्याची मजा\

तुम्हाला सर्दी झाली असेलच तर छान गरम सूप प्या. विविध भाज्यांचे सूप शरीराचे पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. गरम असल्याने घशालाही आराम मिळतो. लसूण हा आरोग्याच्या अनेक तक्रारींसाठी चांगला असतो. सर्दीसाठीही लसूण उपयुक्त असतो. लसणाच्या पाकळ्यांची साले काढून त्या बारीक करून पाण्यात घालून उकळाव्यात. हे पाणी गाळून प्यायल्याने सर्दी कमी होते.

५) वेलची चा उपयोग

यामध्ये वेलचीचाही समावेश होतो. गोड पदार्थांमध्ये वापरली जाणारी ही वेलची सर्दीसाठीही उपयुक्त ठरते. वेलचीची पूड घेऊन त्यात मध घालून त्याचे चाटण करावे. हे चाटण दिवसातून २ वेळा सलग २ ते ३ दिवस खाल्ल्यास त्याचा सर्दी कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होतो.

ह्या घरगुती उपायांनी तुमची सर्दी नक्कीच कमी होईल. आणि सर्दीसाठी खूप गोळ्या घेऊ नका. त्यापेक्षा हे घरगुती उपाय करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon