Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

गरोदरपणात होणाऱ्या सर्दी व खोकल्यावर घरगुती उपाय

 

आता हिवाळा ऋतू सुरु होत आहे. तेव्हा बऱ्याच गरोदर स्त्रियांना सर्दी, खोकला ह्यांचा त्रास होत असतो. त्यांच्यावर लगेच ऋतूबदलाचा परिणाम होत असतो. आणि ह्यात ६ महिन्याचा गरोदरपणानंतर त्याचा परिणाम बाळावर पडत असतो. तेव्हा ह्यावर उपाय म्हणून काही गरोदर मातांना विचारले होते तेव्हा खालील दिलेले उपाय तुम्ही करू शकता. आणि किती वेळा कफ सिरप घ्यायचे तेव्हा खाली दिलेले घरगुती उपाय करून पहा.

१) हळदीचा उपयोग

हळद हा स्वयंपाकघरातील एक उत्तम आयुर्वेदीक पदार्थ आहे. उत्तम असा अँटीसेप्टीक आणि अँटी बॅक्टेरीयल असणारा हा पदार्थ कफ आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे बऱ्याच शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. मध, गूळ आणि हळद यांची गोळी करुन घेतल्यास ती सर्दीसाठी उपयुक्त असते. तसेच गरम दूध आणि हळद घेतल्यास कफामुळे घशाला होणाऱ्या त्रासापासून सुटका होते.

२) लिंबूचा हा उपयोग तुम्हाला माहिती आहे

लिंबामध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.

३) लसूण

लसूण आहारातील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. दिवसात प्रत्येकाने किमान ५ ते ६ लसूणाच्या पाकळ्या खाव्यात. लसणामध्ये असणारे गुण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही आहारात लसूण आवर्जून ठेवा.

४) आले

आल्यामध्येही अनेक उपयुक्त गुणधर्म असतात जे कफ आणि सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. आले चवीला काही प्रमाणात तिखट असले तरीही आहारात त्याचा योग्य त्या प्रमाणात समावेश असायलाच हवा.

५) गुळण्या करणे

गुळण्या करणे हा घसा, सर्दी आणि कफासाठी एक उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून गुळण्या केल्यास घशाचा संसर्ग लवकर बरा होतो. सर्दीचे विषाणू सर्वात आधी आपल्या घशावर आक्रमण करतात. त्यामुळे दिवसातून ३ ते ४ वेळा साध्या कोमट पाण्याने केलेल्या गुळण्याही कफासाठी उपयुक्त ठरतात.

    साभार - लोकसत्ता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon