Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

तुम्हाला असलेली संवादाची भूक. . .

संवाद दोन व्यक्तींना  पशु पक्ष्यांना जोडून घटट नात निर्माण करणारा  दुवा म्हणजे संवाद.जेव्हा दोन व्यक्तीमध्ये  विचारांची देवाणघेवाण होते तेव्हा संवाद होतो.काळाच्या प्रत्येक टप्प्यांवर संवादाची साधने बदलत आहेत त्याप्रमाणे  संवाद देखील बदलत आहे.  प्राचीन काळापासुन अगदी आदिमानव हालचाली, विविध आवाजाद्वारे संवाद साधत आहे. हळूहळू मानवाला भाषा शैली अवगत झाली.शब्दाची सुंदर गुंफण करत संवाद साधला जाऊ लागला.

पत्र असो वा आता  आलेल्या इंटरनेटमुळे निर्माण झालेली संवादाची विविध साधने यांचा वापर करून अगदी ह्जारो किलोमीटर दुर व्यक्तीशी संवाद साधुन मानव आपली संवादाची भुख भागवत असतो.व्हाटसअप , फेसबुक किवां इतर सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे त्याबरोबरच संवादाची भुख  देखील वाढली आहे. पण या माध्यमातून होणारा संवाद शब्दापुर्ता मर्यादित राहिला नाही. यामध्ये अनेक स्माईली , फोटो , यांचा वापर करून अधिक रंजक झाला आहे. 

पण अनेकवेळा या  माध्यमातून होणारा संवाद  हा अपुरा,अनूउत्तरीत वाटतो.चुकीचे गैरसमज यामुळे  संवादा चा कधी विसंवाद होतो ते लक्षात येत नाही .यामुळे निर्माण होते नात्यामध्ये भली मोठी दरी. या नवीन तत्रंज्ञानामुळे संवाद साधने सोप्पे झाले असले तरी काय संवाद साधावा यांची कला मात्र अजून अवगत झालेली नाही.बऱ्याचदा अनोळखी व्यक्तीसोबत फिलिंग शेअर केल्या जातात.पण त्या व्यक्तीला त्यांची कदर असेल का हे सांगता येत नाही,पण तरी ही संवादाची भुक भागविण्यासाठी सर्व अट्टहास केला जातो.

नुकत्याच एका सर्वेक्षनातुन असे समोर आले की ९०% लोक भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मिडीया किवा मेसेजचा वापर करतात यांचा अर्थ असा की समोरा समोर साधला जाणारा संवाद त्यांना अवघड वाटतो.पण समोरा-समोर होणारा संवाद हा जास्त परिणामकारक असतो.मिळेल त्या साधनाचा वापर करून संवाद साधण्याच्या मानवाच्या हटटामूळे संवादाचा दर्जा खालावत आहे. यामुळे संवादाची किंमत  देखील कमी झाली आहे.

बसमध्ये सह -प्रवाशांसोबत होणारी माहिती पूर्ण चर्चा असो वा घरातील विविध समस्यावर होणारा सोल्युशन बेस संवाद ,कट्टा चावडी , यावर होणारी विचाराची खमंग देवाणघेवाण मात्र हरवली आहे. मनोरंजक माध्यमाच्या चक्रविवात माणूस मात्र अडकुन पडला आहे

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon