Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल ही 10 तथ्ये कमी जणींना माहीत असतील

दर महिन्याला मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची गरज भासतेच. आजच्या घडीला बाजारात आपल्या बाह्य कपड्यांवर डाग पडू नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्रा या गोष्टीविषयी आणि त्याच्या नेमक्या वापराविषयी फार थोड्या जणींना माहिती असते. एक महिला म्हणून तुम्हाला या स्वच्छतेविषयक पर्यायांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

१. कोणत्याही प्रकारचा सॅनिटरी नॅपकिन पाच तासांपेक्षा जास्त काळ वापरू नये 

नॅपकीनमध्ये वापरले जाणारे रासायनिक द्रव असते जे रक्ताचे एका जेलमध्ये रूपांतर करते. यामुळे मूत्राशयाला गंभीर संक्रमण होऊ शकते आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. दरवर्षी, स्त्रिया किंवा मुली एकच पॅड दिवसभर वापरल्याने कर्करोगाने मृत्युमुखी पडत आहेत.

२.  बेंजामिन फ्रँकलिन यांनी या पॅडचे डिझाईन केले होते जे आपण आज वापरतो 

बेंजामिन फ्रँकलिन यांनी या पॅडचे डिझाईन मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी हे पॅड डिझाईन केले नव्हते. हे त्यांनी सैनिकांना युद्धाच्यावेळी जेव्हा गोळी लागते तेव्हा ते रक्त तात्काळ थांबविण्यासाठी त्याचा वापर होत होता.

३. कृत्रिम किंवा प्लॅस्टिक साहित्यापासून बनविलेले सॅनिटरी पॅड सर्वाधिक धोक्याचे 

कृत्रिम तंतूंपासून बनविलेले सॅनिटरी पॅड्समध्ये बुरशीजन्य संक्रमणासाठी ओळखले जातात. संबंधित भाग सतत बंदिस्त असल्याने तिथे बुरशीजन्य जंतूंची वाढ होते. त्याऐवजी, उत्तम दर्जाची कापसाची सॅनिटरी पॅड वापरा.

४.  कॉटन पॅड देखील असुरक्षित असू शकतात 

कापसाची पॅड्स पांढरी दिसावीत म्हणून डाइअॉक्सिन वापरले जाते. या रसायनामुळे आपल्या प्रजनन अवयवांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. रेयॉन हा आणखी एक रासायनिक पदार्थ मिश्रित असतो. या रसायनामध्ये डाइअॉक्सिन समाविष्ट असते.

५. महिला कापडी पॅड स्वच्छतेच्या दृष्टीने वापरतात 

 बहुतेक स्त्रिया कृत्रिम सॅनिटरी पॅडमुळे होणा-या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कापडाचे पॅड निवडतात. हे धुवून पुन्हा वापरता येण्यासारखे असतात. जर का तुम्हाला कायम सॅनिटरी पॅड्स वापरायची सवय असेल तर ते सोडून कापडाची पॅड्स वापरणे अवघड जाईल.

६.  कप सर्वात सुरक्षित पर्याय आहे 

 आता, बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी कप वापराबाबत मनात शंका असू शकते. परंतु त्यांनी याचा वापर केल्यानंतर त्यांच्या स्वच्छतेबाबतच्या शंका दूर होतील. हा कप तुम्ही बारा तासांपर्यंत वापरू शकता. या कपची व्यवस्थित काळजी घेतल्यास तो दोन वर्षापर्यंत टिकतो.

७.  सॅनिटरी पॅड्स थेट बाथरूममध्ये फ्लश करू नका 

 हे सॅनिटरी नॅपकिन्स कचऱ्यात टाकण्यापूर्वी कागद किंवा पिशवीत गुंडाळून टाकावे असे आपल्याला कायम शिकवले जाते. याचे कारण असे की, हे पॅड्स बाथरूममध्ये थेट फ्लश केल्यास ते चोकब होते.

८. सॅनिटरी नेपकिनचे उत्पादक त्यावर वापरलेले घटक स्पष्टपणे लिहीत नाहीत 

 लोकप्रिय सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादकांना पॅड तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटक उघड करण्याची परवानगी नाही. ते फक्त वैद्यकीय उपकरणातून ओळखले जातात.

९. कोरियातील एका संशोधक समूहाने हे घटक शोधण्याचा प्रयत्न केला आहे :

या संशोधनानुसार त्यात पॉलिनायक्लॅट्स, प्लॅस्टिक, सर्फॅक्टर्स, पॉलिप्रोपिलिलीन आणि रिसाइक्लर्ड पेपर किंवा क्लोरीन ब्लीच्ड लाकडाचा लगदा हे घटक आढळले.

१०. पहिले व्यावसायिक सॅनिटरी पॅड हे १८९६ मध्ये विकसित झाले 

'जॉन्सन अँड जॉन्सन'ने पहिले व्यावसायिक सॅनिटरी नॅपकिन तयार केले. लोकप्रिय सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादकांना ही कल्पना प्रथम बॅंडेडच्या पट्टीवरून सुचली जी लावल्यानंतर रक्तप्रवाह थांबतो.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon