Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

कापडी पॅड्स बद्दल काही... गोष्टी


सॅनिटरी नॅपकिन काळाची गरज आहे. तसेच काही भागात वर्तमान पत्र, कागद, किंवा जुने जाडेभरडे कापड अश्या विचित्र गोष्टींचा वापर होतो. तसेच बऱ्याच ठिकाणी कापडाच्या घड्या कितीतरी वेळ बदलायला वाट बघणे. या सगळ्या समस्या बघता सॅनिटरी नॅपकिन केव्हाही सोयीचे आहेत. परंतु अनेक जणांची मते ऐकीव माहिती यामुळे अनेक स्त्रिया संभ्रमात पडतात की मुलीला बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन कितपत योग्य असेल या करत कापडी पॅडचा पर्याय तुम्हांला हल्ली उपलब्ध झाला आहे. या पॅड्स बद्दल काही माहिती जाणून घेऊ.

1. किती वेळाने बदलावे.

साधारण ३-७ तासांनी पॅड्स बदलले पाहिजे. पॅड्स वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. जास्त स्त्राव असेल त्या दिवशी मोठे/लांब व जास्त शोषून घेणारे पॅड्स वापरावेत.हे पॅड देखील तुम्हांला शोषण क्षमतेनुसार मिळू शकतात.

२. दुर्गंधी

प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीच्या स्त्रावाला एक प्रकाच वास येत असतो हा वास तुम्ही मासिकपाळीसाठी कोणताही पर्याय वापराला तरी त्याला येतो. मासिकपाळीसाठी वापरण्यात येणारा कप तसेच सॅनिटरी नॅपकिन, टेम्पोन हे अपवाद नाही. हा वास तुमच्या जीवनशैलीवर देखील अवलंबून असण्याची शक्यता असते.

३. सुरक्षितता आणि स्वच्छता

चांगल्या प्रतीची कापडी पॅड हे नक्कीच सुरक्षित असतात. पण हे पॅड वापरताना तुम्हांला स्वच्छतेची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. व्यवस्थित धुणे, सुकवणे आणि पाळीचे दिवस संपल्यावर कोरड्या आणि स्वच्छ जागी ठेवणे.

पॅड्स धुताना हाताने धुतल्यास उत्तम हाताने धुतल्यास ते मऊ राहतात मशीनमध्ये धुवायचे असतील तर त्याची देखील काळजी घ्यावी लागते. पॅड्स उन्हात सुकवणे सर्वोत्तम आणि हा पर्याय उपलब्ध नसल्यास घरात, मोकळ्या हवेत सुकवावेत. आणि मासिकपाळी संपल्यावर निर्जंतुक करून कोरड्या ठिकणी धूळ नसलेल्या ठिकाणी

४. एक पॅड किती वेळा वापरता येते

हे तुमच्या वापरण्याच्या पदतीवर स्वच्छता या करण्याच्या पद्धतीवर अवलंबुन असते तसेच, या पॅडच्या कापडाच्या प्रतीवर अवलंबुन असते. तरी साधारणतः चांगल्या प्रतीचे कापडी पॅड ६०- ते ७० वेळा वापरता येते.( आज वापरले १ वेळा नंतर धुवून वळून पुन्हा वापरले म्हणजे दुसऱ्यांदा )म्हणजेच योग्य प्रकारे निगा राखली तर सहज दीड ते दोन वर्ष हे पॅड्स जातात

५. हे पॅड टाकता येत नाही मग….

तुम्ही बाहेर असताना अशा वेळी पॅड्स लगेच धुणे शक्य नाही. अशावेळी पॅड्स दुमडून एखाद्या छोट्या पिशवीत ठेवावे. घरी आल्यावर पॅड्स पाण्यात भिजवून थोड्या वेळाने धुवावीत.आणि जर सॅनिटरी नॅपकिन सारखे हे पॅड जर तुम्हांला टाकून देणे आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास तुम्ही हा पर्याय वापरू शकता.

६. डाग पडू शकतो का ?

हो इतर सॅनिटरी पॅड प्रमाणे या पॅडला देखील डाग पडू शकतो. कापडी पॅड मध्ये हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon