Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

सॅन्डविच कसे बनवायचे ?


वडापाव नंतर सॅन्डविच खूप आवडते. आणि ते आपण ५० ते ६० रुपये देऊन खातो. खाल्यावर लक्षात येते की, ह्यात खूप असे काहीच नाही. हे आपल्याला घरीही बनवता येईल. तेव्हा आजच्या ब्लॉगमधून आपण सॅन्डविच कसे बनविता ते समजून घेऊ.

ह्यासाठी लागणारे साहित्य

एक मोठी वाटी उकडलेले वाटाणे, तीन किसलेले उकडलेले बटाटे, कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा रस्सा पावडर, पाव चमचा धणे पावडर, ४ मोठी इडलिंबे साले काढलेली, पाव चमचा लाल मिरची पावडर, दोन चमचे तेल, ब्रेडचे ६ स्लाईस, थोडे लोणी आणि चवीपुरते मीठ.

ह्यासाठी करायची कृती

* सर्वप्रथम कढई गरम करून त्यात थोडे तेल घाला. ते चांगले गरम झाले की त्यात कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.

* त्यात इडलिंबांचे तुकडे, रस्सा पावडर, उकडलेले वाटाणे, लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि मीठ घाला. बटाटय़ांचा लगदा करून वाटाण्यांसह ते दोन-तीन मिनिटे शिजवून घ्या. सर्व मिश्रण शिजले की ते थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा.

* आता ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यांना लोणी लावा. त्यातील एका ब्रेडवर वरील मिश्रणही नीट रचून त्यावर दुसरा स्लाईस ठेवा. नीट कापून सॅण्डवीच सर्व्ह करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon