Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

समजूतदार महिलेनं नातेसंबंधात या गोष्टी करणे अपेक्षित असते.


आजकाल अनेक जोडप्यामध्ये समजूतदारपणा नसल्यामुळे ताण -तणाव निर्माण होतो. दोघे एकमेकांना समजून घेत नाही म्हणून तणाव निर्माण होऊ शकतो किंवा एकमेकांच्या या कृतीचा तुम्ही कसा अर्थ काढता त्यावर तुमच्या नात्याचे भविष्य ठरत जाते. कारण तो नेहमीच असे करतो म्हणून मला तो आवडत नाही,तिरस्कार करणे, असे म्हणणे, चुकीचे आहे, तसेच ती तसं  का करत नाहीती तसं  का करत नाही याचे कारण समजून न घेता तोच हट्ट धरून बसणे  चुकीचे आहे. आज आपण अशा सात गोष्टी बघूया ज्या प्रत्येक विवाहितेने आपल्या नात्यात नक्की पाळाव्यात ज्यामुळे तुमचा समजूतदारपणा दिसतो.

१. परीकथेत रमू नका.

आपल्या लग्नाविषयी फार स्वप्नाळू कल्पना असू नये. तसे वाटणे चूक नाही पण वास्तवाचा विचार करता अशी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरतीलच असे नाही. प्रत्येक नात्यात थोडे चढ-उतार येतातच.तडजोड ही तुमच्या नात्याची गुरूकिल्ली आहे प्रत्येक नातेसबंध हे विश्वास आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतात पण या नात्यात जर तडजोड नसेल तर ते दिर्घकाळ टिकत नाही. हे देखील तितकेच खरे आहे की,प्रत्येक वेळी महिलेनेच तडजोड करावी असे नाही त्यावर दुसरा एखादा तोडगा शोधा. तुमचे प्राधान्यक्रम निश्चित करा.

२. आर्थिक नियोजन बंद करू नका 

 जग पैशावर चालते त्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन करणे थांबवू नका.महिनाभराचे नियोजन करा. यात तुमचा रोजचा खर्च आणि उरलेल्याची बचत करा.आर्थिक नियोजनाबाबत पहिल्यांदाच बोलताना थोडे अवघडले जाण्याची शक्यता आहे,परंतु ते बोलणे महत्वाचे असते. एक आर्थिक नियोजनाचा अभाव असल्यास तुमच्या नात्यात चांगला व्यवहार होणार नाही.

३. दोघांनी एकमेकांचा आदर राखायला हवा.

करावे तसे भरावे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. या उक्तीनुसार जर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून आदराची अपेक्षा करत असाल तर तसा तुम्हीसुध्दा त्याला द्यायला हवा. त्याच्या प्रत्येक कर्तुत्वाची तुम्ही चांगली दाद देऊन कौतुक करायला हवे, तुमच्या मनात असलेले प्रेम, आदर या भावना व्यक्त करायला हव्यात. यामुळे तुमचे नात्याला बळकटी मिळते आणि ते प्रामाणिक आणि पारदर्शी राहते.

४. तुमच्या आनंदासाठी जोडीदारावर अवलंबून राहू नका.

आनंद हा नेहमी निखळ, आतून मिळणारा असावा. जर सध्या तुम्हाला आनंद मिळत नसेल असे वाटत असेल तर ज्या गोष्टीतून आनंद मिळतो अशा गोष्टी शोधून त्या करा. स्वतंत्र आणि स्वालंबी महिलेला तो आनंद कसा शोधायचा हे तिला नेमके माहित असते. ती तिच्या दु:खी आयुष्याचे खापर कधीही नवèयावर फोडत नाही. ती स्वत:चा आनंद व त्यासाठीचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते.

५. ठोस निर्णयाची क्षमता 

हे केवळ दोघांच्या नात्यापुरते नसून संपूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही यशस्वी महिलांच्या कथा ऐकून प्रभावी होता तेव्हा तुम्ही त्याच्या आयुष्य बदलून टाकणाèया ठोस निर्णयांनी प्रभावित होत नाही का? अशी कणखर स्त्री होण्याचा प्रयत्न करा. जर एखाद्या निर्णयात सहभागी होण्याची इच्छा असेल तर नि:संकोचपणे त्यात सहभागी व्हा,तुमच्या जागी दुसरे कोणी तुमच्यासाठी निर्णय घेण्याची वाट बघू नका.

६. महत्वाच्या गोष्टींना वेळ द्या 

 स्वत:हून सगळ्याच गोष्टींना सारखेच महत्व देता येते असे नाही.,विशेषत: तुम्ही आईच्या भूमिकेत असाल तर. एका कणखर स्त्रीला हे नेमके माहित असते की, कुठल्या गोष्टीला किती महत्व आणि वेळ द्यायचा. एखाद्या कार्यातून काढता पाय घेऊ नका जर तुम्हाला असे वाटत असेल की, त्यात तुमचा वैयक्तिक सहभाग गरजेचा आहे. अष्टपैलु आणि अचूक असण्याची कला एकदा तुम्ही आत्मसात केली की,तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon