Link copied!
Sign in / Sign up
42
Shares

समागमानंतर तुम्हांला देखील स्वतःमध्ये हे बदल जाणवतात ना ?

 

समागम हे एक विवाहित जोडप्यामध्ये जवळीक वाढवण्याचा एक चांगला उपाय असतो. समागमानंतर आणि आधी अश्या काही गोष्टी घडत असतात ज्या ऐकायला थोड्य विचित्र वाटतात. समागमानंतर स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये काही बदल घडून येतात ते कोणते ते आपण पाहणार आहोत.

स्त्रियांमध्ये होणारे बदल

स्तनांचे कठोर होणे

 समागमा दरम्यान आणि समागमानंतर टीश्यू २५% पर्यंत आपल्या सामान्य आकारापेक्षा जास्त आकारचे होतात सेक्स त्यामुळे स्तन  कठोर आणि ताणल्यासारखे होतात. यात काळजी करण्यासारखं काही नसतं समागमाच्या काही तासानंतर तुमचे स्तन कठोर आणि ताणल्यासारखे होतात.

आनंद देणारे हार्मोनचा स्त्राव व्हायला लागतो

ओर्गास्ममुळे स्त्रीच्या शरीरात ऑक्सिटॉनचे प्रमाण वाढते. आणि त्यामुळे तुम्ही आनंदी आणि संतुष्ट दिसू लागतात एका संशोधनाअंती असे आढळून आले आहे की स्त्रीच्या शरीरात पुरुषांपेक्षा जास्त ओक्सिटोसीनचे प्रमाण जास्त आढळून येते त्यामुळे स्त्रियां या समागमानंतर जास्त खुश असतात. आणि समागमानंतर डोपामाइनचे प्रमाण देखील वाढते. ज्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास देखील वाढतो.

 

क्लीटोरिसचे आणि यूटेरसचे आकुंचन प्रसारण

समागमानंतर क्लिटोरिस आणि युटेरेसच्या आकुंचन आणि प्रसारण बाबत माहिती होते आणि त्याच्या आकुंचन आणि प्रसारण कधी कसे होते हे समजायला लागते.

पुरुषांमध्ये होणारे बदल

थोड्या वेळाकारात भावनिक दुरावा

समागमानंतर पुरुष स्त्रियांसारखे आनंदी आणि संतुष्ट होत नाहीत तर ते समागमानंतर थोडावेळ एकटं राहणं पसंत करतात. काही वेळाकारात त्यांचात आणि त्यांच्या जोडीदारात भावनिक दुरावा निर्माण होतो.

लघवी करण्यास अडचण होणे किंवा घाई होणे

बऱ्याच पुरुषांना समागमानंतर लघवी करण्यास अडचण होते. समागमानंतर लिंगाच्या आकुंचन होण्यामुळे पुरुषांना लघवी करण्यास अडचण होते. काही पुरुषांना समागमानंतर लघवीला जाण्याची घाई होते.

उदासीनता येणे

समागमानंतर बरेच पुरुष अचानक उदास होतात. समागमानंतर विनाकारण पुरुष चिडचिडे किंवा उदास होतात. या अवस्थेला पोस्ट-कोइटल ट्रीस्टेसे(post-coital tristesse) म्हणतात. बरेच पुरुष समागमानंतर या अवस्थेतून जातात. हीच गोष्ट महिलांच्या बाबतीत देखील जाणवू शकते पण याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon