Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

समागमाआधी या गोष्टी करणे टाळावे

तुम्ही आपल्या जोडीदारबरोबर एखादी खास रात्र घालवण्याच्या विचारात आहात किंवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे,अश्यावेळी तुम्हांला सगळ्या गोष्टी कश्या नीटनेटक्या व्हाव्यात असे वाटत असते. तुम्हांला सर्वार्थाने हि रात्र जोडीदाराबरोबर घालवायची असते, अश्यावेळी समागमाच्या आधी काही गोष्टी करणे टाळावे.

१. काही पदार्थ

तिखट पदार्थ किंवामसालेदार पदार्थ हे साधारणता समागमाच्यावेळी टाळणे चांगले . कारण यामुळे कदाचित तुम्हांला सारखे बाथ्रूमला जावे लागण्याची शक्यता आहे आणि यामुळे तुमचा मूड बिघडण्याची शक्यता असते. तसेच अश्या प्रकारच्या पदार्थाच्या खाण्याने योनीला देखील विचित्र वास येण्याची शक्यता असते. आणि यामुळे समागमाच्यामध्ये अडथळा ठरू शकते.

२. वॅक्सिंग

ज्या दिवशी तुम्ही असा बेत आखणार असाल त्या दिवशी तुम्ही वॅक्सिंग विशेषतः बिकनी वॅक्सिंग करू नका जरी तुम्हांला ती रात्र खास करायची असेल तर त्याची तयारी २ते ३ दिवस आधी करा, शेवटच्या क्षणापर्यंत हे काम ठेऊ नका. कारण वॅक्सिंगमुळे त्या भागाची आग होण्याची शक्यता असते. वॅक्सिंगमुळे तो भाग नाजूक होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे तुम्हांला समागमाच्या दरम्यान त्रास होण्याची शक्यता असते. आणि ही गोष्ट तुमच्या आनंदाच्या क्षणांमध्ये त्रासदायक ठरू शकते.

3.काही औषधे घेतल्यावर

जर आपल्याला विशिष्ट आरोग्यविषक समस्यांसाठी औषध दिले गेले असेल तर आपल्या समागमाच्या आधी ही औषधे घेणे योग्य ठरेल का ? यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण त्यांचे काही विशिष्ट दुष्परिणाम असतात ज्यामुळे तुमची रात्री थोडा कमी विशेष होईल. उदासीनता,नैराश्य अश्या आजारांवर देण्यात येणारी काही औषधे शरीरातील सेरोटोनिन पातळी वाढवतात. आणि यामुळे तुमचा समागममधला रस कमी होण्याची शक्यता असते. यासाठी आपल्या डॉक्टरांशी बोला आणि अश्यावेळी काय करावे याची माहिती करून घ्या.

४. अति मद्यपान

पुरुषांमध्ये समागमापूर्वी जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास अडथळा येण्याची शक्यता असते .तसेच स्त्रियांमध्ये त्यांना समागमाचा आनंद कमी मिळण्याची आणि आनंदी क्षण कमी मिळण्याची शक्यता असते. आणि हे कोणालाच आवडणार नाही. समागमाचा आधी थोडेसे मद्यप्राशन करण्यास हरकत नसते. परंतु मद्य आरोग्यासाठी घातकच असते.

५.अति कॉफीचे सेवन

समागमापूर्वी अती कॉफीच्या सेवनामुळे तुम्ही अति उत्साही बनता आणि तुमचा सगळा उत्साह समागमाच्या आधीच कमी होऊन जातो. त्यामुळे तुम्ही थकता आणि तुमचा समागमामधील रस कमी होतो.

           ६. त्रासदायक तणावपूर्ण काम

इथे काम म्हणजे अति आणि त्रासदायक किंवा मानसिक आणि शाररिक तणाव असणारे काम असा होतो. जर तुम्ही थकलेले असाल किंवा तुम्ही खूप तणावात असाल तर तुमचा समागमामधला रस कमी होतो आणि तुम्ही त्याबाबत विचार करू शकत नाही. जर तुम्ही मानसिक आणि शारीरिक तणावात असाल तर समागममध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे समागमाआधी तणाव कमी करण्यासाठी अंघोळ करा. समागमापूर्वी तणावमुक्त व्हा. मनाला प्रसन्न वाटलं अश्या गोष्टी करा. जोडीदाराशी गप्प मारा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon