Link copied!
Sign in / Sign up
60
Shares

समागमानंतर योनीसोबत ह्या गोष्टी करू नका


समागम करणे हे जितके आनंददायी आहे तितकेच काही गोष्टीची दक्षता घेणेही आवश्यक आहे. त्या कोणत्या त्या आपण बघणार आहोत.

खाली दिलेल्या गोष्टी समागमानंतर लगेच करू नये.
१) योनी ला धुण्यासाठी साबणाचा वापर

तुम्हाला वाटेल की, समागमानंतर योनीला धुवून स्वच्छ करून घेऊ. पण असे करू नका. कारण समागमानंतर योनीची त्वचा खूप संवेदनशील होऊन जाते. आणि जर त्याचवेळी तुम्ही साबण किंवा दुसरे काही केमिकल वापरले तर ती कोरडी होऊन त्यात खाज सुटू शकते. आणि शुक्राणू हे साबणाच्या किंवा इतर गोष्टीच्या संपर्कात आल्यावर नष्ट होऊन जातात.   त्यामुळे ते गर्भ धारणा करायला अडचण येऊ शकते म्हणून. वाटल्यास अंघोळीच्या वेळीच योनीला गरम पाणीने धुवून काढायचे.

२) पॅंटी सुद्धा

समागम तुम्हाला खूप थकवून टाकत असते. आणि यामध्ये शरीर खूप गरम झाल्याने तुम्हाला खूप घाम येतो. आणि योनी शुक्राणू आणि गरम होत असल्याने ओली होऊन जाते. सिथेंटीक अंडरवियर च्या पॅंटी ह्या घाम ला किंवा ओलेपणाला सुकवून ठेवेल असे. पॅंटी ह्या नॉयलॉन, रेयान, पॉलिएस्टर, पासून बनलेल्या असतात. आणि ह्या त्वचेला ओली ठेवल्यामुळे त्या ठिकाणी बॅक्टरीया किंवा फंगस सारखे इन्फेक्शन होऊन जाते. ह्याबाबत बऱ्याच स्त्रियांची तक्रार आहेच. त्यामुळे समागमानंतर कॉटन अंडरवियर घाला किंवा विना पॅंटीचे काही वेळ झोपा.

३) वेट वाईप चा वापर 

 ही गोष्ट त्या स्त्रियांसाठी आहे त्यांची त्वचा खूप सेन्सिटिव्ह (संवेदनशील ) आहे. आणि जर तुमच्या त्वचेला सेंट, अल्कोहोल, ग्लिसरीन, किंवा अन्य काही तेलाची ऍलर्जी असेल तर समागमानंतर योनी ला पुसण्यासाठी वेट वाईप चा वापर करू नका. वेट वाईप मध्ये कठोर केमिकल असतात. त्यामुळे तुमची त्वचा मध्ये जळजळ होऊ शकते. आणि जर वेट वाईप तुम्हाला वापरायचे असेल तर योनी मुलायम, लाल, आणि फुलली नाही ना बघून घ्या.

४) लघवी करणे हे योनीतुन नैसर्गिक बॅक्टरीया काढणे आहे. इंटरकोर्स तुमची योनीला बॅक्टरीयाचे घर बनवून टाकतो. आणि त्यामुळे नंतर ब्लॅडर इन्फेक्शन आणि UTIs होण्याचा धोका असतो. त्यामुळे समागमाच्या अगोदर लघवी करून घ्या. म्हणजे तुमचे पोट ही साफ होऊन जाईल.

ह्या गोष्टी तुम्हाला माहित झाल्यावर आणखी तुमच्या समागमाच्या जीवनात आनंद येईल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
33%
Wow!
67%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon