Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

अश्याप्रकारे सलॅडसाठी लागणाऱ्या भाज्यांची घरच्या-घरी लागवड करा.

ज्याच्याकडे झाडं लावायला थोडीफार जागा आहे किंवा गच्ची किंवा गॅलरीतील थोडी जागा आणि ज्यांना मुळात बागकामची आवड आहे अश्यासाठी घरच्या-घरी सॅलडसाठी लागणाऱ्या भाज्या कश्या  लावायचा यासंदर्भांत काही उपयुक्त अशी माहिती सांगणार आहोत.  तसेच कोणती भाजी कशी लावायची याची साधारण माहिती देणारा आहोत.जी तुम्हांला नक्कीच उपयुक्त ठरेल. 

१.टोमॅटो

टोमॅटो लावताना सुरवातीला छोट्या कुंडीत लावू शकता पण बिया रुजल्यावर चार ते पाच आठवडय़ांत रोपं येतात. रोपं आली की मग झाड कुंडीतून जमिनीत किंवा मोठ्या कुंडीत लावावे. टोमॅटोला बऱ्यापैकी सूर्यप्रकाश लागतो. आणि पाणी हे माध्यम प्रमाणत लागते

बीट

ज्या ठिकाण जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश येतो बीट लावावे किंवा बीटाची कुंडी ठेवावी. बीट हे काही आठवडय़ांतच तयार होतं. साधारणतः १० ते १४ इंचाचे वाढल्यावर बीट काढावे.

३.मुळा

घरच्या-घरी मुळा पूर्णतः साधारणतः तयार व्हायला तीन आठवड्याचा कालावधी लागतो. मुळ्याला वाढायला जागा लागते म्हणून याची लागवड करताना बियांमध्ये थोडे अंतर ठेवावे अंतर ठेवावं. मुळ्याला वाढायला भरपूर पाणी लागतं. म्हणून दररोज पाणी घाला.मुळा उगवला की तो मातीच्या बाहेर डोकावतो. त्यामुळे तो पूर्णपणे उगवेपर्यंत त्यावर माती घालत राहा. पूर्ण तयार झाला की मगच मुळा काढावा.

४. गाजर

गाजराची लागवड करताना मात्र तुमच्यात पेशन्स असणे गरजेचे असते. कारण गाजर यायला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. गाजराच्या बिया खोलवर घालून त्यावर एक फूट माती घालावी.( गाजरचे वरचे टोक मातीत रुजवावे) गाजरालाही वाढायला जागा लागते त्यामुळे गाजराची लागवड करताना बियांमध्ये थोडे अंतर ठेवावे

५. कांद्याची पात

कांद्याच्या पतीचा मुळाच्या टोकाचा थोडासा भाग कापून तो अगदी पाण्याच्या मोठ्या तोंडाचा बाटलीत जरी ठेवला तरी त्याची लागवड होऊ शकते. तसेच मोठा कांदा हवा असेल तर कुंडीत माती घालूनही पिकवू शकता. मात्र कुंडीतील कांदयाला जास्त प्रमाणात पाणी लागते. या कांद्याची तीन इंच वाढली की मगच ती पानं तुम्ही काढू शकता. ही भाजी काढताना मुळापासून उपटून काढू नये. वरची पानं खुडून घ्यावीत. खुडलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन पानं येऊ शकतात.

लागवडीच्या टिप्स

१. आपण ज्याची लागवड करणार आहोत त्यानुसार सूर्यप्रकाश आणि पाण्याची सोय बघून त्या भाजीची निवड करावी.

२. वेळच्यावेळी नैसर्गिक खाते घालावी. शक्यतो रासायनिक खते टाळवी.

३. रोपाला फळ किंवा भाजी येईपर्यंत पेशन्स ठेवावे.

४. कीड लागू नये याकरता नैसर्गिक औषधांची फवारणी करावी किंवा काही उपाय करावे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon