Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

सकारात्मक गोष्टी ज्या जगात होत आहेत तुम्ही वाचायला हव्यात. . .


 आता खरंच वेळ आली आहे की आपण या असल्या फुग्याला टाचणी लावायला हवी आणि जगात खरंच काय घडते आहे त्याकडे लक्ष द्यायला हवे. दिमाखदार विवाह सोहळे किंवा कोणत्या एका सेलिब्रिटीला बिकिनी परिधान करण्यासाठी लज्जास्पद वाटत आहे किंवा अगदी कोणती सेलिब्रिटी आपल्या बाळाला बाहेर फिरायला घेऊन जाताना दिसत आहे, या व्यतिरिक्त देखील जगात खूप काही महत्वाच्या गोष्टी आहेत.

१) मंगळ ग्रहावर आपले दुसरे घर होऊ शकते

वैज्ञानिक एकदम विलक्षण योजनांवर काम करत आहेत. प्रचंड मोठ्या चुंबकीय लहरी विकसित करीत आहेत यामुळे मंगळवर राहण्यायोग्य वातावरण तयार होऊ शकेल. हे ऐकायला भन्नाट वाटते आहे की नाही? त्यांची अशी योजना आहे की या चुंबकीय लहरींमुळे मंगळावरचे वातावरण पृथ्वीसारखे होईल व आपल्याला तिकडे राहता येईल! बुक करून घ्या घर तिथे.

२) स्वमग्नतेवर औषध जवळपास तयार झाले आहे

अनेक वैद्यकीय संशोधकांनी असा दावा केला आहे की, त्यांनी "सुरामीन" नावाचे औषध विकसित केले आहे ज्यामुळे मुलांमध्ये वाढत असलेला स्वमग्नतेची लक्षणे कमी होऊ शकतात. मानवजातीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की, आपण स्वमग्नतेवर औषध विकसित केले आहे.

३) देवी सारख्या रोगानंतर जगातील सगळ्यात मोठा दुसऱ्या क्रमांकावर असलेला नारूरोग नामशेष होण्याच्या मार्गावर आहे

नारू हा एक त्वचेचा रोग आहे ज्याचा उद्रेक त्वचेतूनच होतो. २०१५ मध्ये नारूच्या १२६ रुग्णांविषयी माहिती मिळाली होती आणि आज मितीला फक्त ५ रुग्ण अस्तित्वात आहेत.

४) जगातल्या सगळ्या अंधाऱ्या कोपऱ्यांना उजळवणे

सद्यस्थितीत भारतात १८००० अशी गावं आहेत जिथे वीज पोहोचली नाहीये. आपल्या विद्यमान पंतप्रधानांनी प्रत्येक घर प्रकाशमय होण्यासाठी २०१५ पासून मोहीम राबवली आहे. चालू स्थितीला ६००० गावांमध्ये वीज पोहोचली आहे आणि त्या गावांमधले रहिवासी त्यांचे ऋणी आहेत.

५) मणक्याच्या समस्या दूर कश्या करता येतील याचा शोध सुरु आहे

मणका हा मानवी शरीरातील महत्वाचा अवयव आहे आणि यावर उपचार करणे देखील कठीण आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी सर्व अडथळ्यांवर मात करून एक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे जे मणक्याच्या समस्या दूर करू शकतात.

६) आता तुमचे बाळ खूप बुद्धिमान जन्माला येईल 

माणसाला दर दशकात बुध्यांक तीन गुण जास्तीचे मिळत आहेत आणि हे असे का घडते आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये. लवकरच आपल्याला आपल्या बुद्धिमान मुलांचा अभिमान वाटेल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon