Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

सकाळचा नाश्ता ह्या पदार्थाबरोबर करा


आईला सकाळी सर्वात जास्त चिंता नाश्त्याला काय बनवायचे ह्याची असते. आणि नाष्ट्याशिवाय कुणाचीच सुरुवात होत नाही. आणि सकाळी नाष्ट्या करायलाच हवा. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि त्याचबरोबर आरोग्यही उत्तम राहून प्रकृती ठणठणीत राहते.

१) इडली

हा पदार्थ नाश्त्यात खाल्ल्यावर खूप उत्तम पोट भरून जाते. आणि त्याचबरोबर तुम्ही जर प्रवास करून कामाला जात असाल तर तुम्हाला त्याचा त्रासही होत नाही. आणि तेल न वापरल्याने ह्यामध्ये फॅट्स सुद्धा नसतात. आणि खायलाही रुचकर असा पदार्थ आहे.

२) डोसा

हा पदार्थही खूप स्वादिष्ट आणि चटकदार आहे. आपल्याकडे घरी खूप कमी डोसा तयार केला जातो. पण केल्यास त्याचे फायदे वजन नियंत्रित आणि हेल्दी नाश्त्या म्हणून चांगला आहे.

३) दलिया

दलियामध्येही मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे अन्नपचन चांगले होते. याशिवाय दलियामध्ये कार्बोहायड्रेटस आणि खनिजांचे प्रमाणही जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि चवीलाही छान असतो.

४) अंडे

खूप घरात जर अंडी चालत नसतील तर ठीक आहे. पण जी खात असतील त्यांच्यासाठी, अंड्यात ए, बी आणि ई ही प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग लाभदायक असतो. अंड्याच्या बलकात फॅटचे प्रमाण जास्त असल्याने ते खाऊ नये.

५) ओट्स

हा सर्वात छान आहार आहे. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ओट्स खाल्ल्यानंतर खूप वेळासाठी पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे सारखे खायची इच्छा होत नाही. वजन कमी करण्यासाठी ओट्स अतिशय उपयुक्त असते. यामध्ये अँटिऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

६) थालीपीठ

हे तर महाराष्ट्रातील सर्वच घरात माहित असलेले खाद्य आहे. आणि आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही थालीपीठाविषयी रेसिपीची व्हिडिओ दिली आहे. हे खूप पचन आणि सडसडीतपनासाठी चांगले आहे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon