Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने केल्यावर काय होते ?

           काहीवेळा खूप मोठ्या समस्येसाठी छोट्या -छोट्या गोष्टी उपयोगाच्या असतात त्याच पद्धीतीने निंबू पाणी हे शरीराला व मनाला एका शांत आणि निरोगी बनवत असते. पण आपण ह्या गोष्टीकडे पाहत नाही किंवा माहिती असूनही त्या गोष्टी करत नाही तेव्हा ह्या ब्लॉगमधून अशाच सोप्या व घरात आढळणाऱ्या निंबू पाण्याचे फायदे.

१) तुमचे शरीर ताजेतवाने करते

जेव्हा तुम्ही सकाळी उठतात त्यावेळी खूप आळस वाटत असतो. तुम्ही उठून जातात पण मनाने झोपलेल्या असतात तेव्हा जर तुम्ही निंबू पाणी घेतले तर तुमचा आळस तर चालला जाईल पण तुमचे आरोग्यसुद्धा खूप चांगले राहील. आणि शरीरातले विषारी वायू काढण्याचे काम निंबू पाणी करत असते. आणि तुमची पचनक्रिया सुद्धा ह्यात सुधारली जाते.

२) तुमच्या त्वचेला मुलायम बनवत असते

त्वचेला मुलायम बनवण्यासाठी मॉइश्चरायझर लागत असते आणि निंबू मध्ये एंटीऑक्सिडेंट्स चे गुण असतात म्हणून निंबू पाणी पिण्याने तुमचे शरीर हायड्रेट राहून तुमची त्वचा ही मुलायम बनत असते. आणि तिला चमक आणि तेज येत असते.

३) एनर्जी मिळत असते

निंबू पाणी तुम्हाला कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय एनर्जी ड्रिंकचा फायदा मिळवून देतो. तुमचे शरीर घामामुळे एनर्जी गमावून बसतो त्यात निंबू पाणी शरीरात इलेक्ट्रोलाइट्स चे बॅलेन्स बनवून तुम्हाला तंदुरुस्त करत असतो.

४) लिव्हरला खूप मदत

निंबुच्या पाण्यात सायट्रिक ऍसिड असल्याने ते शरीरातील हानिकारक बॅक्टरीया काढण्याचे काम करत असते. आणि त्याच बरोबर तुमच्या लिव्हरला अंघोळ घालत असतो. लिव्हर ह्यामुळे स्वस्थ राहत असते.

५) सर्दी खोकला अशी इन्फेक्शन

आपल्याकडे वातावरण बदलत राहते कधीतरी अचानक पाऊस पडतो तर कधी अचानक उकाडा तर कधी अचानक एकदम थंडी वाढून जाते तेव्हा निंबू पाणी जर तुम्ही दररोज पीत असाल तर तुमची इम्यून सिस्टम मजबूत होऊन तुम्हाला लगेच होणाऱ्या सर्दी आणि इंफेक्शन पासून वाचवत असतो. कारण ह्यात व्हिटॅमिन असते.

६) वजन घटण्यास मदत

निंबूमध्ये असलेले पेक्टिन फायबर तुम्हाला अस्वच्छ खाण्यापासून रोखत असतो आणि त्यासोबत जास्त खाण्याची तीव्रता कमी करत असतो. म्हणून ह्यामुळे वजन घटण्यास खूप मदत असते. आणि त्याचबरोबर निंबू पाणी मेटाबोलिज्म वाढवून त्यामुळे तुमच्या असलेल्या लाईफस्टाईल मध्ये बदल होऊन वजन कमी होत असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
50%
Wow!
50%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon