आयुष्य आशावादी दृष्टिकोनातून पाहणे खूप महत्वाचे आहे. कारण बऱ्याच गोष्टी तुमच्या आवडीने होत नाही. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या मिळत नाहीत. तेव्हा आशावादी असणे चांगले. आणि ह्या गोष्टी तुम्हाला शिकवत असतात की, जीवन खाच- खळग्यांनी भरलेले आहे. आयुष्यात काही चढ-उतार येत असतात. जीवन खूप सुंदर आहे त्यालाही उत्साहाने व आनंदाने जगायला हवे. आशावादी असणे खूप महत्वाचे मूल्य आहे, ते तुम्ही तुमच्या बाळाला शिकवायला हवे. जर एखाद्या गोष्टीत अपयश आले तर सर्व काही संपत नाही. ह्या गोष्टींमधून मुलं ही चुकांमधून शिकून पुढे जातात व स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतात. पुढील सहा मार्ग तुमच्या मुलाला आशावादी बनवण्यास मदत करतील.
१) उदाहरणातून शिकवा
तुमची लहान मुले ही तुमच्याकडे बघून शिकत असतात तेव्हा त्यांच्यासाठी चांगली प्रतीमा ठेवा. तुम्हीच तुमच्या मुलाचे पहिले शिक्षक असतात. तेव्हा त्यांना तुमच्या अनुभवातले उदाहरण देऊन सांगा. की, तुम्ही कशाप्रकारे प्रश्न सोडवलीत. मुलांना सांगा की, परिस्थितीला खूप बाजू असतात, त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या गोष्टी दोन्ही बाजू घेऊन येतात, सकारात्मक आणि नकारात्मक. तेव्हा त्याबाबत त्यांना समजावून सांगा. ह्या सर्व स्थितीत आशावादी कसे राहायचे.
२) मुलांना योग्य बाजू कोणती ते सांगा
तुम्ही त्यांना विश्लेषण करून सांगत रहा की, काही वेळा लोक, आणि परिस्थती चांगली नसते, ती कधीच वाईटही नसते. याबाबतीत मुलांना विश्लेषण करून सांगणे कठीण आहे. पण तुम्हाला मुलांना सवय होईल. काही वेळा खूपच नकारात्मक घडते, ते मुलेही पाहत असतात, तेव्हा मुलांना सांगा की, थोड्याच दिवसात सकारात्मक पाहायला मिळेल. तुमच्या मुलाकडून काही चुका झाल्यात तर त्यांना रागावू नका, त्यापेक्षा ते कसे योग्य करत आले असते ते सांगा व चुकांमधून शिकायला सांगा.
३) त्यांना योग्य वेळी शाबासकी द्या
प्रशंसामुळे मुलांना आत्मविश्वास मिळतो व त्यांची उमेद जागृत होते. आणि तुमच्या मुलांना खरी प्रशंसा तुमच्याकडून मिळत असते. कारण मुले ही आपल्या आई- वडिलांचे लक्ष आहे अशा जाणिवेने कार्य करत असतात. पण जर तुम्ही अवाजवी प्रशंसा करायला लागला तर मुलांना त्याची सवय होऊन ती प्रयत्न करणे सोडू शकतात. तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यांचे यश तुमच्यासाठी जसे मूल्यवान आहे तसेच त्यांच्यासाठीही मूल्यवान असते. म्हणून त्यांची खरीच स्तुती करा.
४) जोखीम घ्यायला शिकवा
मुलांनी जोखीम घ्यायला हवी, असे त्यांना सांगत रहा. संघर्ष हा जीवनात करावा लागतो, त्याच्याशिवाय यश मिळत नसते. आणि संघर्ष तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो, तो गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाला ह्या मार्गातून जावेच लागते. आणि काही अपयशातून नव्या संधी उपलब्ध होतात तेही सांगा.
५) त्यांना अपयशाच्यावेळी समजून घ्या
तुमच्या मुलांना तुमच्याकडून प्रेम, प्रशंसा, मूल्यमापन, चुका ह्या ऐकून घ्यायच्या असतात. तेव्हा त्यांच्याकडून काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर त्यांना रागावू नका. तर त्यांना कुशीत घ्या व कुशीत घेऊन समजून द्या. त्यांना नवा आत्मविश्वास मिळून ते पुनः सुरुवात करतील.
६) तुमच्या मुलांचेही ऐकून घ्या
तुमची मुले जर एखादी समस्या तुमच्याकडे मांडत असतील, तर ती शांतपणे ऐकून घ्या, व तिला समजून त्यावर त्यांना उपाय सुचवा. त्या मुलांना पालकांजवळ कोणतेही समस्या किंवा वैयक्तिक समस्याही सांगतील. त्यांची मित्रच तुम्ही व्हाल. त्यांचे मित्र होणे केव्हाही चांगलेच आहे.
