बाळाचा जन्म झाल्यावर ६ महिन्यापर्यंत अंगावरचे दूध आणि फार्मुला दूध द्यायचे असते. किंवा सेरेलॅक देत असतात. आणि याच्याशिवाय दुसरे अन्न देणे थोडे धोक्याचे असते म्हणून जन्म झाल्यावर सहा महिन्यानंतर आईचेच दूध देत असतात. काही जण फळ कुस्करून देण्याच्या प्रयत्न करत असतात पण तेही खूप धोक्याचे असत. म्हणून सहा महिन्यानंतरच काही पदार्थ खाऊ घालायचे. आणि जर तुमचे बाळ सहा महिन्याचे झाले असेल तर त्याला ही पदार्थ देऊ शकता. आणि ह्या अन्नाची चव घेतल्यावर बाळ उलट्या करेल किंवा तोंडातून बाहेर काढेल. तेव्हा ते नैर्सगिक आहे. याविषयी चिंता करत बसू नका.
बाळाच्या आहारात एकदम बदल करण्याविषयी, काय करायचे आणि काय नाही त्याविषयी.
१) या गोष्टी करा
१. बाळाला खाऊ घालताना ३ दिवसांचा गॅप ठेवा आणि ३ दिवसानंतर त्याला नवीन चवीचा पदार्थ खायला द्या.
२. सुरुवातीला १ चमचा फळांचा गर देऊन सुरुवात करा. आणि जर बाळ तितके व्यवस्थित पचवायला लागल्यावर मात्रा वाढून द्यावी.
३. स्टीलचे भांडी वापर करा आणि त्यातच बाळाचा अन्नपदार्थ तयार करा.
४. बाळाला काही पदार्थ खायला दिल्यानंतर ऍलर्जी वाटत असेल तर डॉक्टरांना भेटून विचारून घ्या.
ह्या गोष्टी करू नका
१. आहाराच्या बाबतीत एकदम बदल करू नका. म्हणजे लगेच खाऊ घालू नका. सहा महिन्याचे बाळ आहे.
२. काही घटक एकत्र करून देऊ नका. काही वेळा ती पदार्थ बाळ पचवू शकत नाही.
३. डबाबंद पदार्थ बाळाला देऊ नका. घरीच पदार्थ तयार करा.
१) केळीचा गर (Mash)
केळीला पूर्ण कुस्करून बारीक पेस्ट करा. त्यात थोडे पाणी टाका. वाटल्यास मिक्सरमधून काढून घ्या नाहीतर हातानेही कुस्करता येईल. आणि ती बारीक पेस्ट बाळाला खाऊ घालता येईल. यात पोटेशियम आणि फायबर मिळेल.
२) सफरचंदाची गर ( mash)
सफरचंद मधील वरचे आवरण नखाने काढून टाका. किंवा सोलून घ्या. नंतर त्याला वाफेत ६ ते ७ मिनिट वाफ द्या. आणि नंतर त्याची बारीक पेस्ट करून पुरी तयार करू शकता.
३) भाताचे सेरेल (cereal)
२ चमचा राईसची पावडर घ्या आणि त्यात १ कपापेक्षा कमी पाणी घ्या. किंवा कपचा १ /४ चा भाग राईस पावडर आणि त्यात १ कप पाणी घ्यावे. आणि ते पाणी झाकलेल्या भांड्यात तापवून घ्यायचे. मग त्यात राईस पावडर टाकून ते मिश्रण ढवळत रहावे. १० मिनिटापर्यंत मंदपणे त्याला उकळत राहावे. आणि गरम झाल्यावर बाळाला देऊ शकता.
४) वाटण्याची पुरी
वाटण्यात खूप मोठ्या प्रमाणात आयर्न असतात. त्यात व्हिटॅमिन अ, आणि क, सुद्धा असतात. वाटल्यास तुम्ही वाटण्याची पेस्टही करू शकता. जितकी बारीक पेस्ट करता येईल तितकी करावी.
५) गाजराची पुरी
गाजर लहान - लहान कापून घ्या. त्याला ६-७ मिनिटापर्यंत उकळून घ्या. आणि नंतर मिक्सरमधुन काढून त्याचीही पेस्ट करून त्याला बारीक करून बाळाला देऊ शकता.
६) बटाट्याला बारीक करा (Mash)
बटाट्याला उकळून त्याला मऊ करून घ्या. नंतर त्याला कापून मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून बाळाला देता येईल.
हे पदार्थ तुम्ही ६ महिन्याच्या बाळाला देऊ शकता. पण तुमच्या बाळाची प्रकृती कशी आहे त्यानुसार डॉक्टरांना विचारून हा आहार घ्या. कारण काही बाळांची प्रकृती नाजूक असते त्यांना हा आहार पचू शकत नाही. तेव्हा सर्व खात्री करून आहार देऊ शकता. त्याचप्रमाणे इतर मातांनाही हा लेख पाठवा जेणेकरून तेही त्यांच्या सहा महिन्याच्या बाळाला हे पदार्थ देता देतील.
