Link copied!
Sign in / Sign up
62
Shares

मुलांचे संगोपन करताना त्यांन सध्याच्या जगासाठी कसे तयार कराल

 

लहान मुले हि भविष्यातील नागरिक असतात म्हणून त्यांना वाढवताना या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्यावर तश्या प्रकारचे संस्कार करणे त्याच्यात नैतिक मूल्य रुजवणे समाजात वावरताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायला हवे या गोष्टी शिकवणे हे आवश्यक असते. मुलांना या गोष्टी लहानपणीच शिकवणे सोप्पे असतात. तर हि मूल्ये कशी शिकवावी याबाबत आम्ही काही टिप्स तुम्हांला  देणार आहोत.

१. त्यांना विविध माध्यमातून गोष्टी शिकवा

जर तुम्हाला तुमच्या मुलाला खरच चांगल्या गोष्ट द्यायच्या असतील तर त्यांना लहान मुलांसाठीची असलेली पुस्तके वाचायाला द्या.ज्यामध्ये त्याला विविध गोष्टींची माहिती होईल किंवा त्यातील माहिती तुम्ही त्यांना द्या. त्यांना जगात काय चालेल आहे याची माहिती द्या. त्यांना टीव्हीवरील माहितीपर कार्यक्रम दाखवा. तसेच आजकाल विविध गोष्टींची माहिती देणारे व्हिडिओ  सहज उपलब्ध होतात ते दाखवा. त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारा.

२. त्यांच्या प्रत्येक प्रश्नकडे लक्ष द्या.

लहान मुलांना नेहमी विविध प्रश्न पडत असतात काही प्रश्न फार विचित्र देखील असतात त्यांना काय उत्तर द्यावे हे कळत नाही अश्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि जर उत्तर माहित नसेल तर टाळू नका नाही येत नंतर सांगतो असे सांग त्यांच्यावर चिडू नका. त्यांच्यातील  उत्सुकता कायम असू द्या.

३.त्यांना शालेय विषय व्यतिरिक्त विषयात देखील समृद्ध करा.

शिक्षण म्हणजे मुलांना ज्ञानाने समृद्ध  करणे होय. नुसतं परीक्षेत मार्क मिळवण्याकरता तयार करणे नाही. त्यांना शालेय विषया व्यतिरिक्त गोष्टी देखील शिकावा जसे निसर्गातील गोष्टींची माहिती विविध खेळ, शाररिक माहिती, इंटरनेट त्याचे उपयोग आणि दुष्परिणाम यांची  माहिती करून द्या.

४. समाजात वावरताना चूक काय बरोबर काय याचा अंदाज द्या.

कधी-कधी मुलांना चूक काय बरोबर काय याचा अंदाज देणे गरजेचे असते. ज्यावेळी ते समजत्या  वयात येतात त्यावेळी त्याचे त्यांना या गोष्टी समजतील परंतु काही गोष्टी जसे उगाच कुणाला त्रास देऊ नये, उगाच कोणाच्या  माणसाच्या किंवा प्राण्यांच्या खोड्या काढू नये, सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या गोष्टी जसे थुंकू नये, कुठेही कचरा न टाकता कचऱ्याच्या डब्ब्यात टाकावा.  

५. मुलांना त्यांचे मत विचारात जा  

समाज तुम्ही एखादा सिनेमा बघत आहेत तो बघून झाल्यावर त्याबाबत मुलाचे मत विचार त्याचे उत्तर काहीही असू दे उत्तर द्यायची जबरदस्ती करू नका. समाज त्यातला एखादे पात्र चोरी करत असेल तर तो बरोबर करत होता का चूक हे त्याला विचार, जर कोणी मारत असेल तर बरोबर का चूक विचारा त्याचे उत्तर चुकीचे असू शकते त्यानुसार त्याला आपण तसं  विचार करण्यापासून कसं वाचवायचं हे ठरवू शकतो. त्याला/ तिला काय आवडते किंवा आवडले कि नाही असे त्यांचे मत विचारात जा.

६. वाचनाची खेळाची आवड निर्माण करा

मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी  वाचनाची आवश्यकता असते याची जाणीव करून द्या मग त्यासाठी त्यांना पुस्तक इंटरनेट अशी विविध माध्यमे उपलब्ध करून द्या, पण हे करतान त्यांच्यावर लक्ष ठेवा कारण बऱ्याच गोष्टी त्यांना चुकीच्या मार्गाने समजल्यामुळे पुढे समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच त्यांना मैदानी आणि घरगुती विविध खेळाची आवड निर्माण व्हवी यासाठी प्रयन्त  करा. त्यांना खेळायला घेऊन जा, खेळ दाखवायला घेऊन जा.

७. व्यायाम आणि आरोग्य

मुलं  खूप खेळात असतील तर हरकत नाही पण जर खेळात नसतील तर त्यांना दिवसभरातून थोडा वेळ तरी व्यायाम करण्याची सवय लावा आणि व्यायाम का आवश्यक आहे त्याचे आरोग्याला कसे फायदे आहेत हे पटवून द्या. आजकाल मुले मैदानी खेळ कमी खेळताना दिसते तसेच व्यायाम हा प्रकार पालकच विसरलेच आहेत म्हणून पुढील आयुष्यात मुलांना या गोष्टी सांगणे आवश्यक असते.

वरील गोष्टी या पालकांना सहज जमण्यासारख्या आहेत काही गोष्टी कालबाह्य किंवा अशक्य असल्या तरी मुलांच्या  आणि चांगल्या समाजासाठी करणे अवश्यक आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon