Link copied!
Sign in / Sign up
40
Shares

खास उपसासाठी साबुदाणा बटाटा पुरी

उपास म्हणलं की खिचडी, वऱ्याचेतांदूळ (भगर ) रताळ्याचा खिस, बटाट्याचा खिस असे नेहमीचे पदार्थ खून कंटाळा येतो म्हणून आम्ही तुम्हांला उपासासाठी एक नवीन पदार्थ कसा करायचा सांगणार आहोत.

साहित्य 

१. २ मोठे बटाटे, उकडलेले

२. १/२ कप साबुदाणा

३. थोड्या  मिरच्या आवश्यकतेनुसार 

४. पाव कप चिरलेलली कोथिंबीर

५. १/२ चमचा जिरे, १चमचा जिरेपूड 

६. थोडंसं दाण्याचे कूट (शेंगदाणे)

७. पुरीला लाटताना लावायला पिठी म्हणून  शिंगाडा पिठ 

८. चवीपुरते मिठ

९. पुऱ्या तळण्यासाठी तेल

कृती

१. १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. जास्तीचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर हाताच्या बोटाचे एक पेर पाणी ठेवावे अर्धा सेमी येईल इतपत पाणी ठेवावे साधारण अश्याप्रकारे ३-४ तास साबुदाणा भिजून ठेवावा. 

२.  मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये. जर मिक्सर नसेल तर मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

३. शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणा जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा.चवीनुसार मीठ घालावे. 

४.  तेल तापत ठेवावे. तेल तापले कि गॅस माध्यम आचेवर ठेवावा.  एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा नाहीतर पुरी बिघडते. 

५. नेहमीच्या पुरीसारखी ही  पुरी लगेचच उलटू नये थोडी तळली जाऊन कडक झाली असे लक्षात आल्यावर हळूच झाऱ्याने उलटावी. 

या पुऱ्या बटाटयाच्या भाजी बरोबर किंवा कोथींबीर दाणे आणि हिरव्या मिरच्यांच्या चटणी बरोबर खायला द्याव्यात.

बंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर .

टाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे  फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता  जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा! प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. 
http://bit.ly/tinystep-blogs

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon