Link copied!
Sign in / Sign up
39
Shares

तुम्हांला हे संभोगाबाबतचे विचित्र गैरसमज माहिती आहेत का ?

समागम,संभोग (सेक्स) हा एकतर चर्चेसाठी निषिद्ध मानण्यात येणार विषय मानण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ऐकीव माहितीवर कोणत्याही प्रकारचा विचार न करत विश्वास ठेवतात आणि यामुळे याबाबतीत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत आणि होतात.

१. नो हायमेन =नो व्हॅजिनिटी

हायमेन हे एक अगदी पातळ असा पडदा असतो जो तुमच्या योनीच्या मुखाजवळ असतो. आणि हा पडदा संभोग दरम्यान फाटण्याची शक्यता असते. हायमेन फाटला असल्यास ती मुलगी व्हर्जिन नाही असे मानण्यात येते. हा एक मोठा गैरसमज आहे. काही मुलींना जन्मताच हायमेन नसतो तर काही शारीरिक हालचाली,व्यायाम खेळ सायकल चालवणे यामुळे देखील हायमेन तुटण्याची शक्यता असते.

२. संभोग बाबतीतील कल्पना

या सगळ्या सिनेमा आणि पुस्तकांमध्ये वाचून लोक काहीही विचित्र कल्पना लोकांच्या मनात तयार होतात. आणि यानुसारच आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा करायला लागतात पण या सगळ्या गोष्टी त्यात दाखवतात तश्या नसतात. प्रत्येकाच्या याबाबतच्या कल्पना वेगळ्या असतात.आणि या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा एकमेकांमधील रस कमी होऊ शकतो.

3. पुरुषच्या परमोच्य आनंदच क्षण

वीर्य बाहेर आल्यावरच पुरूषा त्याच्या त्या उत्कट क्षणापर्यंत पोहचतात हे जरी खरे असले तरी.अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे बऱ्याच वेळा पुरुषांच्या त्या उत्कट क्षणी फार कमी प्रमाणात वीर्य बाहेर आले किंवा आलेच नाही पण त्यांनी समागमाचा पूर्ण आनंद घेतला. त्यामुळे असे झाल्यावर घाबरण्यासारखे काही नसते

४. पहिल्या वेळी स्त्रीला रक्तस्त्राव होतोच.

 

 

पहिल्यांदा संभोग करताना स्त्रीला रक्तस्त्राव होतोच. ही गोष्ट खरी असली तरी प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असे होतेच असे नाही. काही महिलांच्या योनीमध्ये संभोग दरम्यान योग्य ओलावा निर्माण झाल्यास रक्तस्त्राव होत ही नाही. किंवा योग्य लुब्रीकंट वापरल्यावर देखील रक्तस्त्राव न होण्याची शक्यता असते आणि हा रक्तस्त्राव म्हणजे रक्ताचा एक थेंब देखील असू शकतो. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्याबाबतीत वेगवेगळी असू शकते त्यामुळे याबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये.

५. मुखद्वारे /(ओरल-सेक्स)करण्यात येणारा संभोग सुरक्षित असतो. 

लैंगिक आजार हे फक्त योनी संभोगाद्वारेच होतात असे नाही तर हे ओरल सेक्सद्वारे देखील होऊ शकतात. स्त्री-पुरुष दोघांना या संभोगाद्वारे लैंगिक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबतीत काळजी घेणे आवश्यक असते.

६. कोणताही तेलकट पदार्थ हा लुब्रीकंटला पर्याय आहे

संभोग दरम्यान ज्यावेळी लुब्रीकंटची गरज असते त्यावेळी हाताला येईल तेल, व्हॅसलीन सारख्य क्रीमचा वापर करतो.पण हे चुकीचे आहे. यामुळेगुप्तांगाबाबत काही इंफेक्शन  किंवा रॅशेस येण्याची शक्यता असते. किंवा काही मधीलकेमिकल्स केमिकल्समुळे गुप्तांगाविषयक आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे  सूट होईल असे लुब्रीकंट वापरावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon