Link copied!
Sign in / Sign up
142
Shares

रोटाव्हायरस लस म्हणजे काय ? आणि त्याचे महत्व

रोटाव्हायरस काय आहे ? ही लस माझ्या बाळाला मिळणे आवश्यक आहे का ? तुम्ही बाळाच्या लसीकरणाचा चार्ट वाचता तेव्हा प्रामुख्याने रोटाव्हायरस लसबद्धल  डोक्यात प्रश्न निर्माण होतात. आणि ह्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत. रोटाव्हायरसाच्या संसर्गाने आतड्याचा रोग बालकांना होतो, पाच वर्षाच्या मुलांना तो मुख्यत्वे होतो. विकसनशील देशात जेथे स्वच्छतेचे प्रमाण कमी असते तेथे तो  जास्त प्रमाणात त्याचा संसर्ग होतो . या रोटाव्हायरसाच्या संसर्गामुळे लहान आतडयाच्या आतील भागातील पेशीवर परिणाम होतो. याची लक्षणे प्रामुख्याने ताप, उलट्या होणे, तीव्र अतिसार, आहेत. दोन दिवसात याचा परिणाम बालकांच्या प्रकृतीवर होताना दिसून येतो. अगोदर उलट्या होतात मग आठवड्यानंतर पाण्यासारखे जुलाब व्हायला लागतात. ही लक्षणे ६ महिन्यांच्या ते २ वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतात. रोटाव्हायरस हा वेगाने पसरणारा रोग आहे, तो बालकापासून ते प्रौढ व्यक्तींनाही होऊ शकतो, त्याला प्रतिकार करण्यासाठी  रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात असायला हवी. रोटाव्हायरस मुळे अतिसार होऊन मोठ्या प्रमाणात बालके दगावण्याची शक्यता असते. त्यासाठी hydration therapy ही सांसर्गिक झालेल्या बालकासाठी खूप महत्वाची आहे. या मध्ये मुलांच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटना रोटाव्हारसच्या लसला दरवर्षी विकसनशील देशातील बालकांना देण्याचे नियोजन  करतेय. ह्या लसीमुळे १५ - ३० टक्क्यांनी तीव्र अतिसाराचे रुग्ण कमी होत आहेत. भारतानेही रोटाव्हारसची लस प्रत्येक बालकाला देण्याचे नियोजन केलेय.

सध्या तीन रोटाव्हायरस लस भारतात उपलब्ध आहेत

.१) रोटाव्हॅक - ही लस २०१४ मध्ये भारतात तयार केली गेली. ही लस तोंडात दिली जाते ह्याचे ३ डोस आहेत. चार आठवड्याच्या अंतराने दिली जाते, बाळाच्या जन्मानंतर सहा आठवद्यानंतर ही लास द्यायला सुरुवात करावी.

२) रोटरिक्स - ह्या लसीचे २  डोस आहेत.

३) रोटरीक - ही लसही तोंडत दिली जाते. ह्या लसींची किंमत इतर लसीइतकीच आहे . जागतिक आरोग्य संघटनेच्या अनिवार्य लसींच्या यादीमध्ये रोटाव्हायरस  लस चा समावेश होतो. ही लस बाळाला द्या. वाटल्यास त्यासाठी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राला

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon