Link copied!
Sign in / Sign up
63
Shares

रात्री ब्रा का घालू नये ?


प्रत्येक स्त्रीला ब्रा घालणे आवडत असते. त्याचे कारण वेगवेगळे असतील पण खूप स्त्रियांना सुंदर दिसण्यासाठी किंवा saggy (ढिले स्तन) स्तनांवर उपाय म्हणून आवडत असते. आणि काहींना ब्रा शिवाय पर्याय सुद्धा नसतो. पण ब्रा विषयी खूप मत-मतांतरे आहेत ते तुमच्यापुढे मांडावे लागतील कारण त्याच्या संबंध तुमच्या आरोग्याशी आहे. तो कसा ते आपण बघणार आहोत.

१)   स्तनामध्ये काही स्नायू असतात. तसेच त्या स्नायूंच्या टिश्यूही त्या स्तनावर असतात. आणि जर तुम्ही खूप तंग (टाईट) ब्रा घातला तर जे रक्त वहन होते त्यात अडथळा येऊन रक्ताचे वहन गोलाकार गतीत होत नाही. आणि त्यामुळे मज्जातंतूवर परिणाम व्हायला लागतो.

२) खूप वेळ ब्रा घातल्यामुळे त्वचा ही चुरचुरीत व्हायला लागते. आणि त्यामुळे त्वचेचा विकारही होऊ शकतो कारण ब्रा चे हुक हे खूप घट्ट असल्याने ते त्वचेला दुखापत करत असतात. काहीवेळा ह्यामुळे जखम ही होऊ शकते. आणि तुम्हाला अस्वस्थ ही वाटते.

३) रात्री ब्रा घालण्यामुळे

१. रात्री ब्रा घालण्याने फंगल इन्फेक्शन होऊ शकते. थोडीफार मॉइश्चर असल्याने त्या ठिकाणी फंगल होते

२. रात्री झोपेत अडथळा येतो. कारण ब्रा खूप तंग असल्याने दम लागून अस्वस्थ वाटते.

 

 

३. स्नायूंची हालचाल होत नाही. म्हणून रक्त वहन होत नाही.

          ४. स्तनाच्या टिश्यू यांनाही ह्यामुळे धक्का पोहोचतो. रात्री रक्तस्त्राव एकाच जागी थांबून राहतो. आणि स्त्रीच्या स्तनात अशुद्ध रक्त वाहत असते.

४) आणि ह्या वरच्या दिलेल्या कारणामुळे किंवा स्तनाच्या टिश्यू ना धक्का पोहोचल्यामुळे स्तन कँसर होऊ शकतो. असे ब्रा घालण्याने होते असे नाही पण खूप तंग ब्रा घातल्यावर एका ठिकाणी रक्त थांबून राहते आणि त्यामुळे त्या ठिकाणी गाठ व्हायला लागते.

ब्रा घालायचा नाही का?

खरं म्हणजे ह्यात आधीच खूप मत-मतांतरे आहेत. पण तुम्हाला जर खाली आलेल्या ‘स्तनावर ब्रा घालवाच लागतो’. असे बऱ्याच स्त्रियांचे म्हणणे असते. तेव्हा तुम्ही ब्रा घालताना काही गोष्टीची दक्षता घ्यायला हवी. ती खालीलप्रमाणे

१. ब्रा चांगल्या कापडाचा आणि त्याच्याने त्वचेला त्रास होणार नाही असा परिधान करा.

२. ब्रा खूप तंग घालू नका.

३. रात्री ब्रा घालून कधीच झोपू नका. कारण अगोदरच तुम्ही दिवसभर घातलेला असतो तेव्हा रात्री न घातल्यामुळे स्तनाच्या स्नायूना हानी पोहोचणार नाही.

४. आवश्यक असल्यासच ब्रा घाला. म्हणजे रात्री व घरी असताना घालू नका.

५. खूप सुंदर दिसण्यासाठी स्वतःच्या आरोग्याशी खेळू नका.

हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्ही ब्रा लगेच घालणे सोडून द्यायचे असे नाही पण तुम्ही त्याला कमी करू शकतात. आणि रात्री जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर ब्रा घालू नये. जर तुमचे ह्याबाबत काही मत असेल तर तुम्ही निसंकोच कमेंट करून सांगू शकता. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon