Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

राशीनुसार जाणून घ्या२०१८ मध्ये कसे असेल आपले पालकत्व

पालक होणे हा एक आगळा पण काहीतरी भारी अनुभव असतो आणि आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात असते. आपल्या बाळाला उत्तम आयुष्य देण्यासाठी आपण जे कष्ट घेतो आणि जे प्रयत्न करतो ते लक्षात घेता पालकत्व हा एक महान अनुभव असतो. अर्थात प्रत्येक पालकांना आपल्या मुलासाठी उत्तम ती गोष्ट हवी असते. जर पालक होण्याचा पहिलाच अनुभव असेल तर ते देखील एक महत्त्वाचे यश म्हणावे लागेल.

पण पालकत्वाचा विचार करताना मुलांचे संगोपन कशा प्रकारे करतो त्यावर पालकांच्या म्हणजे आपली रास आणि ग्रहांच्या हालचाली हे परिणाम करु शकतात. प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या नियमित आयुष्यावर परिणाम करतो असे मानल्यास पालकत्वाच्या अनुभवावरही त्याचा परिणाम होत असावा.

पालकत्वाच्या या प्रवासात आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि हे वर्ष पालकत्वाच्या दृष्टीने कसे असले पाहिजे ह्या गोष्टी या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया. पाहूया २०१८ मधील पालकत्व सूर्यराशीनुसार कसे असेल.

१. कुंभ (जाने २०- फेब्रु १८)

कुंभ म्हणजेच अ‍ॅक्वेरिअस राशीच्या पालकांचा शुभेच्छा. पालकत्वाच्या दृष्टीने १५ फेब्रुवारी ही तारीख दिनदर्शिकेत महत्त्वाची असेल कारण त्या दिवशी असलेले सूर्यचंद्रग्रहण आणि चंद्र या राशीला थोडी अधिक शक्ती देऊ करतील आणि त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अधिक उर्जा मिळेल. ज्या दीर्घकालीन लक्ष्य ठरवून आपण काम करतो आहोत त्यासाठी मदत होईल. योगासने आणि ध्यानधारणा यांचा समावेश असणारी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकाराल तेव्हाच अपेक्षित शांतता लाभेल. आपले प्रियजन या सर्व वर्षात आपल्या सोबतच असतील त्यामुळे त्याची काळजी करु नका. कुटुंबातील जबाबदाèयांपासून थोडा वेळ काढा आणि मित्रांसमवेत थोडा वेळ घालवा. १८ फेब्रुवारी आणि मार्च २० च्या दरम्यान एखादी चांगली आर्थिक बातमी येऊन धडकेल. त्यामुळे ज्या गोष्टीचा ध्यास घेतला असेल त्यावर काम करायला सुरुवात करा. थोडा धीर धरा आणि मग आयुष्याचे पत्ते आपल्या बाजूने पडू लागतील.

२. मीन (१९ फेब्रु -मार्च २०)

 चौदा फेब्रुवारी नंतर या राशीच्या व्यक्तींसाठी एकदम प्रेममयी वातावरण असेल. आपल्या जोडीदाराच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडण्यासाठी हा अगदी विरळाच काळ असेल. बाळाला सांभाळण्यासाठी दाई किंवा आजी ला सांगून आपल्या जोडीदाराबरोबर थोडा वेळ घालवा. हा एखादा दिवस जोडीदाराबरोबर बाहेर गेलात तर दिनक्रमात जिवंतपणा येईल आणि तो येण्यास सुरुवातही झाली असेल. या राशीचा शुक्र प्रेमल आहेच आणि जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध आणखी पुढच्या पातळीवर जाण्यास मदत करतील. या वर्षात वजन घटवणे आणि व्यायाम या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतील आणि त्यावर लक्ष केल्यास त्याचा फायदा होणारच.

३. मेष (मार्च २१ - एप्रिल १९) 

भिशी असो किंवा मुलाच्या वाढदिवसाची पार्टी असो त्या कार्यक्रमाची सुत्रे तुम्ही हाती घ्याल. पंधरा फेब्रुवारी दरम्यान या राशीच्या व्यक्ती स्वतःच भागीदारी सारखे अविश्वसनीय असे सौदे करतील आणि त्यानंतर लगेचच पैसा वाहू लागेल. अर्थात संघकार्याचा फायदा नक्कीच होईल आणि विविध प्रकल्प, नव्या योजना यांच्यात यशस्वी होण्यास मदत होईल. आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका कारण हा आवाज आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतो.

४. वृषभ (एप्रिल २० - मे २०)

 

आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवाल आणि काही बंधने सोडून द्याल त्यामुले एकूणातच आयुष्य सोपे होईल. मजेशीर गोष्टींमध्ये सहभागी व्हा आणि कुटुंब आणि मुलांबरोबर काही वेळ मस्त मजा करा. ज्या गोष्टींची अगदी वाट पाहात आहात अशा कौटुंबिक सहलींना जा. या व्यक्ती महान असतात आणि शुक्राने त्यांच्याबाबतीत अगदी दयाळुपणा दाखवलेला आहे. जर या व्यक्ती एखादा निर्णय घेण्याच्या विचारात असतील तर व्यावसायिक लक्ष्याबाबात एखादी मोठी कृती करण्यासाठी पंधरा फेब्रुवारी ही योग्य तारीख आहे.

५. मिथुन (मे २१- जून २०)

 

 

आपल्या समोर जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीमुळे कंटाळला असाल आणि डाव पालटणाऱ्या एखाद्या प्रसंगाची वाट पाहात आहात. १५ फेब्रुवारी ला नवा चंद्र आणि खंडग्रास चंद्रचंद्रग्रहण साहसाच्या ९व्या घरात आहे. याचा अर्थ असा की आपल्याकडे असलेल्या कौशल्यावर एखाद्या कार्यशाळेत किंवा नेटवर्क मध्ये स्वतःला अधिक मेहनत घेताना पाहू शकता. कुटुंबाबरोबर दीर्घ पल्ल्याची सहलही ठरवू शकता.

या राशीच्या व्यक्ती जे काही करतील त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील आणि एखाद्या नव्या नोकरीसाठी नशीब आजमावून पाहात असाल तर वरिष्ठांना नव्या नव्या कल्पना सुचवायला अजिबात घाबरू नका.

६. कर्क  (जुन २१ - जुलै २०)

भावना व्यक्त करणे हा या व्यक्तींसाठी काळजीचा भाग असतो आणि त्या अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करता याव्यात यासाठी प्रयत्नही करायला हवेत. हा काळ स्वतःवर काम क़रण्यासाठी अत्यंत योग्य आहे. नवा चंद्र आणि खंडग्रास चंद्रचंद्रग्रहण जवळीकतेच्या ८ व्या घरात आहेत त्यामुळे जोडीदारासमवेत आपल्या भावनांविषयी अधिक खुलेपणाने बोला. जोडीदाराबरोबर अधिक चांगला आणि प्रेमळ बंध विकसित होण्यासाठी हा बदलाचा फायदा होईल. २० मार्च पासून व्यावसायिक जगात नवे क्षितिज दिसण्याची अपेक्षा ठेवू शकता. एखादी चांगली बातमी आपलीच वाट पाहात असेल.

७. सिंह (जुलै २३ - ऑगस्ट २२)

प्रेमळ नातेसंबंधांतून कायम प्रेरणा घेणाऱ्या या व्यक्ती आहेत. आणि या वर्षी आपल्या प्रेरणेविषयी अधिक काम करण्यास इच्छुक असल्याचे जाणवेल. कला आणि सौदर्यावर शुक्राची हुकुमत असेल आणि मात्र याचा फायदा केवळ जर आपण लैंगिक आणि भावनिक बंधनांविषयी सकारात्मक असलो तर घेता येईल. एखाद्या भागीदारीच्या व्यवसायात आणि फायदेशीर कार्यक्रमात गुंतण्याची संधी आहे त्यामुळे ही संधी दवडू नका.

८. कन्या  (ऑगस्ट २३ - सप्टेबर २२)

 

आरोग्यदायी जीवनशैलीचा विचार या व्यक्ती करतात. मात्र आरोग्यदायी आहार घेण्याचा आणि नव्या पाककृती करुन पाहाणे याबाबत मात्र टाळाटाळ करण्याची वृत्ती दिसते. चंद्रचंद्रग्रहण आणि नवा चंद्र योग्य स्थानी पडतात तेव्हा स्वतःच्या योजनेसाठी योग्य दिशा मिळते. आरोग्याच्या चांगल्या सवयींचे परिणाम दिसत असल्याने आरोग्यदायी जीवनशैली निर्माण करायची असेल तर ही योग्य वेळ आहे. एक स्त्री, आई, बहिण आणि बायको म्हणून आत्मविश्वासाला प्रोत्साहन मिळेल किंवा बळ मिळेल. तंदुरुस्त होण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यासाठी आपल्याला खूप प्रेरणा मिळते.

९. तुला  (सप्टेंबर २३ - ऑक्टोबर २२)

जुन्या गोष्टी सोडून द्या आणि स्वतःला नव्याने न्याहाळा. आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी काही छोटी पावले उचलावीत असा विचार करत असाल तर मार्च १८ हा महिना जिम ला जाण्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या दीर्घकालीन लक्ष्य खुली करा आणि योग्य दिशेने वाटचाल करा. काम क़रण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळे आणि सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे जे काही कराल त्यामुळे समृद्ध व्यक्ती होत जाल. फक्त आरोग्यदायी जीवनशैलीचा विसर पडू देऊ नका कारण निरोगीपणासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक कारकीर्द, कुटुंब, प्रेमसंबंध आणि संपत्ती सर्व काही योग्य जागी योग्य वेळी राहिल.

१०. वृश्चिक (ऑक्टोबर २३ - नोव्हेंबर २१) 

आपल्या घराचे नुतनीकरण करण्याची इच्छा या व्यक्तींना होऊ शकते. मुलांच्या खोल्या पुन्हा एकदा रंग लावून घेण्याचा विचार मनात डोकावू शकतो. १५ फेब्रुवारी ला खंडग्रास चंद्रग्रहण आणि नवा चंद्र कौटुंबिक आयुष्याच्या चौथ्या घरात आहे. त्यामुळे अधिक सृजनशीलतेने स्वतःला व्यक्त करु शकता. मेंदूला ताण देणाऱ्या या गोष्टींमध्ये आपल्या जोडीदाराला आणि मुलांनाही सामील करून घ्या जेणेकरून आपल्याला व्यावसायिक आणि व्यक्तिगत दोन्ही जगाबाबत चांगला दृष्टीकोन लाभेल. या वर्षी आपण काहीही केले तरीही आत्म्यावर आणि हृदयावर त्याचा विजयी प्रभावच पडेल.

११. धनु (२२ नोव्हेंबर - डिसेंबर २१ )

या व्यक्तींना स्वतःचे मूल्यांकल आणि प्रशंसा व्हावे असे वाटते. खंडग्रास चंद्रचंद्रग्रहण आणि नवा चंद्रा हा संवादाच्या तिसऱ्या घरात पडला आहे. याचा अर्थ आपण संघातील खेळाडू आहोत आणि जे काही करु त्यासाठी गुण मिळवूच. वादविवाद किंवा आक्रमकता यांचा विचार करता कुटुंबाशी असणाऱ्या नातेसंबंधांच्या दृष्टीने आणि प्रेमाच्या व्यक्तींसाठी ते योग्य नसल्याने त्यापासून दूर राहणेच उत्तम. दीर्घकालीन विचार करता ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्यासाठी कुटनीतीची कला आत्मसात करुन घ्यायला हवी.

१२ . मकर (डिसेंबर २२ - जानेवारी १९) 

 

 

१५ फेब्रुवारी ला नवा चंद्र आणि खंडग्रास चंद्रचंद्रग्रहण हे आवकेच्या दुसऱ्या घरात पडते आहे. त्यामुळे मुलांसाठी आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा. जसे मुलांच्या नावे बँक खाते उघडा किंवा भविष्यात अधिक उपयुक्त ठरणाऱ्या एलआयसीची योजनेत मुलांच्या नावावर पैसे गुंतवा किंवा त्यांची पॉलिसी काढा. आपल्या जोडीदारासाठी वेळ काढा आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधा. अगदी स्वतःच्या भावना आणि संवेदनशीलता उघड करत नसाल तरीही आपल्या मनातील नैराश्य, दुःख आणि इतर सर्व नकारात्मक विचार बोलून दाखवल्यामुळे मन हलके होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon