Link copied!
Sign in / Sign up
34
Shares

या जंताने मुलाचे बावीस लिटर रक्त प्यायले.

उत्तराखंड येथील हलदावणी हूल्द्वानी कुटुंबातील एका मुलाचे सतत वजन घटत होते त्याची वाढ खुंटली होती. त्याचे हिमोग्लोबिन ५.८६ होते जे खूप कमी होते. असे असूनही त्याला ताप, पोटदुखी किंवा मानसिक त्रास होता नव्हता. त्याला गेली दोन वर्षे प्रचंड अशक्तपणा येत होता. सातत्याने त्याला यासाठी रक्त बदलण्याची गरज पडत होती. नक्की रोग समजण्यासाठी त्याच्या पुष्कळ चाचण्या केल्या गेल्या. या चाचण्यानंतर देखील डॉक्टरांना त्याच्या शरीरातील रक्त नेमके कुठे जात होते हे समाजात नव्हते.

त्या दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात नेले तेव्हा तेथील डॉक्टरांनी कॅप्सुल एंडोस्कोपी केली. कॅप्सुल एंडोस्कोपी म्हणजे एका छोट्या व्हिटॆमिन गोळीमध्ये कॅमेरा लावलेला आसतो. हा कॅमेरा शरीराच्या आता पचनसंस्थेत फिरतो. ही गोळी नुसती गिळावी लागते. हा कॅमेरा पहिल्यांदा मोठ्या आतड्यांत गेल्यानंतर सामान्य चित्र दिसत होते. त्यानंतर छोट्या आतड्यात अर्ध्या भागात त्यांना रक्त साठलेलं दिसले. त्यानंतर छोट्या आतड्यात थोडे खाली गेल्यावर त्यांना बारीक जंत दिसले. ते जंत रक्त पिऊन पिऊन पूर्ण लाल झाले होते तर काही जंत थोडे पांढऱ्या आणि लालसर रंगाचे होते. हे अर्धवट रंग असलेले जंत रक्त शोषत होते. हे जंत जवळपास दोन वर्षे तब्बल बावीस लिटर रक्त प्यायले होते.

हा आजार दिसायला छोटासा असला तरी भारतात हा बहुतेक मुलांमध्ये आढळतो. हा आजार साठलेल्या पाण्यातून, वाया गेलेले अन्न, हात स्वच्छ नीट न धुतल्याने, अनवाणी चालण्याने होऊ शकतो. या आजाराची लक्षणे बाहेरून दिसत नाही.

या आजारापासून आपल्या मुलांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी स्वच्छ हात, पाय धुवण्याची सवय लावावी. या बरोबर घराबाहेरची धूळ, उघड्यावरील अन्नपदार्थ, पाणीपुरी, जंकफूड खाऊ नये.

(फोटो-प्रतीकात्मक आहे )

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon