Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

पुरुषांविषयीच्या या ७ गोष्टी तुम्हांला माहित आहेत का ?

पुरुषांबाबत आपल्या मनात अनेक गैरसमज असलेले आढळतात. आपल्या मनात परिपूर्ण पुरुषाची एक प्रतिमा तयार झालेली असते आणि आपण बाकी प्रत्येकाला त्याच निकषांवर तोलत बसतो. परंतु त्याचवेळी त्यांच्याविषयीचे समज आणि गृहीत कल्पना बाजूला सारणे गरजेचे आहे. तर चला, आम्ही तुम्हाला पुरुषांविषयी माहीत नसलेल्या काही गोष्टी सांगतो; ज्या अगदी १००% खऱ्या आहेत:

१) त्यांना ते कसे दिसतात, याची काळजी असते.

आपली परिपूर्ण देहयष्टी असावी किंवा आपला चेहरा सुंदर दिसावा; असे स्त्रियांचेच नव्हे, तर पुरुषांचेही स्वप्न असते. पुरुषदेखील आपल्या दिसण्याबद्दल जागरुक असतात. त्यांनादेखील सुदृढ सडपातळ शरीर आणि रेखीव चेहरा हवा असतो. तसेच रिलेशनशिपमध्ये असताना त्यांचे आपल्या शरीराच्या बांध्याविषयी साशंक असणे साहजिक आहे.

२) ते संवेदनशील असतात.

पुरुषांचे मन लगेचच दुखावले जाते. फरक इतकाच की, ते लपवण्यामध्ये ते माहीर असतात. जरी त्यांच्या चेहऱ्यावर निर्व्याज हास्य असले; तरी ते आतून रडत असू शकतात. त्यांचा अनादर झाला, तर त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो; पण ते त्याबद्दल कधीही वाच्यता करणार नाहीत.

३) ते अंतर्ज्ञानी नसतात.

बहुसंख्य वेळा स्त्रियांना इशाऱ्यांमध्ये बोलायला आवडते. त्या नेहमीच बोलताना शब्दांमध्ये वास्तविक अर्थ वा उद्देश लपवून कोड्यांमध्ये बोलतात. त्यांना नेमके काय हवे, याची पुरुषांनी उकल करावी, इशारे समजावे आणि त्यानुसार वागावे; असे त्यांना वाटते. पण पुरुषांना ते ओ की ठो कळत नाही. त्यांना इशारे समजत नाहीत किंवा तुमचे गूढ संदेशही कळत नाहीत. त्यांना तुम्ही थेट असावे, असे वाटते. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही हवे असेल, तर ते स्पष्टपणे सांगा आणि ते तुमच्या स्पष्टपणाची कदर करतील.

 

४) ते सुद्धा लाजाळू असतात.

ते सुद्धा भरपूर लाजाळू असतात. तुम्हाला एखादा पुरुष आवडत असेल आणि त्यालाही तुम्ही आवडत असला; आणि त्यानेच पुढाकार घेऊन तुमच्याशी बोलावे असे तुम्हाला वाटत असेल; तर तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. तो बुजरा असू शकतो आणि त्याला तुमच्याशी बोलण्याचे धैर्य जमवणे शक्य होणार नाही. म्हणून, तुम्हाला एक अतिशय चांगला पुरुष तुमच्या आयुष्यातून जाऊ नये असे वाटत असेल; तर तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि जाऊन त्याच्याशी बोला. एकदा तुम्ही त्यांचा बुजरेपणा घालवला, तर तुम्हाला त्यांच्याकडून सुखद आश्चर्यांचे धक्के बसू शकतात.

५) मर्द को भी दर्द होता है!

शारीरिक असो वा मानसिक; पुरुषांनादेखील वेदना होतात. फक्त तुम्हाला खेळकर व्हायचे आहे, म्हणून विनाकारण जोरात मारलेले आवडत नाही. हाताचा चिमटा काढलेला तर त्यांना अजिबात आवडत नाही आणि त्यांना ते प्रेमळही वाटत नाही. तसेच विवादांमध्ये अतिशय उद्धट बोलणेदेखील अयोग्य आहे आणि त्यांना त्यामुळे वाईट वाटू शकते.

६) ते प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करतात.

पुरुष प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करतात. बहुतांशी वेळा ते ज्या गोष्टी अजिबात घडणार नाहीत, त्यांचा विचार करत बसतात आणि त्याची चिंता करत बसतात. तेव्हासुद्धा ते असे अर्थहीन विचार थांबवण्यापेक्षा अशा गोष्टी घडण्यापासून कशा रोखता येतील, याचा विचार करत बसतात. यामुळे ते भीती आणि असुरक्षिततेने ग्रासले जातात आणि शेवटी ते भलताच काहीतरी मूर्खपणा करतात.

७) त्यांना आपले कौतुक आवडते.

स्त्रियांसारखेच पुरुषांनादेखील त्यांच्या दिसण्याबद्दल वा पेहरावाबद्दल प्रशंसा झालेली आवडते आणि अगदी थोडेसे कौतुकही त्यांना आनंदित करते. पुरुषांना स्वतःविषयीच्या दिसण्याविषयी काळजी वाटू शकते आणि जेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता, तेव्हा तुम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढवता आणि तुम्ही तसे म्हणल्यामुळे त्यांच्या तुमच्याविषयीच्या आवडीत भर पडू शकते.पुरुषांबाबत आपल्या मनात अनेक गैरसमज असलेले आढळतात. आपल्या मनात परिपूर्ण पुरुषाची एक प्रतिमा तयार झालेली असते आणि आपण बाकी प्रत्येकाला त्याच निकषांवर तोलत बसतो. परंतु त्याचवेळी त्यांच्याविषयीचे समज आणि गृहीत कल्पना बाजूला सारणे गरजेचे आहे. तर चला, आम्ही तुम्हाला पुरुषांविषयी माहीत नसलेल्या काही गोष्टी सांगतो; ज्या अगदी १००% खऱ्या आहेत.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon