Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

पुरूषांमधील संभोग शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय


आजकालच्या जलद जीवनशैलीचा,ताण -तणावाचा प्रभाव हल्ली सगळ्यांच्याच आरोग्यवर होताना दिसून येतो, याचा परिणाम पुरुषांच्या संभोग शक्तीवर देखील दिसून येतो. यामुळे अनेक पुरुषांची संभोगशक्ती आणि कामेच्छा कमी होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. ही संभोगशक्ती आणि कामेच्छा वाढवण्यासाठीच्या काही उपाय सांगणार आहोत.

१. अश्वगंधा

अश्वगंध हे पुरुषांच्या लैगिक आरोग्यासाठी उपयुक्त मानण्यात येते. अश्वगंधा आणि बिदारीकंद हे प्रत्येकी 100-100 ग्रॅम घेऊन त्याचे बारीक चूर्ण तयार करा. हे अर्धा चमचा चर्ण रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधासोबत घ्या. यामुळे वीर्यचे प्रमाण वाढते आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढते.

२. पांढरा कांदा

पांढरा कांदा हा देखील पुरुषांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानण्यात येतो. या पांढ-या कांद्याचा रस, आल्याचा रस, तूप आणि मध प्रत्येकी पाच-पाच गॅम एकत्र करून रोज सकाळी नियमित सेवन केल्यास पुरुषांच्या लैगिक आरोग्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन संभोगशक्ती वाढते.

३. आवळा

आवळा हा त्रिदोषहारक बहुगुणी फळ आहे. या आवळ्याचा उपयोग पुरुषाची संभोग शक्ती वाढवण्यासाठी देखील होतो. दोन चमचे आवळ्याच्या रसात एक चमचा आवळा चूर्ण आणि एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोनदा घेतल्याने पुरुषाची संभोग शक्तीत सुधारणा होते.

४. जिरे

कांद्याच्या रसात १००ग्राम जिरे भिजवा आणि वाळवा आणि वाळल्यानंतर पुन्हा ती कृती करा असे तीन वेळा करा आणि नंतर हे वाळलेले जिऱ्यांची पूड करा. एक चमचा साखरेत अर्धा चमचा ही पूड एकत्र करून खा. आणि नंतर गरम दुध प्या. हा उपाय एक महिना केल्याने फायदा होतो.

५. खरिक

चार-पाच खरिक, दोन-तीन बदाम आणि काजू, थोडीशी पिठी साखर हे बारीक करून हि पावडर दुधात घालून ही पावडर दुधात उकळून घ्या आणि हे दूध रोज घ्या. यामुळे कामेच्छा आणि संभोग शक्ती मध्ये सुधारणा होते. हा उपाय करताना योग्य व्यायाम देखील करा अन्यथा अतिरिक्त वजन वाढण्याची शक्यता असते.

या उपायांचा अवलंब करतांन तुम्हांला कोणत्या पदार्थाची ऍलर्जी नाही ना याची खात्री करून घ्या. तसेच शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने या उपायांचा अवलंब केलेला बरा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon